प्रमोद शिंदे

दहिगाव व एकशिव येथे जिवन उन्नती अभियान अंतर्गत H.B कॅम्प कार्यक्रम उत्साहात

नातेपुते( प्रमोद शिंदे) -हिगाव व एकशिव तालुका माळशिरस येथे जिवन उन्नती अभियान अंतर्गत H.B कॅम्प कार्यक्रम उत्सा.दहिगाव व एकशिव येथे 18 व 19 डिसें. रोजी उमेद अभियानाद्वारे चालवण्यात येणाऱ्या अनमोल व जिजामाता ग्रामसंघातील महिला व किशोरवयीन मुलींचा हिमोग्लोबिन दहिगाव मधील 150 महिला व एकशिवमधील 120 महिलांची बचत गटा मार्फत मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी C.C अमित सर,C.C प्रताप वाघमोडे सर,सेंद्रिय शेती व्यवस्थापक गौरी गावडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये महिलांना पैशाची बचत, सक्षमीकरण,शाश्वत उपजीविका,आर्थिक परिस्थिती, शासकीय योजनेमध्ये तसेच शिक्षण आरोग्याची काळजी पंचायत राज संस्थेमध्ये सहभाग घ्यावा हा उमेद अभियानाचा मूळ उद्देश आहे.यावेळी C.T.C ज्योशना साळवे,C.R.P वंदना खिलारे, कुसुम काळे, लेखापाल कुलकर्णी मॅडम,गौरी सोरटे,टेक्निशियम जाडकर मॅडम, दुर्गुडे मॅडम,तांबिले मॅडम, जगताप मॅडम, सूळ मॅडम व ई महिला उपस्थित होत्या.

माळशिरस तालुक्यात एमआयडीसी करण्यासाठी शरद पवार यांना अक्षय भांड यांचे निवेदन

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -बारामती  गोविंद बाग येथे अक्षय भांड व सहकाऱ्यांनी मा.श्री.शरदचंद्र पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेतली भेटीदरम्यान*माळशिरस तालुक्यातील विविध प्रश्ना वर चर्चा केली केली,त्यात प्रामुख्याने माळशिरस तालुक्यात M.I.D.C होण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली आहे माळशिरस तालुक्यातील तरूणांना M.I.D.C मुळे रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि माळशिरस तालुक्यातील व्यावसायिक, शेतकरी, व्यापारी, या सर्व वर्गाचा दर्जा सुधारेल , तसेच नातेपुते ते सरकारी काँलेज होस्टेल करण्यात यावे  तालुक्यातील कारखान्याच्या परिस्थिती मुळे शेतकरी वर्ग पुर्ण पणे कोलमडून पडला आहे. त्यामध्ये दुय्यम वर्गाचे,तसेच व्यापारी, या सर्वांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे, त्यामुळे तालुक्याचा विकास पुर्ण पणे थांबला आहे  या सर्व मागण्यांचा विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे.  या सर्व बाबींवर लक्ष घालू असे आश्वासन मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी तरुणांना दिले निवेदन देताना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते पै.अक्षय भांड,डॉ. सुनील लोखंडे,विधान सभा युवक अध्यक्ष सुमित पवार,आकाश कापसे,लखन चांगण,ओम लाळगे,आकाश भांड,साहिल आनपट व माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

