पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने पिरळेत विविध कार्यक्रमाने संविधान साजरा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
–पिरळे ता.माळशिरस येथे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने २६ नोव्हेंबर भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान कार्यक्रमा निमित्त विविध कार्यक्रम घेऊन संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी सुषमा महामुनी मॅडम ह्या होत्या.प्रमुख अतिथी म्हणून एन डी एम जे चे राज्यसचिव वैभवजी गीते व आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन सामूहिक संविधान प्रास्ताविक वाचन करून करण्यात आली, गावातून संविधान रॅली काढून घरो घरी संविधान उद्देशिका देण्यात आली.तसेच वैभव गिते यांचा 889 पिढीताना शासकीय नोकरी मिळवून दिल्या बाबत ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला तसेच मान्यवरांचा भारतीय संविधान व संविधान उद्देशिका देऊन पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने सन्मान करण्यात आला.तसेच 126 वृक्षांचे वाटप,शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप,शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची पुस्तकाचे वाटप,मोफत डोळे तपासणी व मोतीबंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच माळशिरस तालुक्यातील एमपीएससी परीक्षेत पास होऊन प्रशासकीय अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला व केक कापून 26 नोव्हेंबर संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण तसेच राज्यस्तरीय चित्रकले स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले तसेच 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस कर्मचारी व पिरळे येथील शहीद झालेले सुपुत्र सुभेदार अरुण पालेकर यांना अभिवादन करून मानवंदना देण्यात आली.यावेळी राज्यसचिव वैभवजी गीते बोलताना म्हणाली की पुरोगामी महाराष्ट्र परिवाराने संविधानाला अभिप्रेत असा देखण कार्यक्रम घेतलेला आहे प्रमोद शिंदे आणि त्यांचे सहकारी असे कार्यक्रम घेऊन पिढी घडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत.गटशिक्षणाधिकारी महामुनी मॅडम बोलताना म्हणाल्या आज मी या पदावर आहे ते केवळ फक्त संविधानामुळे व महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच, संविधानाने आपण कसं राहावं याचे आपल्याला नियम घालून दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे ,माजी सरपंच संदीप तात्या नरोळे, पोलीस पाटील औदुंबर बुधवले, एम पी एस सी स्पर्धेत यश मिळवलेले विद्यार्थी सागर केशव रणनवरे(सहायक संचालक -वित्त व लेखा),दिपाली शिवाजी खरात (सहायक राज्यकर आयुक्त) माळशिरस तालुक्यातील पहिली पायलट कल्याणी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच
शितल नारायण वाघमोडे (CBSC अधीक्षक)
काजल भोसले (राजपत्रित अधिकारी) यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.यावेळी उद्देशिकेचे वाचन रॅलीचे आयोजन प्रा.मुख्याध्यापक संजय ढवळे सर यांनी केले.
याप्रसंगी विस्ताराधिकारी कादर शेख,मुख्याध्यापक मंदाकिनी सुतार मॅडम,दादासाहेब साळवे सर, सरपंच अमोल शिंदे, मोहन पवार,अध्यक्ष आशा बुधावले, प्रशांत खरात,विश्वास बनकर,दत्ता कांबळे,सचिन झेंडे, हनुमंत धाइंजे, तसेच शिक्षक स्टाफ विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्र संचालन हनुमंत फुले सर यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्र परिवाराचे प्रमुख प्रमोद शिंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हनुमंत फुले सर संजय ढवळे सर,मीना शेंडगे मॅडम,अमोल खरात सर,पाटील सर, शिंदे मॅडम, फुले मॅडम सर्व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले.



































