दहिगाव येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्नरथोत्सवा निमित्त २५ वर्षांची परंपरा; ५५० हून अधिक रुग्णांनी घेतला लाभ
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
श्री १०००८ महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव येथील वार्षिक रथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, दिनांक१० नोव्हेंबर 2025 रोजी भव्य मोफत नेत्र, सांधे प्रत्यारोपण, आणि हृदयरोग उपचार शिबिर. ॲड. श्री धन्यकुमार मोहनलाल दोशी फाउंडेशन, मुंबई आणि श्री १०००८ महावीर स्वामी दिगंबर अतिशय क्षेत्र, दहिगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दहिगाव येथे रथोत्सवानिमित्त सार्वजनिक शिबिर आयोजित करण्याची गेली २५ वर्षांची परंपरा असून, यंदाचा हा २६ वा सामाजिक उपक्रम होता.शिबिराचे उद्घाटनसकाळी ९:३० वाजता दहिगाव येथील श्री जंबुकुमार गौतमचंद दोशी गुरुकुल येथे या शिबिराचे उद्घाटन झाले. मेहता मेडिकेअर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, बारामती येथील डॉ. विशाल मेहता आणि संदीप विलासचंद्र दोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.शिबिराचे वैशिष्ट्ये या शिबिराला श्री १०५ अतिशयकारी विगुनसागरमहाराज यांचे सानिध्य आणि आशीर्वाद लाभले विकून सागर जी महाराज बोलताना म्हणाली की डॉक्टर हे शरीराचे इलाज करत असतात संत हे आत्म्याचे इलाज करतात दोन्ही इलाज खूप महत्त्वाचे आहेत याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे.शिबिरात ५५० हून अधिक रुग्णांनी तपासणीचा लाभ घेतला. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तपासणी तसेच उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत यामध्येहृदयरोग शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण मुतखडा आणि प्रोस्टेटच्या शस्त्रक्रिया मशीनद्वारे डोळे तपासणी आणि चष्मा वाटप डोळ्यांचे ऑपरेशनतपासणी केलेल्या रुग्णांना साधारण एक लाख रुपयांची औषधे मोफत वाटण्यात आली, तसेच १०० जणांना मोफत चष्मे देण्यात आले. पुढील मोफत शस्त्रक्रियाया शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांपैकी: साधारण ४० रुग्णांचे डोळ्यांचे ऑपरेशन फलटण येथील लायन्स मुधोजी आय हॉस्पिटल, फलटण येथे मोफत करण्यात येणार आहे. हृदय आणि सांध्यांच्या आजाराविषयीचे रुग्ण आणि गरजू रुग्णांना पुढील तपासणी करून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया मेहता मेडिकेअर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, बारामती येथे करण्यात येणार आहे.रुग्णसेवेसाठी बारामती येथून डॉ. शैलेंद्र ठवरे (अस्थिरोग तज्ञ), डॉ. केतन आंबर्डेकर (हृदयरोग तज्ञ), डॉ. विशाल नवले (किडनी विकार तज्ञ), डॉ. सुनील ढाके (एमडी मेडिसिन) यांसह अनेक तज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली. याप्रसंगी दहिगाव गावच्या प्रथम नागरिक सौ. सोनम खिलारे, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन श्री. सत्यशील पाटील, उपसरपंच संदीप सावंत, उपसरपंच श्री. दत्तात्रय पाटील, पोलीस पाटील श्री. मोरे, मंदिरचे ट्रस्ट श्री. संजय दोशी, अमृतलाल गांधी रत्नत्रय एज्युकेशनचे चेअरमन श्री. आनंदलाल दोशी, राहुल दोशी, अमित गांधी, वैभव शहा, डॉ. उदयकुमार दोशी, डॉ. अजिंक्य व्होरा, डॉ. वर्धमान दोशी, रोनक चंकेश्वरा, सोहिल दोशी, विराग गांधी, शितल गांधी, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मंगेश दोशी (अकलूज) यांनी केले, प्रास्ताविक डॉ. तेजस चंकेश्वरा (नातेपुते) यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. नरेंद्र गांधी यांनी केले.हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. चंकेश्वरा व त्यांचे सहकारी श्री. गोमटेश दोशी, डॉ. अनुजा, मेडिकल असोसिएशनचे श्री. अमित शहा, अमोल गांधी, अमित गांधी यांनी विशेष अथक परिश्रम घेतले.