नातेपुते पोलीस स्टेशनचा वर्धापन दिन आरोग्य शिबिर वृक्षरोपणने संपन्न

नातेपुते पोलीस स्टेशनचा वर्धापन दिन आरोग्य शिबिर वृक्षरोपणने संपन्न
नातेपुते (प्रमोद शिंदे)- नातेपुते तालुका माळशिरस येथील पोलिस स्टेशनचा 27 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुंबई येथील 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त दिनानिमित्त मेडिकल असोसिएशन च्या वतीने सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी व कुटुंबीयांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.तसेच डॉक्टर्स व मान्यवरांच्या हस्ते पोलीस स्टेशन आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमादरम्यान माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.पी मोरे बोलताना म्हणाले की सध्याचे जीवन धावपळीचे झाले आहे त्यामुळे डायबेटिस, बीपी सारखे आजार जास्त प्रमाणात होऊ लागले आहेत पोलिसांचं जीवसुद्धा सतत तणावात असते स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे दररोज व्यायाम केला पाहिजे. तसेच सरपंच बी.वाय राऊत म्हणाले की गेल्या सत्तावीस वर्ष नातेपुते पोलीस स्टेशनला चांगले अधिकारी लाभले आहेत व नातेपुते पोलिसांनी चांगले कामगिरी केली आहे. मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरनी घेतलेला आजचा उपक्रम अतिशय चांगला आहे. पोलीस जनतेची काळजी करतात आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस स्टेशनचे ए. पी.आय युवराज खाडे यांनी केले प्रास्ताविकात ते म्हणाले की 16 /12 /1992 रोजी नातेपुते पोलीस स्टेशनची स्थापना झाली आहे. हे पोलीस स्टेशन लोकांच्या सोयीसाठी असून संवेदनशील पोलीस स्टेशन म्हणून ओळखले जाते परंतु नातेपुते व परिसरातील लोक चांगले असल्याकारणाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था चांगली आहे, या कार्यक्रमास सरपंच बी.वाय राऊत, डॉक्टर मोरे, अकलूजचे डॉक्टर समीर बंडगर, डॉ.समीर दोशी डॉ. सर्जे, नातेपुते येथील डॉ. विठ्ठल कवितके, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रेय निटवे, सचिव डॉक्टर वाघमोडे, डॉ. नरेंद्र कवितके, महिला डॉक्टर काजल कवितके, डॉ.योगिता निटवे, डॉक्टर लवटे मॅडम, डॉ.ढोबळे मॅडम, पंचक्रोशीतील अनेक डॉक्टर तपासणीसाठी उपस्थित होते. तसेच मेडिकल असोसिएशनचे आप्पासाहेब शेंडगे, डॉ. मोठे डॉ. दत्तात्रेय नवगिरे,डॉ.कुदळे तसेच सर्व मेडिकल स्टोअर्स यांनी औषध पुरवठा केला.याप्रसंगी पी.एसआय इंगळे, माजी सरपंच अमरशील देशमुख, सरपंच बाजीराव काटकर, अतुल पाटील, राजकुमार हिवरकर, शाहीद भाई मुलांनी, भैया चांगण, संजय उराडे ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत, श्रीकांत बाविस्कर, पंचक्रोशीतील पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवकुमार मदभावी, बबलू गाडे, सिद्धू कंटोळे, विशाल घाडगे, असलम काझी, दत्तात्रेय काटे, पोलीस नाईक माने.ए. एस.आय,राजाराम शिंदे व सर्व पोलिस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औदुंबर बुधावले निकेले

दिल्ली येथे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष मा.एच.एल.दत्तू यांना एन.डी.एम.जे.संघटणेचे साकडे*

दिल्ली ( पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क)-दलीत मानव अधिकार कार्यकर्त्यांवर खोटी केस करणाऱ्या पोलीसांवर तात्काळ कारवाईची मागणी…

ऍड.डॉ.केवल उके यांनी महाराष्ट्रातील खोट्या केसेसबाबत जोरदार युक्तिवाद करत आयोगासमोर प्रभावीपणे बाजु मांडली.

नवी दिल्ली, इंडीयन सोशल इंस्टीट्यूट, लोधी रोड
येथे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष मा.एच.एल.दत्तू (माजी न्यायाधिश, मा.सर्वोच्च न्यायालय) यांना नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटणेचे पदाधिकारी यांनी भेटून निवेदन सादर केले. यावेळी एन.डी.एम.जे.संघटणेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदीप दिपके यांना खोट्या केसमध्ये गुंतवणाऱ्या पोलिस निरीक्षक वैजीनाथ मुंढेंवर कारवाही करण्याची मागणी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव डॉ.रमेश नाथन यांनी केली.

याबाबत अधिक माहीती अशी की हिंगोली जिल्ह्यात जगदीप दिपके हे सामजिक कार्य करत असतांना पोलिसांना अनेकदा अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करत असतात. याचा राग मनात धरून औंढा नागनाथ पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक वैजनाथ मुंढे यांनी जगदिप दिपके सह मोहन दिपके यांचेवर पोक्सो कायद्या अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला व नंतर दुधाळा गावातील सुधिर गिरी यांना हाताशी धरून जगदिप दिपकेंचे घर जाळले व त्यांच्या आई-वडिलांवर हल्ला केला होता.

