मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही गावच्या विकासासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय -मा.जि प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख
नातेपुते पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)
पूर्वी पासून मोहिते-पाटील कट्टर समर्थक म्हणून मानले जाणारे सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख हे मोहिते- पाटील जातील तिकडे त्यांच्यासोबत असायचे परंतु गेल्या वर्षभरापासून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे दबक्या आवाजात गुप्त चर्चा होत होती परंतु काल पुढील राजकीय दिशा ठरवणे बाबत विचार विनिमय बैठकीत बाबाराजे देशमुख बोलताना म्हणाले की,गावच्य विकासासाठी मी भाजप मध्ये जाण्याचा निर्णय तुम्हा सर्वांना विचारून घेत आहे कुठल्याही प्रकारच्या अडचणीसाठी मी भाजपमध्ये जात नसून फक्त आणि फक्त नातेपुते गावचा विकास व गावासाठी भरघोस निधी मिळावा यासाठी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की केंद्रात,राज्यात भाजपची सत्ता आहे.गेली 10-12 वर्षात भाजपने विकासाचे काम केले असून त्या माध्यमातून नातेपुतेसाठी एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न करू,मला अनेक पक्षाचे निमंत्रण होते परंतु मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. रामभाऊ सातपुते यांचा मुंबईमध्ये वजन आहे नातेपुते च्या विकासासाठी रामभाऊ सातपुते व माजी खासदार निंबाळकर यांना पाठबळ देऊन नातेपुते गावचा विकास करून चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करू येत्या 18 ते 20 तारखेला प्रवेशाचा जंगी कार्यक्रम होईल असे सांगितले.यावेळी रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष एन के साळवे बोलताना म्हणाली केंद्रात आणि राज्यात रिपाई आणि भाजप महायुती असून इथे सुद्धा गावच्या विकासासाठी आम्ही तुमच्यासोबत आसू, तसेच अकलूज येथील सुजयसिंह माने- पाटील बोलताना म्हणाले की बऱ्याच दिवसापासून बाबाराजे आमच्या सोबत भाजपमध्ये यावेत म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो शेवटी आमच्या प्रयत्नांना यश आले इथून पुढे रामभाऊ सातपुते यांच्यासोबत मिळून विकासाचे काम करू तसेच अनेकांनी बाबाराजे यांना भाजपने योग्य तो मानसन्मान देऊन विधान परिषदेवरती संधी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली. किशोर पलंगे, सतीश सपकाळ, प्रकाश साळवे, बशीर काजी,अभिजीत वाळके सर, प्राध्यापक पिसे सर, महेश शेटे ॲड.शिवाजी पिसाळ,धनंजय भोसले,राहुल पद्मन,अनिल माने, सागर इंगवले यांनी बाबाराजे देशमुख यांच्या समर्थनात मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धैर्यशील भाऊ देशमुख यांनी केले, या कार्यक्रमाचे आयोजन उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,रणवीर देशमुख मित्र परिवार यांनी केले.याप्रसंगी नातेपुते आणि परिसरातील बाबाराजे देशमुख समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– बाबाराजे देशमुख यांच्या तिसऱ्यांदा भाजपा प्रवेशाने माळशिरस तालुक्यातील राजकारणात मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे तसेच मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर गटाला मोठा धक्का बसणार असून भविष्यात नातेपुते येथे मोहिते- पाटील व जानकर गट कोणत्या नेत्याला ताकद देणार हा येणारा काळच ठरवेल













