जि प शाळा पिरळे येथील माजी मुख्याध्यापक दादासाहेब साळवे डी.एस फाउंडेशन यांच्या वतीने 23 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती संच भेट

 पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क प्रमोद शिंदे

शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री दादासाहेब साळवे सर (D. S. फाउंडेशन) यांच्या वतीने विजयादशमी निमित्ताने जि प शाळा पिरळे येथील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी  23 नवनीत शिष्यवृत्ती प्रश्न संच  विद्यार्थ्यांसाठी मोफत देण्यात आले नेहमीच डी एस फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्कॉलरशिप पुस्तक संच दिले जातात दादासाहेब साळवे हे सध्या पाठक वस्ती या ठिकाणी कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा मोठा सहभाग असतो. तसेच पिरळे येथील प्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच संदीप शेठ नरोळे यांनी सुद्धा 6500 रुपये शिष्यवृत्ती व पुस्तक संचासाठी भेट दिले. पिरळे शाळेच्या मुख्याध्यापिका सुतार/मोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.याबद्दल सर्वांचे शाळेच्या वतीने व शिक्षण समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी जि प शाळेच्या मुख्याध्यापक मोरे मॅडम, माजी सरपंच संदीप नरोळे, अशोक आप्पा तोडकर, अध्यक्ष सुदाम बुधावले, उपाध्यक्ष श्री पांडुरंग कोकरे सामाजिक कार्यकर्ते अमोल वाघ, शिक्षक संजय ढवळे सर,हनुमंत फुले सर,शेंडगे मॅडम,राऊत मॅडम, शिंदे मॅडम,अमोल खरात सर, उदयसिंह पाटील सर, यांच्यासह सर्व स्टाफ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

You may have missed