तीन तारखेला मारकडवाडीत फेर मतदान


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे


 मौजे मारकडवाडी ता.माळशिरस येथे फेर मतदान   चाचणी निवडणूक (एक्झिट पोल) घेण्यासंदर्भात ग्रामस्थांनी ठराव करून तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे.मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीन वर आक्षेप घेत मतदान प्रक्रियेत घोळ झाला असून फेर मतदान घेण्यात यावे असा सूर लावला आहे. याबाबत मा. तहसीलदार यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की. मारकडवाडी गावात विधानसभा निवडणूक- २०२४ मध्ये संपूर्ण गावाने श्री.उत्तमराव जानकर साहेब यांना मतदान केले आहे. तरीही मतमोजणीनंतर श्री.उत्तमराव जानकर  यांना ८४३ मते तर श्री. राम सातपुते यांना १००३ मते पडलेली आहेत. आमचे गावचे यापूर्वीचे ही मतदान २००९,२०१४,२०१९, व पाच महिन्यांपूर्वीची २०२४ लोकसभा या निवडणुकीतील मारकडवाडी गावचे मतदान पाहिले असता ८० टक्के मतदान हे श्री.उत्तमराव जानकर साहेब किंवा ते सांगतील त्या उमेदवाराला मिळालेले होते. असे असताना आत्ताच्या २०२४ विधानसभा निवडणुकीमध्ये फार मोठे घोटाळे झाले आहेत किंवा कसे ? याबाबत खात्री करण्यासाठी आपली शासकीय यंत्रणा मिळणेसाठी, आम्ही सर्व गावकरी आपला असणारा संपूर्ण शुल्क भरणेस तयार आहे, तरी मंगळवार दि.०३/१२/२०२४ रोजी चाचणी मतदानासाठी (एक्झिट पोल) आम्हास शासकीय कर्मचारी मिळावेत अशा प्रकारचे निवेदन देण्यात आला आहे. या निवेदनावरती मारकडवाडी येथी लसरपंच व  ग्रामस्थ  यांच्या सह्या आहेत तसेच ग्रामस्थांनी प्रसार माध्यम प्रतिनिधी  यांच्या समोर पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असा आग्रह धरला आहे.मतदान करण्याची मागणी करणारे हे राज्यातील पहिलेच गाव आहे.

You may have missed