तांबेवाडीत संत तुकाराम महाराज बीजोत्सव १०८वर्षाची परंपरा उद्या होणार मोठा उत्सव


          पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) : तांबेवाडी (तुकाराम गाव) ता. माळशिरस येथील श्री संत तुकाराम मंदिरात दिनांक ४ मार्च ते ११ मार्च पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहासह तुकाराम गाथा पारायण महोत्सव संपन्न होत आहे यावर्षी संत तुकाराम महाराज बिजोत्सवाचे १०८ वे वर्ष असून तांबेवाडी (तुकाराम) गावात प्रसन्न व भक्तिमय वातावरण झाले आहे अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ह-भ-प दत्तात्रय महाराज गलांडे लासुरणे, ह-भ-प सोमनाथ महाराज घोगरे देशमुखवाडी, ह भ प सुनील महाराज यादव, ह भ प केशव महाराज लासुरने, ह भ प हनुमंत महाराज फुले, ह-भ-प गोरख महाराज रायते पंढरपूर, ह-भ-प सागर महाराज बोराटे नातेपुते, ह-भ-प कैलास महाराज केंजळे, ह भ प माणिक महाराज निंबाळकर यांची कीर्तन सेवा चालू असून दिंडी पालखी  प्रदक्षिणा मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे सर्व परमार्थ प्रेमी भाविक आणि परिसरातील सर्व श्रोते  जनानी लाभ घ्यावा असे संयोजकांनी कळविले आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपाशीर्वादाने आणि सर्व संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले मौजे तांबेवाडी गाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे पवित्र ते कुळ पावन तो देश | जिथे हरीचे दास जन्म घेते | अशा पवित्र भूमीमध्ये स्वल्प वाटे चला जाऊ | वाचे गाऊ विठ्ठला | या न्यायाने वै. हरीभक्त पारायण सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर आणि वै. गुरुवर्य राजाराम बापू पवार, शेलार मामा, साधू अण्णा शिंदे महाराज यांचे आशीर्वादाने आयोजित केले आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी तनमनधनाने श्रवण सुखाचा आनंद घ्यावा असे आव्हान ग्रामस्थ तांबेवाडी (तुकारामगाव) यांनी केले आहे