कोल्ड स्टोअरेजसाठी पाठपुरावा करू खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची ग्वाही
अकलूज बाजारसमितीने घोड्यांसाठी धावण्याच्या विविध स्पर्धा आयोजित केल्यास देशासह परदेशाचे नागरिक येथे हजेरी लावतील व अकलूजचे पर्यटनही वाढीला लागेल. घोडे निगराणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे शिबिर आयोजित करावे, अशी सूचना खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली. तसेच बाजार समितीच्या मका हमीभाव केंद्र व कोल्ड स्टोरेजसाठी शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समि तीच्यावतीने दिवाळी पाडव्यानिमित आयोजित १७ व्या घोडे बाजाराचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह म ोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.सचिव राजेंद्र काकडे यांनी घोडेबाजारातआतापर्यंत ७२० घोड्यांची आवक झाली असुन एक कोटीपेक्षा अधिकची उलाढाल झाली आहे. घोडे बाजारात ७०० ते ८०० घोडे दाखल होणार आहेत. सूत्रसंचालन धनंजय देशमुख यांनी केले. आभार नितीन सावंत यांनी मानले. यावेळी बाजार समि तीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. उत्तमराव जानकर, सयाजीराजे मोहिते पाटील, राष्ट्रवादीचेजिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, अतुल चव्हाण, रणजित चौरे, बाबाराजे देशमुख, उपसभापती मामासाहेब पांढरे, रामचंद्र सावंत पाटील, देविदास ढोपे यांच्यासह बाजार समिती आजी-माजी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते.