नातेपुते नागरिकत्व सुधारणा कायदा समर्थनात मोर्चा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे): नातेपुते तालुका माळशिरस येथे नागरिकत्व सुधारणा कायदा समर्थ समर्थनात भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात आला यावेळी आमदार राम सातपुते बोलताना म्हणाले की हा कायदा हिंदू-मुस्लीम यांच्या हिताचा असून सर्वांनी या समर्थन केले पाहिजे. या देशाचं भाग्य आहे की हा देश चांगल्या लोकांच्या हातात गेला आहे. तसेच यावेळी अतुल तेरखेडकर, सरपंच भानुदास राऊत प्रा .हनुमंत दुधाळ हनुमंत सुळ ॲड. प्रदीप गावडे, सचिन शिंदे, यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सोपान नारनवर, सरपंच ऍड. भानुदास राऊत, उपसरपंच सुनंदा उराडे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, गटनेते दादासाहेब उराडे, धनगर आरक्षण कृती समितीचे हनुमंतराव सूळ, बाळासाहेब सरगर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ चालक सचिन शिंदे, राहुल पदमन, प्रवीण काळे, गणेश पागे, संजय उराडे, नंदकुमार धालपे, देविदास चांगण, रूपेश इंगोले व हजारो नागरिक उपस्थित होते. राहुल पदमन यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रवीण काळे यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात
. सुरवातील संविधान पूजन करून करण्यात आली . महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून, रॅली काढण्यात आली. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकामध्ये तिरुपती पोलीस स्टेशनचे एपीआय युवराज खाडे यांना निवेदन देण्यात आले तसेच पोलीस स्टेशनच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकता सुधारणा कायदा समर्थन समितीने यांनी विशेष परिश्रम घेतले.