प्रमोद शिंदे

सन्मती प्रिमियर लीग भव्य टेनिस बाॅल क्रिकेट🏏 स्पर्धा चे आयोजन

श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था आयोजित

SPL-2023*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

सन्मती प्रिमियर लीग भव्य टेनिस🎾 बाॅल क्रिकेट🏏 स्पर्धा चे आयोजन
मंगळवार दि. २५/४/२०२३ रोजी रत्नत्रय इंग्लिश स्कूल, सदाशिवनगर येथे करण्यात आले. सकाळी ८ वाजता उद्घाटन अकलूज येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. सतीश दोशी, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक श्री अनंतलाल दोशी, श्री प्रमोद दोशी, श्री प्रदीप झाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत खालील संघांनी सहभाग नोंदवला
न्यु चंद्रप्रभू क्रिकेट क्लब, नातेपुते
फलटण सुपर किंग्स, फलटण
नमोकार क्रिकेट क्लब, टेंभुर्णी
सोलापूर वारियर्स, सोलापूर
आदिनाथ टायटल्स, वैराग
अकलुज टायटल्स, अकलुज
राझिंग स्टार, नातेपुते
सन्मती चॅलेंजर, सदाशिवनगर
सोलापूर एलआयसी फायटर, सोलापूर
पार्श्वनाथ क्रिकेट चॅम्पियन, नातेपुते
अरिहंत वॉरिअर्स, पंढरपुर
कुंथुनाथ वारिअर्स, वेळापूर
या पैकी सेमीफायनल मॅच
सोलापूर एलआयसी फायटर, सोलापूर
नमोकार क्रिकेट क्लब, टेंभुर्णी
न्यु चंद्रप्रभू क्रिकेट क्लब, नातेपुते
यांचे त होऊन फायनल सोलापूर संघ v टेंभुर्णी क्रिकेट मॅच झाली. नंबर एक चे पारितोषिक सोलापूर एलआयसी फायटर, सोलापूर यांना मिळाले
नंबर दोन चे पारितोषिक नमोकार क्रिकेट क्लब, टेंभुर्णी
तसेच उत्तेजनार्थ तिसरे पारितोषिक व उत्कृष्ट संघ ट्रॉफी न्यु चंद्रप्रभू क्रिकेट क्लब, नातेपुते यांना मिळाली.
पंच, अॅकरींग, स्कोअर म्हणून आनंद कुलकर्णी सर, राहुल देशमाने, उमेश पिसे, अनिल शिंदे, समीर आदत, महावीर शहा (पापरी)
संयोजक विरकुमार दोशी, अभिजीत दोभाडा, महावीर दोशी, केतन दोशी

राजकुमार हिवरकर यांच्या प्रयत्नाने संगीता साळवे यांचे यशस्वी ऑपरेशन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – तानाजी सावंत,जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना नेते प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील शेवटच्या घटकापर्यंत रुग्णसेवा पोहोचवीत आहेत.
संगीता युवराज साळवे रा.पळसमंडळ ता.माळशिरस वय ४७ शेतमजुरी करणारे कुटुंब,संगीता साळवे या घराच्या ओठ्यावरून उतरत असताना पायात पाय अडकून पडल्याने त्यांच्या डाव्या खुब्यातील बाॅल तुटून दुखापत झाली होती.खाजगी रुग्णालयामध्ये या शस्त्रक्रियेसाठी अडीच लाखांपर्यंतचा खर्च सांगण्यात आला होता.इतक्या मोठ्या रकमेची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती देखील नाही.
शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी नुसतं फोनवरून शस्त्रक्रियेची आखणी केली कोणतीही अडचण आली नाही.अकलूज येथील कदम हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया पार पडली. सध्या असलेले सरकार रुग्णांसाठी विविध योजना राबवीत आहे.हिवरकर पाटील नुसतेच आरोग्याचेच प्रश्न नाही तर बांधकाम कामगाराच्या अडचणी देखील सोडविण्यास सर्वांना सहकार्य करीत असल्याची प्रतिक्रिया रुग्ण संगीता साळवे यांचे भाऊ संदीप भागवत तालुकाध्यक्ष,जय महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना यांनी व्यक्त केली.
शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील,शहर उपप्रमुख पोपटराव शिंदे यांनी रुग्ण संगीता साळवे यांची विचारपूस केली.डॉ.अंजली कदम यांचे आभार व्यक्त केले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील,डॉ.अंजली कदम,शहर उपप्रमुख पोपटराव शिंदे,तालुकाध्यक्ष जय महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना संदीप भागवत,उपाध्यक्ष बांधकाम कामगार संघटना राजू जाधव,सचिव माऊली देशमुख,नातेवाईक जगूबाई भागवत,सोमनाथ साळवे,उषा पवार,सुवर्णा मकरे आदी उपस्थित होते.

