बैंक ऑफ महाराष्ट्रच्या खातेदाराची तीन लाखांची फसवणूक
सोलापूर :अकाऊंट नंबर चुकल्याचे सांगून ड्रॉप बॉक्समधून चेक काढला. तो दुसर्या बँकेत वटवून बँक ऑफ महाराष्ट्रमधील २८ खातेधारकांची ३ लाख हजारंची फसवणुक केली या प्रकरणी दोघांविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विक्रम कुमार सिंग हे बँक ऑफ महाराष्ट्रच्या जुळे सोलापूर शाखेत कार्यरत आहेत. २४ सप्टेंबर रोजी दुपारी एका अनोळखी व्यक्तीने आली. त्या व्यकतीनेबँकेच्या शाखेत येऊन त्याने बँकेतील ड्रॉप बॉक्समध्ये जमा केलेल्या चेक स्लीपवरील अकौंट नंबर चुकला आहे, तो दुरूस्त करायचा आहे, तो चेक मला काढून द्या असे सांगूनविक्रम कुमार याची दिशाभूल केली. त्यावेळी विक्रम कुमार याने ड्रॉप बॉक्समधील निलकंठ को-ऑप. बँक लि. खाते क्र. ००२०००६०७०००००५६ याचा ३ लाख २८ हजार १८६ रुपयांचा चेक क्रं. ०००२७४ हा घेऊन त्यात फेरफार करून युको बँक खाते क्र. ०३४४०११०६२२३४ यामध्ये वटवून घेतला. ती रक्कम काढून घेऊन डोअर्स वर्ल्ड यांच्या औंदुबर शिंदे व हरिभाऊ माने यांची फसवणुक केली. याबाबत विक्रम कुमार मितलेशप्रसाद सिंग (रा. ज्ञानेश्वर नगर, जुळे सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
