ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत यांच्या हस्ते गुरुपुष्यामृत मुहूर्तावर श्रीकृष्ण मूर्तीची प्रतिष्ठापना 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नातेपुते शहरातील पुरातन श्री. राम मंदिरात आज गुरुवार (ता.२४)  रोजी गुरुपुष्यामृत मुहूर्तावर श्रीकृष्ण मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.पहाटे  होमहवन व धार्मिक विधी मूर्ती दाते शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यज्ञासाठी श्री.व सौ. अवधूत उराडे, श्री.सौ. निखिल घुगरदरे ,श्री व सौ. रोहित शेटे, श्री व सौ.मंदार बंदिष्टे या उभयतांच्या हस्ते यज्ञ व इतर धार्मिक विधी करण्यात आले. पौराहित्य राघव कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी  केले.#  सुनील राऊत यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विश्वस्त विजय उराडे, श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी मुकुंद बंदिष्टे, कमलाकर बडवे , मोहन डफळ, अनिल उराडे ,माजी सरपंच अमरशील देशमुख, हभप धैर्यशील देशमुख, विश्व हिंदू परिषदेचे  मंत्री श्रीगणेश पागे, इतिहास संशोधक प्रशांत सरूडकर , व्यसनमुक्त युवक संघाचे  सचीव विवेक राऊत,राहुल पद्मन, महेश शेटे, महेश टोमके, जयंत बुवा,राजू बडवे, सुरेश वहीकर ,ह भ प नाना महाराज तेली, हभप पिंटू महाराज भगत, दत्तात्रय उराडे, शशी कल्याणी, अमर भिसे, मंगेश दिक्षित, श्रीमंत माने, विनायक पद्मन,सुर्यकांत गटकुळ व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.भव्य शोभायात्राबुधवार (ता.२३) रोजी सायंकाळी श्रीकृष्ण मूर्तीची संपूर्ण शहरातून टाळ मृदुंगांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. ग्रामदैवत श्री. गिरजापती मंदिरात पालखी मधून श्रीकृष्ण मूर्ती नेऊन त्या ठिकाणी शंभू महादेवास भेट घडवली यावेळी ग्रामपुजारी संजय बडवे, सुधाकर बडवे ,कमलाकर बडवे यांनी विधिवत पूजा करून मूर्तीचे स्वागत केले. तेथून पालखी मधून मूर्ती श्रीराम मंदिरात आणण्यात आली त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते धान्यनिवास करण्यात आला.श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी शहरातील विविध भजनी मंडळे, महिला भजनी मंडळ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यानंतर प्रसाद वाटप करण्यात आलं

You may have missed