पोलीस निरीक्षक मुंढे यांचे दलित मानवाधिकार कार्यकर्त्यांवर पोक्सो सारखे खोटे गुन्हे दाखल करने हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे. याचा निषेध म्हणुन पो.नि.मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी एन.डी.एम.जे. संघटनेच्या राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके, राज्य सचिव वैभवजी गिते, राज्य महिला संघटक पंचशीला कुंभारकर व मुंबई-ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष मा.एच.एल.दत्तू.यांना प्रत्यक्ष भेटुन लेखी निवेदन सादर केले. मा.एच.एल.दत्तू.साो यांनी सदर पोलीस निरीक्षक मुंढे यांचेवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती एन.डी.एम.जे. संघटणेचे जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांनी दिली.

चैत्यभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एन. डी.एम.जे च्या वतीने एक लाख पोट कार्डचे निवेदन

मुंबई ( पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क )यंदा चैत्यभूमी दादर येथे नॅशनल दलीत मोमेंट फोर जस्टीस (एन डी.एम जे) या सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक लाख पोस्टकार्ड चे निवेदन पाठवण्यात आले आहे या निवेदनात अनुसूचित जाती जमाती तील लोकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार थांबावे व त्यांना न्याय मिळावा म्हणून विविध मागण्यांचे निवेदन पोस्ट कार्ड द्वारे देण्यात आले या निवेदनात
1) अनुसूचित जाती आणि जमाती च्या आर्थिक विकासासाठी बजेट चा कायदा करा.
2) भिमा कोरेगाव दंगलीतील बौध्दावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे.
3) एट्रोसिटी च्या कायद्याची प्रभावी अमलबजावणी करा.
4) एट्रोसिटी च्या अत्याचारात मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्ती ला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे.
5) एट्रोसिटी चे खटले जलदगती ने निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जलदगती न्यायालय सुरू करावे.
6)खर्डा नितीन आगे खून प्रकरणाचा फेर तपास करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी
7) अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांच्या नोकरीतील आरक्षणामध्ये वाढ करण्यात यावी यासाठी कायदा करण्यात यावा. अशा प्रकारच्या विविध मागण्यांचे निवेदन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे पाठवण्यात आले अशा प्रकारे संघटने च्या वतीने च्या सात वर्षापासुन आतापर्यंत एकूण सात लाख पोस्ट कार्ड विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. हे निवेदन पाठवताना संघटनेचे
राज्य महासचिव डॉ.अँड.केवलजी उके ,
राज्य सचिव .वैभवजी गिते, समन्वयक रमाताई अहिरे , सहसचिव पि.एस.खंदारे, विधी सल्लागार ॲड. अनिल कांबळे, कोषाध्यक्ष शिवरामजी कांबळे, संघटक अँपल खरात, निरीक्षक बी.पी लांडगे महिला संघटक पंचशीला कुंभारकर ,प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे, तसेच संजय झेंडे ,शशी खंडागळे, वर्षा शेरखाने, वर्षाताई ऊके, आजिनाथ राऊत, दत्ता कांबळे, सचिन झेंडे, गोरख गायकवाड, रवींद्रर झेंडे खुशी ऊके, तसेच पुणे, मुंबई, सोलापूर, रायगड, सातारा वाशिम, हिंगोली, पश्चिम महाराष्ट्र ,विदर्भभ ,मराठवाडा, येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिित होते.

सोशल संस्थेच्या वतीने चांदापुरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अठरा तास अभ्यास अभियान

