कफ सिरपमुळे मृत्य

दि. १३ ऑक्टोबर : लहान मुलांचा खोकला दूर व्हावा यासाठी दिल्या जाणाऱ्या कफ सिरप या औषधाबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. मध्यप्रदेशमध्ये तर हे औषध घेतल्याने अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. दोन वर्षपिक्षा लहान मुलांना हे औषध देऊ नये, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, यवतम ाळमध्येही असाच काहीसा प्रकारसमोर आला आहे. येथे एका सहा वर्षाच्या मुलाला खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. सुरुवातीला त्याला बरे वाटत होते. नंतर मात्र अचानकपणे त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच त्याला देण्यात आलेल्या औषधांमुळे तर त्याचाम मृत्यू झालेला नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. सरकारने या प्रकरणाची दखल घेतली असून संबंधित मेडिकल मधून औषधांचे नमुने जप्त करून तपासणीसाठी पाठवले आहेत.

You may have missed