तुकाराम गाव तांबेवाडी येथे संत तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या उत्साहात*
तांबेवाडी येथे संत तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या उत्साहात*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) तुकाराम गाव तांबेवाडी ता. माळशिरस येथे संत तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या उत्सवाची परंपरा आशि की माळशिरस तालुक्यातील हे पश्चिमेकडील शेवटच्या टोकाचे गाव आहे. हा उत्सव एकशे आठ वर्षापासून अखंडपणे सुरू आहे. या गावाला तुकाराम गाव असे म्हटले जाते 1912 पासून तुकाराम महाराज बिजो उत्सव साजरा होत आहे. या उत्सवाची सुरुवात तरडगाव चे ह.भ.प बापू दादा महाराज यांनी केली आहे. तर ह.भ.प सोनोपंत मामा दांडेकर महाराज यांनी 1962 साली संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सुरुवातीला छोट्या प्रमाणात बीज उत्सव होत होता आता हजारोंच्या संख्येने पंचक्रोशीतील भाविक बीजो उत्सवासाठी या तुकाराम गावात येतात. .याठिकाणी दरवर्षी 3000 किलोचा महाप्रसाद केला जातो. या उत्सवासाठी गावातील ग्रामस्थ तन-मन-धनाने अहोरात्र काम करतात हा सोहळा दरवर्षी होळी आणि धुलीवंदन दरम्यान येतो परंतु या गावात एकशे आठ वर्षापासून धुलीवंदन, धुळवड साजरी केली जात नाही. हा सोहळा नवमीला सुरू होतो व बीजेला समाप्त होतो. त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते व कीर्तन सेवा ठेवली जाते. याहीवर्षी ही सप्ताहाचे आयोजन केले होते या सप्त्या मध्ये.मध्ये ह-भ-प दत्तात्रय महाराज गलांडे लासुरणे, ह-भ-प सोमनाथ महाराज घोगरे देशमुखवाडी, ह भ प सुनील महाराज यादव, ह भ प केशव महाराज लासुरने, ह भ प हनुमंत महाराज फुले, ह-भ-प गोरख महाराज रायते पंढरपूर, ह-भ-प सागर महाराज बोराटे नातेपुते, ह-भ-प कैलास महाराज केंजळे, ह भ प माणिक महाराज निंबाळकर चे कीर्तन सेवा झाली आहे.धुलीवंदन या दिवशी दिंडीचे आयोजन केले जाते. व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी चे पूजन करून गाव प्रदक्षणा वाजत गाजत मोठ्या उत्साहात केली जाते दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाचे आयोजन केले जाते अशाप्रकारे आगळावेगळा कार्यक्रम तुकाराम गाव तांबेवाडी येथे दरवर्षी साजरा केला जातो .