सोशल संस्थेच्या वतीने चांदापुरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अठरा तास अभ्यास अभियान
माळशिरस( पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क )-सोशल ही संस्था समाजातील वंचित व दुर्लक्षित लोकांकरिता गेली दहा वर्षे कार्यरत असून मोफत आरोग्य शिबिरे,दुष्काळी मोफत आरोग्य सेवा, मुले दत्तक योजना,लाडली योजना,शालेय साहित्य मदत,महिला व ग्रामविकास इ उपक्रम अविरतपणे सुरू आहेत.
महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सालाबादप्रमाणे या वर्षी ही संस्थेने सलग अठरा तास अभ्यास अभियान राबवले.या वेळी सुरुवातीस प्रतिमेचे पूजन रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष विकास धाइंजे,भटक्या समाजाचे नेते मारुती सरगर ,सोशल चे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी मनोगत व्यक्त करताना विकास धाइंजे म्हणाले असे अभियान च्या माध्यमातून उच्च पदस्थ अधिकारी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत.सर्व बहुजन समाजातील मुले आणि विशेषतः मुलींची संख्या लक्षणीय आहे अठरा तास अभियान राबवणारी ही सोलापूर जिल्ह्यातील पहिली शाळा असेल व खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना या पेक्षा वेगळी आदरांजली असूच शकत नाही.डॉ.पंचशीला लोंढे,डॉ.कुमार लोंढे,प्रा.कुंडलिक साठे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
सदर अभियानात पाचवी ते बारावी गारवाड,तरंगफळ, पठाणवस्ती ,चांदापुरी, निमगाव,कुसमोड या परीसरातील शंभर पेक्षा जास्त विद्यार्थिनी सहभाग झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नितीन सरक यांनी केले तर प्रास्तविक स्नेहल उरवने मॅडम केले यावेळी आण्णा भोसले, अरुण बोडरे,महादेव मिसाळ दत्ता सोरटे,प्रा.राम चौगुले,प्रा.दीपक काटे,प्रा.चोरमले,प्रा.अल्ताफ पठाण,डी. जी लोंढे सर,साजिद पठाण सर,कोमल शेटे,अरुणा लोंढे मॅडम, वायदंडे सर,आर्शिद पठाण सर इ नि कार्यक्रम यशस्वी केला तर शेवटी आभार प्रा.धाइंजे सर यांनी मानले

श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापुर येथे शालेय क्रीडा उद्घाटन

इंदापूर (प्रतिनिधी )श्री.नाराणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत शालेय क्रिडास्पर्धांचेआले उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रम ना.रा. हायस्कुल चे क्रिडा शिक्षक श्री. तानाजी गलांडे सर, सहशिक्षक श्री. रामदास देवकर सर आणि आय काॕलेज सायन्स विभागाचे श्री. वीर सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रथम इ.४थी च्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते क्रिडाज्योत प्रज्वलन करण्यात आली. मैदान पूजन बरोबरच इ. ३री च्या विद्यार्थ्यांनी “अॕरोबिक हा व्यायाम” प्रकार सादर केला. इ. २री मुलांनी” संगीत खुर्ची “या खेळाचे सादरीकरण केले. तसेच या सप्ताहात विविध सांघिक आणि वैयक्तिक खेळ आयोजित केल्याची माहिती शाळा प्रमुखांनी दिली . सुञसंचलन श्रीमती. संतोषी वखरे यांनी केले . सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शालेय स्टाफ ने मोलाचे सहकार्य केले .

तीन पक्षांचे सरकार बनल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली…..वैभव गिते

तीन पक्षांचे सरकार बनल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली…..वैभव गिते

महाराष्ट्रात अन्याय अत्याचार झाल्यास अत्याचार केलेला आरोपी हा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असतो किंवा त्याचे लगेबंध असतात
साहजिकच शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा भाजप या पक्षांचा असतो त्यामुळे हे आरोपी त्यांच्या पक्षातील आमदार,खासदार मंत्री यांच्यामार्फत पोलिस प्रशासनावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणत असतात
यामध्ये भरडली जाते ती सामान्य दलित आदिवासी बौद्ध गोरगरीब जनता यापूर्वीची सत्ताधारी मंडळी दोन पक्षांची मिळून असायची परंतु सध्याचे सरकार तीन पक्षांचे मिळून बनल्याने सामान्य जनतेपुढील आव्हाने अधिक वाढली आहेत
नवीन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने मनावर घेऊन जर जातीय अत्याचार संपवण्याची मोहीम हाती घेतल्यास खरोखरच बदल होईल देशाला स्वातंत्र्य मिळून 70 पेक्षा जास्त वर्ष झाली पण दलित आदिवासी बौद्धांची मागासवर्गीयांची स्थिती जशीच्या तशी आहे त्यांच्या हक्काचा प्रगतीचा निधी इतरत्र वळवला जातोय आखर्चित ठेवला जातोय त्यामुळेच मागासवर्गीयांची स्थिती बिकट होत चालली आहे गरिबांना अधिक गरीब करून आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत करून राज्य करायचे हा जणू अलिखित नियमच झाला आहे
त्यामुळेच धोका टळलेला नसून अधिक वाढला आहे सामाजिक काम करणाऱ्या बुद्ध,फुले शाहू आंबेडकर लहुजी आण्णा भाऊंच्या विचाराने जबाबदारी घेऊन प्रमाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे

