आरोपींना तत्काळ अटक करा, सातारा महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फडणवीसांचे एसपींना आदेश

सातारा जिल्हातील फलटम उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे धक्कादायक बाब म्हणजे या महिला डॉक्टरने फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या प्रकरणी पीएसआय गोपाळ बदणे आणि प्रशांत बनतर या दौघांवर आरोप करण्यात आले असून पीडित महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर तिच्यावर आलेल्या अत्याचाराबाबत लिहिले असून आणि याच कारणामुळे ती आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे या प्रकरणाची आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून त्यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना उघडकीसआल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवर नेमके काय बोलणे झाले? त्यांनी या प्रकरणी कोणते आदेशदिले? याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले की, आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे. एका आरोपीचे नाव पीएसआय गोपाल बदने आहे तो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचा आहे दुसरा आरोपी प्रशांत बनकर आहे तो पोलीस नसून तो सामान्य नागरिक आहे. या प्रकरणात आम्ही गोपाळ बदने याला निलंबित करत आहोत. या दोघांना अटक करण्यासाठी पोलीस पथक त्याना करणयात आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईच्या सूषना दिलेल्या आहेत. आरोपींना तत्काळ अटक करायची आणि जी काही कारवाई आहे ती करण्याचे स्पष्टआदेश दिले आहेत. स्पानुरसर आम्ही तपास करत आहोत, असे दोशींनी सांगितले. तर, या प्रकरणी गृहराज्य मंत्री पंकज भोयर म्हणाले की, फलटण येचील उपजिल्हा कार्यालयातील महिलेने आत्महत्या केली आहे सुसाइड नोट सापडली आहे. त्यात दोन पोलीस अधिका-यांची नावे आहेत. सातारा पोलीस अधीक्षकांशी फोनवरून चर्चा झाली आहे. स्यांना तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. या घटनेत जो कोणी सहभागी असेल त्याच्यावर कारवाई होईल. जो अहवाल वेईल त्यात ज्या कोणाचा सहभाग असेल त्यावर देखील कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे

You may have missed