पदवीधर – शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी माळशिरस तालुक्यामध्ये मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदार नोंदणीची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२५ आहे. या तारखेपूर्वी दोन्ही मतदार संघांकरीता पात्र व्यक्तींनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभागाच्या या निवडणूकीकरीता मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे दोन मतदारसंघाची नव्याने मतदार यादी तयार करण्याकरीता ०१ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये पदवीधर मतदार संघाकरिता १३ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये माळशिरस शहरामध्ये २. अकलुज शहरामध्ये ४, नातेपुते २, वेळापूर २. दहीगाव १.राज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्र व पिलिव १ मतदान केंद्र तयार करणेत आलेले आहे. तर शिक्षक मतदार संघाकरीता एकुण ७ मतदान केंद्र तयार करणेत आलेले आहेत. त्यामध्ये अकलुज, माळशिरस, दहीगाव, नातेपुते, महाळुंग, पिलिव, वेळापूर येथे प्रत्येकी एक अशी एकुण २० मतदान केंद्र माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये तयार करणेत आलेली आहेत. पदवीधर मतदार संघाकरीता फॉर्म नंबर १८ तर शिक्षक मतदार संघाकरीता फॉर्म नंबर १९ पात्र मतदार यांनी भरुन द्यावयाचा आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून अकलूज विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी, माळशिरस – सुरेश -शेजुळ, तहसीलदार माळशिरस, दहिगाव अमोल कदम, नायब तहसीलदार माळशिरस, नातेपुते-प्रवीण सुळ, निवडणूक नायब तहसीलदार, महाळुंग- सुमित जाधव मुख्याधिकारी नगरपंचायत अवाहन आले आहे. वेळापूर-सिद्धनाथ जावीर महसूल नायब तहसीलदार, पिलीव रघुनाथ पांढरे गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांची नियुक्ती करणेत आलेली आहे. सदर अधिकारी यांचेकडे मतदार यांनी जास्तीत जास्त फॉर्म भरुन द्यावयाचे आहे. तसेच ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी https://mahaelection.gov. in या लिंकचा वापर करावा असे मतदारांना