वैभव तानाजी गिते राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस इमेल vaibhav10484@gmail. com

नातेपुते येथे संविधान दिन उत्साहात साजरा

नातेपुते (प्रतिनिधी)-नातेपुते ग्रामपंचायत यांचे वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला
:शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार ७० वा संविधान दिन ग्रा. पं.नातेपुते येथे सरपंच बी. वाय.राऊत यांचे हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन करण्यात आले.यावेळी ग्रंथपाल प्रदीप वणसाळे यांनी उद्देशीका व प्रतिज्ञा वाचन केले. या कार्यक्रमात महाराष्ट्र पुरोगामी न्यूज चॅनलचे वतीने वृक्ष लागवड सहभागाबद्दल जी.प.सदस्य महेश सोरटे व सरपंच भानुदास राऊत यांचा सन्मान संपादक प्रमोद शिंदे व प्रशांत खरात यांनी केला.या कार्यक्रमासाठी एन के साळवे , पत्रकार श्रीकांत बाविस्कर जी.प.सदस्य महेश सोरटे, ग्रा. पं.सदस्य भारत सोरटे,सुरेश पांढरे, टेंबरे,जयराम पांढरे, मा.सदस्य समीर सोरटे,नंदकुमार देशपांडे,दत्ता सोरटे,गोरख ढोबळे,बाबा बरडकर, ग्रा. वि.अधिकारी मोरे व नागरिक उपस्थित होते.

कोल्हापूर येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविक गीताचे लोकार्पण

कोल्हापूर( प्रमोद शिंदे )कोल्हापूर येथील अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फौंडेशन यांच्या वतीने भारतीय संविधानातील प्रास्ताविकेचे गीत स्वरूपात लॉन्चिंग करण्यात येत आहे. संविधानातील प्रास्ताविकेला नवीन चालबद्ध आणि संगीतबद्ध बनवून ही प्रास्ताविका गीत स्वरूपात सादर करण्यात येत आहे.

कोल्हापूर येथील प्रसिध्द गायक कबीर नाईकनवरे हे अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फौंडेशनच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सलाम संविधान या प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रमातून त्यांनी महाराष्ट्रभर संविधानाचा प्रचार आणि प्रसार केला आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून त्यांनी भारतीय संविधानातील प्रास्ताविकेला नवीन चाल आणि संगीत देऊन प्रास्ताविका गीत स्वरूपात सर्वांसमोर आणली आहे. या गीताला संगीत दिग्दर्शक म्हणून कबीर नाईकनवरे आणि निपाणी येथील दर्शन सुतार यांनी काम पाहिले आहे. या गीतामध्ये दहा गायकांनी गायन केले आहे. यामध्ये कबीर नाईकनवरे, दर्शन सुतार, संग्राम पाटील, मंदार पाटील, प्रसाद विभुते, मोहित कुलकर्णी, विशाल रेळेकर,स्नेहलता सातपुते, पुजा सावरे, सोनाली रायकर या गायकांचा समावेश आहे. या गीताच्या व्हिडिओ शुटचे काम कोल्हापूर येथील प्रसिद्ध कॅमेरामन सैफ बारगीर यांनी केले आहे.तर इडिटिंगचे काम विनायक व्हावळ यांनी केलं आहे. भारतीय संविधान सर्वसामान्य जनतेपर्यंत अगदी सहज, सोप्या भाषेत पोहोचवण्याचे काम कबीर नाईकनवरे यांचे फौंडेशन गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. त्यांच्या सलाम संविधान या प्रबोधनपर गीताचा कार्यक्रमाला महाराष्ट्रातुन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष कबीर नाईकनवरे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला आंनद भोजने, मंदार पाटील, अरुण पाटील, सैफ बारगिर आदी लोक उपस्थित होते.