कार्तिकी वारीसाठी एक कोटींचा निधी मंजूर

दरवर्षी कार्तिकी एकादशीला आळंदी येथे लाखो वारकरी दाखल होतात. यंदाच्या कार्तिकी वारीपूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीसह विविध विकासकामांना गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. यासाठी नगरविकास विभागामार्फत एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिंदे यांनी शासन वारकऱ्यांच्या पाठीशी असून, भागवत धर्म, प्रथा आणि परंपरांचा सन्मान राखत असल्याचे अधोरेखित केले.आळंदी नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत विविधविकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि शुभारंभ उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, विधान उपसभापती डॉ. नीलम परिषदेच्या गोहे, आमदार बाबाजी काळे, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ उपस्थित होते.उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र ही संत आणि शूरवीरांची भूमी आहे. शासनाने वारकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत.

You may have missed