जि प शिक्षक साळवे दापत्यांचा सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी असणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक दादासाहेब साळवे व त्यांच्या पत्नी सौ.माया काटे/ साळवे या दांपत्याने आपल्या लग्नाचा 25 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. नेहमीच दरवर्षी हे साळवे दांपत्य विविध सामाजिक उपक्रम राबवून आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत असतात. गेली 25 वर्ष हे विविध उपक्रम राबवत आहेत.यावर्षी त्यांनी संपूर्ण कुटुंबा समवेत पंढरपूर नजीक असलेले गोपाळपूर येथील मातोश्री वृद्ध आश्रमातील वृद्धांना भोजनदान देऊन आपला वाढदिवस वृद्धांसोबत अनोख्या पद्धतीने साजरा केला. वृद्धाश्रमातील वृद्धांनी या दापत्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे औक्षण करून उत्साहामध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा केला.नेहमीच ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच वृक्षारोपण अशा विविध प्रकारे आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत असतात.वर्षभरात एक ते दीड लाख रुपये विविध सामाजिक उपक्रमासाठी ते खर्च करत असतात त्यामुळे त्यांना अनेक संस्थांनी आदर्श शिक्षक व इतर पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे.त्यामुळे पंचक्रोशीत दादासाहेब साळवे सर व त्यांच्या पत्नी माया साळवे/काटे मॅडम यांचे नेहमीच कौतुक होत असते दादासाहेब साळवे सर हे सध्या जि प शाळा पाठक वस्ती मांडवे येथे कार्यरत असून सौ.माया काटे साळवे मॅडम ह्या जिप शाळ एकशिव या ठिकाणी कार्यरत आहेत.




