महाराष्ट्र आता ‘कांटम कॉरिडॉर’च्या नकाशावर : मुख्यमंत्री फडणवीस

: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कॉम्प्युटिंग माध्यमातून महाराष्ट्राला तंत्रज्ञानातील जागतिक नकाशावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, अमेरिकेची आयओएनक्यू आणि स्वीडनची स्कैंडियन एबी या दोन नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांस-ोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्र आता क्वांटम कॉम्प्युटिंग नकाशावर येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कॉम्प्युटिंग हे जागतिक अर्थव्यवस्थेचे दोन प्रमुख स्तंभ बनले आहेत. महाराष्ट्र शासनाला ‘क्वांटम कॉरिडॉर’ स्थापनेसाठी भागीदारी करताना अभिमान वाटतो. हा उपक्रम राज्य देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदलघडवेल. शासन या प्रवासात सर्वतोपरी सहकार्य करेल आणि उद्योगांना अखंड वाढीसाठी सुलभ वातावरण उपलब्ध करून देईल.आयओएनक्यू, मेरीलँड, अमेरिका ही क्वांटम कॉम्प्युटिंग क्षेत्रातील अग्रणी कंपनी असून ट्रॅप्ड-आयन तंत्रज्ञानास आणि ाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. ही कंपनी मेझॉन ब्रैकेट, मायक्रोसॉफ्ट अइयूरआणि गुगल क्लाउड यासारख्या क्ल-ाउड प्लॅटफॉर्मद्वारे क्वांटम प्रणालींना प्रवेश उपलब्ध करून देते. ओआयओएनक्यू चे तंत्रज्ञान फार्मास्युटिकल संशोधन, लॉजिस्टिक्स, फायनान्शियल मॉडेलिंग आणि इतर औद्योगिक क्षेत्रांमध्ये वेग, अचूकता आणि शाश्वतता वाढवते. महाराष्ट्रातील डिजिटल परिवर्तन आणि उन्नत तंत्रज्ञानाधारित रोजगार निर्मितीसाठीहे सहकार्य निर्णायक ठरणार आहे.स्कैंडियन एबी, गोथेनबर्ग, स्वीडन ही कंपनी अभियांत्रिकी, बांधकाम, वित्त आणि औद्योगिक पायाभूत सुविधा विकासात कार्यरत आहे. स्कैंडियन एबी आपल्या प्रकल्पांमध्ये क्वांटम वर्धित ऑप्टिमायझेशन, प्रेडिक्टिव अॅनालिटिक्स आणि ऊर्जा कार्यक्षमतेसारख्या तंत्रज्ञानांचा समावेश।

You may have missed