गोरडवाडी येथे शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व चष्मे वाटप शिबिर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत.संत बाळूमामा मंदिर, गोरडवाडी ता.माळशिरस जि.सोलापूर येथेशिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा.श्री. शरद (बापु) मोरे तसेच मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. यावेळी गोरडवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने बापूसाहेब व ऋतुजाताई यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमामध्ये 1) मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी) 2) मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट)3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)4) मोफत कॅन्सर तपासणी5) मोफत रक्त तपासणी6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया7) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रियाअशा आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या, यावेळी या शिबिराचा 517 नागरिकांनी लाभ घेतला.मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली. या कार्यक्रमासमा.श्री.शरद (बापु) मोरे, सौ.ऋतुजाताई शरद मोरे,डॉ.लताताई मोरे, श्री.पांडुरंग पिसे (सरपंच) श्री.नवनाथ केंगार (उपसरपंच), श्री. मच्छिंद्र गोरड (सदस्य), श्री.रामचंद्र गोरड (मा.सरपंच), श्री.सच्चीदानंद पिंगळे (कार्यकर्ते), श्री.संतोष गोरड, श्री.दीपक (आबा) गोरड (मा.उपसरपंच) श्री.तुकाराम गोरड (सहकारी), श्री.जगन्नाथ गोरड (सर), श्री.भारत गोरड (सर), श्री.लक्ष्मण (तात्या) गोरड, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी


