प्रमोद शिंदे

बीडमध्ये शेतीच्या वादातून झालेल्या पारधी समाजातील तिहेरी हत्याकांडाचा तीव्र निषेध – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

बीडमध्ये शेतीच्या वादातून झालेल्या पारधी समाजातील तिहेरी हत्याकांडाचा तीव्र निषेध – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -मुंबई दि. 15 – बीड मधील केज तालुक्यातील मांगवडगाव येथे शेतीच्या वादातून पारधी समाजातील एकच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या तिहेरी हत्याकांडाचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला आहे.
पारधी समाजातील तीन जणांची शेती च्या वादातून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या तिहेरी हत्याकांडाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबत बीड चे जिल्हा अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी त्याच प्रमाणे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी आपण संपर्क साधणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.
रिपब्लिकन पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे याप्रकरणाकडे लक्ष ठेऊन असून पीडित कुटुंबाची रिपाइं चे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे तसेच गौतम बचुटे; बाळासाहेब ओव्हाळ या रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तात्काळ भेट घेतली आहे. अन्यायग्रस्त पारधी समाजाच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष उभा असून गरीब शोषित वर्गाला न्याय देण्यासाठी शोषित समुहाला रिपब्लिकन पक्ष कायम साथ देत असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

        

नातेपुते ग्रामपंचायतीने 15 टक्के निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले

पँथर संघर्ष सोरटे यांनी गरिबांच्या चुली पेटवल्या

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –कोरोना कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शासनाने लॉकडाऊन ची घोषणा करून अंमलबजावणी सुरू केल्याने महाराष्ट्रतील गरीब,होतकरू,कष्ट करी मागासवर्गीय कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.येणाऱ्या काळात लोक कोरोना ने कमी पण उपासमारीने जास्त मरतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
परंतु आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास (दादा) धाइंजे व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभवजी गिते साहेब यांनी परिस्थिचे गांभीर्य ओळखून तात्काळ माळशिरस तालुक्याचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा 15 टक्के निधी हा मागासवर्गीयांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी वापरावा अशी मागणी केली गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी मान्यता देऊन सर्व ग्रामपंचतीस 15%निधी जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मागासवर्गीय कुटुंबाना वाटावा असे आदेश काढले, परंतु नातेपुते ग्रामपंचायतीने जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपात कोणतेही पाऊल उचलत नाही असे पँथर संघर्ष सोरटे यांच्या निदर्शनास येताच रिपाइंचे शहर अध्यक्ष संघर्ष सोरटे यांनी ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे पाठपुरावा करून निवेदन देऊन सामाजिक कौशल्य वापरून जीवनावश्यक वस्तू चे किट प्रत्येक मागासवर्गीय गरीब कुटुंबांपर्यंत पोहचवले.
हा पाठपुरावा करत असताना पँथर संघर्ष सोरटे यांना
रिपाइंचे नेते एन.के साळवे यांचे मार्गदर्शन मिळाले त्याचबरोबर विशाल साळवे, विनोद रणदिवे,समित सोरटे,वैभव सोरटे,राकेश सोरटे,राहुल सोरटे,विशाल सोरटे यांची साथ मिळाली यावेळी पाचशे कुटुंबीयांना लुंबिनी बुद्ध विहार येथे किट वाटप करण्यात आले यावेळी नातेपुते गावचे सरपंच ऍड.डी.वाय राऊत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मामासाहेब पांढरे उपसरपंच सुनंदाताई दादासाहेब उराडे ,ग्रामपंचायत सदस्य अण्णा पांढरे, भारत सोरटे, महावीर साळवे, इत्यादी उपस्थित होते.
जनतेवर उपासमारीची वेळ येताच संघर्ष सोरटे यांनी दाखवलेले धाडस केलेला पाठपुरावा पाहून नातेपुते शहरातील व पंचक्रोशीतील जनता संघर्ष सोरटे यांचे कौतुक करून आभार मानत आहेत.
संघर्ष सोरटे यांनी गरिबांच्या चुली पेटविल्या अशी चर्चा घराघरात सुरू आहे.

सोशल संस्थेच्यावतीने स्यानीटायझर व मास्क याचे पोलिसांना वाटप

सोशल संस्थेच्यावतीने स्यानीटायझर व मास्क याचे पोलिसांना वाटप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे )-सोशल ही संस्था समाजातील वंचित दुर्लक्षित घटकाकरिता गेली दहा वर्षापासून कार्यरत आहे आरोग्य, शिक्षण,मुले दत्तक योजना,लाडली योजना, पंढरपूर वारी निमित्त मोफत आरोग्य शिबिरे,दुष्काळग्रस्त बांधवास मोफत आरोग्य सेवा, शालेय साहित्य मदत ,ग्रामविकास, महिला सबलीकरण अशा मुद्द्यावर अविरतपणे कार्यरत आहे.
देशासह राज्यात कोरोना ने भीषण संकट निर्माण केले आहे. पोलीस दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी कोरोना या साथीच्या आजाराशी लढा देत आहेत.अनेक पोलीस कोरोना बाधित होत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्याकडे पुरेशी साधने नाहीत.या पार्श्वभूमीवर सोशल डेव्हलपमेंट सोसायटी वतीने बंदोबस्तासाठी असणाऱ्या अकलूज ,वेळापूर,माळशिरस व पिलीव परिसरातील पोलिसांना स्यानिटायझर ,गोल्ज व मास्क इ वस्तूचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर नागरी आघाडीचे नेते अरीफखान पठाण सोशल संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे,रिपाइंचे रणजित सातपुते,जय मल्हार चे अरुण बोडरे,संजय करडे इ मान्यवर उपस्थित होते

पिंपरीत 15 टक्के निधीतून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ….

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -मौजे पिंपरी ता.माळशिरस जि.सोलापूर येथे ग्रामपंचायतिच्या 15 टक्के निधीतून मागासवर्गीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप झाले.एकूण 42 कुटुंबांना बाराशे रुपयांचे एक महिना पुरेल एवढे एक किट देण्यात आले.
आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे,वैभव तानाजी गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी मनसेचे जिल्ह्याचे नेते आप्पासाहेब करचे,भटक्या विमुक्त संघटनेचे अर्जुन सरगर,ग्रामसेवक करे भाऊसाहेब,पोलीस पाटील,संजय झेंडे,रणजित कसबे,गणेश गायकवाड,विशाल झेंडे,विशाल गायकवाड, संभाजी साळे,नवनाथ भागवत उपस्थित होते.

मजुरांनी चालत आपल्या घरी जाऊ नये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मुजोरांना आवाहन

मजुरांनी चालत आपल्या घरी जाऊ नये रामदास आठवले यांचे मुजोरांना आव्हान
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – (प्रमोद शिंदे) लॉक डाऊन मुळे देशातील व महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून देशातील व महाराष्ट्रातील मजूर पर्याय नसल्याने आपल्या गावी चालत जाण्यासाठी निघाली आहेत त्यामुळे अपघात व अनेक घटना घडत असून मजूर वर्गाने चालत आपल्या घरी जाऊ नये असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मजुरांना केले आहे
 तसेच ते म्हणाले की शासनाने रेल्वे व बस ची सुविधा सुरू केली आहे. मजुरांनी रेल्वे व बसनेच आपल्या घरी गेले पाहिजे. सरकारने मजुरांना मास्क, सानीटायझर व सुरक्षेची साधने दिली पाहिजेत. औरंगाबाद रेल्वे अपघात मृत्युमुखी पडलेल्या 16 मजुरांना प्रत्येकी 25 लाख रुपये सरकारने द्यावेत
 अशी मागणी सुद्धा रामदास आठवले यांनी केले आहे.



आपल्या घरी पायी निघाले मुजोर
शासनाने मजुरांसाठी रेल्वेची सुविधा केली आहे
औरंगाबाद रेल्वे अपघात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या वारसास प्रत्येकी 25 लाख रुपये द्या आठवले यांची मागणी

गुरसाळे येथील कोरनटाईन केलेल्या युवकांनी निर्माण केला आदर्श

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) गुरसाळे ता. माळशिरस येथील कोरनटाईन केलेल्या युवकांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.गुरसाळे जी.प.प्राथमिक शाळा या ठिकाणी कोरनटाईन केलेल्या गुरसाळे गावच्या रविंद्र महादेव झेंडे, नितीन भिमदेव चव्हाण, प्रवीण कुमार झेंडे, दत्तात्रय मल्हारी रणदिवे हे पेंटिंग चे काम करतात कोरन टाईन केल्यानंतर करायचं काय?वेळ कसा?घालवायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता त्यांनी शाळेच्या इमारतीकडे पाहिले व शाळेचे इमारत खराब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी शाळेला रंग देण्याचे ठरवले यांनी त्यांच्या कलर कामातील अनुभव शाळेच्या रंग रंगोटी साठी स्वतःहून उपयोगात आणला.ग्रापंचायत गुरसाळे,शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक स्टाफ,ग्रामस्तरिय कृती समिती आणि गावातील दानशूर लोकांनी वर्गणी करून रंग व इतर साहित्य दिले आणि या चार युवकांनी रंगकाम सुरू केले. त्यांच्या या स्वयंस्फूर्तीने कामाचे सर्वत्र स्तरातून कौतुक होत आहे.

गुरसाळे येथील कोरन टाईन केलेले युवक जिल्हा परिषद शाळेत स्वयंस्फूर्तीने रंग देताना

उपविभागीय ( प्रांत) अधिकारी शमा पवार यांच्यावर कारवाई करा- ऍड सुमित सावंत

उपविभागीय ( प्रांत) अधिकारी शमा पवार यांच्यावर कारवाई करा- ऍड सुमित सावंत
नातेपुते (प्रमोद शिंदे): उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी मॉकड्रीलच्या नावाखाली मौजे कोळेगांव हद्दीतील दुपडेवस्ती येथे कोरोना संक्रमित रूग्ण आढळल्याचे पत्र काढून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याने त्यांचेसह संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एड. सुमित राजू सावंत यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दिनांक 06/05/2020 रोजी माळशिरस विभागाच्या उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी क्र.कार्या/अ-2/जबाबी/कावि/556/2020 या पत्रान्वये मौजे कोळेगांव हद्दीतील दुपडेवस्ती येथे एक कोरोना संक्रमित रूग्ण आढळला असून त्यास सोलापूरातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यामुळे तेथून 5 किमीचा परिसर बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचा आदेश पारित केला होता. दरम्यान सदरचे व्हायरल झालेले पत्र कार्यालयाच्या लेटरपॅडवर प्रसिध्द झाले असून या पत्रावर उपविभागीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळेच संपूर्ण जिल्ह्याची धास्ती वाढली होती. मात्र सदरचा प्रकार दुपारनंतर डेमो असल्याचे समजले. परंतु जगभरातील कोरोनाचे वाढते रूग्ण व त्याचे बळी वाढत असताना व सर्वसामान्य माणसांमध्ये कोरोना बद्दल धास्ती असताना अशा प्रकारची अफवा प्रशासनाद्वारेच पसरवून सर्वसामान्य जनमाणसांत भीतीसह असुरक्षिततेची भावना वाढविल्याने लोक भयभीत झाले. वास्तविक पाहता असा आदेश काढून मॉकड्रील घेऊन सामान्य जनतेत भीती व अफवा पसरविण्यास योग्य वातावरण निर्माण करणे कितपत योग्य आहे? असा संतप्त सवाल सूज्ञ नागरिकांतून विचारला जात आहे. त्याचबरोबर सध्या कोरोना व इतर सारीसारख्या जीवघेण्या महाभयंकर रोगांची साथ सुरू असताना व केंद्रासह महाराष्ट्र शासनाचे कोरोनासह अशा रोगांवर चुकीची कमेंट करणे, अफवा पसरविणे हे गुन्हा आहे व हे करू नये असे सुस्पष्ट सक्तीचे आदेश असताना उपविभागीय अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे सदर आदेशांना केराची टोपली दाखवली. त्याचबरोबर संदर्भीय आदेश सोशल मिडीयावर व्हायरल करून जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण करून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण केल्याने एड. सुमित सावंत यांनी या प्रकाराचा, घटनेचा जाहीर निषेध केला. तसेच समाजात चुकीचा संदेश जाण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या संबंधित सर्वच अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर सखोल चौकशी करून यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एड. सुमित सावंत यांनी केली आहे.

उपविभागीय प्रांत अधिकारी शमा पवार यांनी विषाणू संक्रमित पेशंट सापडले चे लेखी काढलेले पत्र
ऍड सुमित सावंत यांनी मा जिल्हाधिकारी यांना प्रांताधिकारी शमा पवार मॅडम यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात दिलेले निवेदन

मदर्स डे निमित्तानेआई अनुसायाची यशोगाथा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क-साधारणतः 1982 साली नीराब्रिज , एकशिव , तालुका माळशिरस ,जिल्हा सोलापूर .येथील रहिवाशी गुलाब आनंदा बनसोडे यांची जेष्ठ कन्या अनुसया हिचा वयाने 16 वर्ष मोठा असलेल्या मुंबईस्थित पोलीस मुलाशी विवाह झाला खरा . परंतु मुंबईत आल्यापासून तिचे वनवासाच सुरु झाले . त्रास सुरु झाला . नवरा पोलीस असल्यामुळे इतरांचे काही चालत नसे . परंतु लग्नानंतर मुलीचे सासर हेच सर्वस्व असते त्या प्रमाणे तिने अगदी खंभीर पणे आहे त्या प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले. आस्यातच 10-12 वर्ष निघून गेली , 3 मुलींच्या पाठीवर 1 मुलगा झाला . तरीही त्रास चालू होता .उलट या चिमुरड्यांमुळे तिची दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली . परंतु या परिस्तितीत मुलांमुळं तिला जगण्याचं बळ आलं.अन वेळप्रसंगी घरचा , मुलांचा शाळेचा खर्च भागवण्यासाठी , मुलींच्या हॉस्टेल मध्ये काम करुन , तेथील मुलीना जेवणाचे डबे पूरवून परिस्थितीला न घाबरता जोमाने,जिद्दीने,चिकाटीने खंबीरपणे सामोरे जाऊन , मुलांना शिक्षण देऊन, उच्च शिक्षित बनवले, त्याच बरोबर , सुसंस्कृत बनवून धम्माचे अनुयायी बनवले . आज त्याचेच फळ म्हणून मोठी मुलगी मंजुषा सौदी अरेबिया येथे उच्च पदावर कार्यरत आहे . तर दुसरी मुलगी आणि मुलगा सुद्धा मुंबई मध्ये अभियंता पदावर कार्यरत आहेत .
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्याच्यामुळे हा सर्व त्रास सहन करावा लागला तो नवरा म्हातारपणी जेंव्हा आजारी पडला तेंव्हा सुद्धा धम्माच्या नितीप्रमाणे सर्व माफ करुन त्याची 2वर्ष अविरत सेवा केली . ज्या वडिलांनी कधी डोक्यावरून मायेने हाथ फिरवला नाही त्या वडिलांची एव्हडी सेवा या उच्च sikshit मुलांनी केली आहे तशी मुले क्वचितच आजच्या युगात भेटतील .व्हिडीओ पाहून कदाचित तुमच्या लक्षात येईल . हे सर्व फक्त आणि फक्त त्या अडाणी आईच्या कष्टचे, त्यागचे फळ आहे . म्हणूनच तिने हा संसाररुपी रथ एकहाती purntwas आणून सोडला आहे . अत्यंत बिकट परिस्तिथीवर खंबीरपणे जिद्दीने लढून विजय मिळवनाऱ्या या आईला mothers day च्या लक्ष लक्ष शुभेच्छा . 💐💐💐

https://youtu.be/W3n2g2TRn6Q आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पहात रहा पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल जाहिरात आणि वाचण्यासाठी संपर्क साधा 9975903040, 77 70076737🖋आमच्या चॅनला सबस्क्राईब करा 👍🏻बेल आयकॉन 🛎 दाबून नोटिफिकेशन मिळवा*

मौजे पिंपरी ता.माळशिरस येथे गरीब व गरजू नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मौजे पिंपरी ता.माळशिरस येथे गरीब व गरजू नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने मौजे पिंपरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच व सदस्य उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती विकास दादा धाईंजे यांच्या व मनसेचे जिल्ह्याचे नेते आप्पासाहेब कर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत गहू तांदूळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी एन.डी.एम.जे चे राज्य सचिव वैभव गीते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे, तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे,संभाजी साळे व मंगेश भागवत उपस्थित होते सदर कार्यक्रम पिंपरी ग्रामपंचायतीच्या समोर घेण्यात आला. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते वाल्मिकी झेंडे यांनी पिंपरी गावातील ग्रामस्थांना मदत करावी अशी मागणी केली होती वाल्मिकी झेंडे व मुकेश झेंडे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली यावेळी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
कोरोना covid-19 या विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे अशा परिस्थितीत हाताला काम नसल्याने मजूर गरीब व गरजू नागरिक आबालवृद्ध निराधार नागरे नागरिक यांची उपासमार होऊ नये म्हणून नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्तीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गीते व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने माळशिरस तालुक्यात जात-पात न पाहता गरीब व गरजू नागरिकांना मदत केली जात आहे.

You may have missed