नातेपुते येथील सुप्रसिद्ध अजित ज्वेलर्सला आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांची सदिच्छा भेट


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे 
नातेपुते येथील सुप्रसिद्ध  अजित ज्वेलर्स रुपनवर सराफ या सोने- चांदी दुकानाला विधान परिषदेचे विद्यमान आमदार रणजीत-सिंह मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. अजित ज्वेलर्स नातेपुते येथे गेली सहा सात वर्षांपसून चांगल्या पद्धतीने सुरू आहे त्यांच्याकडून चोख सोने-चांदी व ग्राहकांना चांगली सेवा दिली जाते. ग्राहकांच्या आग्रहाखातर त्यांनी नातेपुते येथे दहिगव रोडला दुसरी शाखा काढली असून या शाखेला सुद्धा चांगल्या प्रकारचा  मिळत आहे त्याच अनुषंगाने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अजित ज्वेलर्स रुपनवर सराफ या दुकानाला भेट दिली.तसेच मोहिते पाटील कुटुंबाकडून रुपनवर परिवारास पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, राजेंद्र काकडे साहेब, डॉक्टर वाघमोडे, नातेपुते नगरपंचायतचे मा.उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, माऊली सरक, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच.अजित ज्वेलर्सचे मालक अजित रुपनवर, राजू रुपनवर, महावीर रुपनवर, तसेच रुपनवर परिवाराच्या वतीने विधान परिषदेचे विद्यमान आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

You may have missed