शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न
दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत
कार्यक्रमाचे स्थळ : ग्रामपंचायत कार्यालय, लोणंद ता.माळशिरस जि.सोलापूरशिवप्रसाद उद्योग समुहाच्या चेअरमन तसेच मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमामध्ये
1) मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी)2) मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट)3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)4) मोफत कॅन्सर तपासणी
5) मोफत रक्त तपासणी
6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया
7) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया
8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रियावरील आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या, यावेळी या शिबिराचा 490 नागरिकांनी लाभ घेतला.
मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली.उपस्थिती :
मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे,
डॉ.लताताई मोरे, डॉ.दिपाली देसाई,
सौ.वनिता खंदारे (सरपंच), प्रियंका नीटवे (सरपंच नीटवेवाडी), श्री. मानसिंग मोहिते (मा. पंचायत समिती सदस्य), श्री. हनुमंत रुपनवर, धनाजी इंगळे, वैभव शिंदे, अशोक पवार, धनाजी खुडे, अंकुश राऊत, अनिल रुपनवर, रमेश फुले, महादेव रुपणवर, ज्ञानदेव मोहिते, बाळासो गाडे, बापूराव नीटवे, अनिता खुडे, ज्ञानदेव ननवरे, सुशांत पाटील, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी.



