चांदीपाठोपाठ सोनंही स्वस्त; लग्नसराई त सोने खरेदीचा मोठा होणार फायदा
दिवाळीनंतर सर्वसाम ान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. चांदीच्या किमतीत मोठी घट झाल्यानंतर आता सोन्याच्या दरातही लक्षणीय घसरण झाली आहे. काही आठवड्यांपूर्वी १.३२ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलेले सोन्याचे दर आता १.२१ लाखांवर आले आहेत. ही घसरण लग्नसराईच्या हंगामात सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. चांदीच्या किमतीतही १६ ते २५ ऑक्टोबर दरम्यान ३५,००० रुपयांची घट झाली असून, सध्या १०० ग्रॅम चांदी १५,५०० रुपये आणि १ किलो चांदी १,५५,००० रुपये आहे. पण सोन्याच्या किमती आणखी किती खालीयेतील आणि का घसरत आहेत, जाणून घ्या. सोन्याच्या किमती २०२५ मध्ये ५६% वाढल्या होत्या, पण आता तांत्रिक सुधारणेम ळे ३% घसरण झाली आहे. ही सुधारणाबाजार स्थिर करण्यासाठी स्वाभाविक आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या शक्यतेमुळे आणि डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्यावर दबाव वाढला. अमेरिका-भारत व्यापार करार आणि अमेरिका-चीन चर्चे च्या सकारात्मक बातम्यांमुळे गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेपासून शेअर बाजारासारख्या जोखमीच्या गुंतवणुकीकडे वळले आहेत.