राजकुमार हिवरकर पाटील यांच्या प्रयत्नातून अजित दगडे चेऑपरेशन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क  नातेपुते  (प्रतिनिधी) शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या प्रयत्नातून अजित दगडे याचे यशस्वी हाताचे ऑपरेशन करण्यात आले   नातेपुते येथील अजित दत्तात्रय दगडे हा तीस वर्षाचा तरुण देवदर्शनासाठी शिखर शिंगणापूर गुप्तलिंग येथे गेले असता पाय घसरून पडून मोठा अपघात झाला त्याच्या हाताला  दुखापत झाली होती. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याकारणाने त्याचे मित्र शिवसेना भवन नातेपुते येथे आले. वरील सर्व हकीकत त्यांनी  हिवरकर यांना सांगितले घरच्यांना सांगून पण फायदा होणार नव्हता कारण घरची परिस्थिती हालकीचे असल्याने दीड लाखापर्यंत ऑपरेशन करणे शक्य नव्हतंत्यांना तात्काळ रेशन कार्ड  काढण्यास मदत करून तात्काळ ऑपरेशन करून देण्यात आलं. ऑपरेशन झाल्यानंतर हिवरकर यांनी दवाखान्यात जाऊन  अजित दगडे याची भेट घेतली.

महात्मा फुले जयंतीनिमित्त पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – पिरळे येथे सालाबाद प्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.गेल्या दहा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी भगवान महावीर, महात्मा बसवेश्वर,महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याशिवारात 59रक्तदात्यांनी रक्तदान केले. या  शिबिराचे चेउद्घाटन भीमा कोरेगाव संरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार स्तंभ लेखक दादाभाऊ अभंग त्यांच्यास्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सुनील साळवे व एन डी एमजे राज्यसचिव वैभव गीते,ज्ञानदीप संस्थेचे प्राचार्यसी.डी ढोबळे तसेच  पिरळे गावचे मा सरपंच संदीप सेठ नरोळे,प्राध्यापक दीपक शिंदे,सरपंच रेश्मा सुनील दडस,ग्रामसेवक हनुमंत वगरे होते.मान्यवरांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच दादाभाऊ अभंग,वैभव गीते ,प्राध्यापक सुनील साळवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.,32 पिढीतांचे पुनर्वसन केल्याबद्दल पिरळे ग्रामस्थ व दादाभाऊ अभंग यांच्या वतीने वैभव गिते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य नागरिक सत्कारकरण्यात आला.याप्रसंगी पंढरपूर येथील एडवोकेट रोहित एकमल्ली,उस्मानाबाद आदिनाथ राऊत, पोलीस पाटील औदुंबर  बुधावली,संदीप वाघसर ,डॉ हनुमंत माने,दत्तात्रेय लवटे,महादेव शिंदे शिवाजी लवटे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय पाटील, ह भ प खेडेकर महाराज,धनंजय ढगे ,सुदाम बुधावले,जिल्हा परिषद शिक्षक,संजय ढवळे सर,खरात सर,जब्बार मुलानी सर, मेजर जाधव, तसेच पंचक्रोशीतील अनेक मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रक्तदान यशस्वी होण्यासाठी प्रमोद शिंदे,प्रशांत खरात ,प्रज्ञेश  कांबळे,मोहन शिंदे,चैतन्य बल्लाळ,मयूर साळवे,अक्षय ठवरे, तसेच ज्ञानदीप रक्तपेढीतील सर्व स्टाफ परिश्रम घेतले.

ऍड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फुटांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण


पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क- मुंबई संदेश भालेराव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फुटांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण १४ एप्रिल २०२३ रोजी तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद येथे होणार आहे.

या भव्य पुतळ्याचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री के.सी. राव हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.सी. राव यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जात होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा भव्य पुतळा देशातील सर्व जनतेला प्रेरणा देणारा असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री के.सी.राव यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील सर्वात मोठे भव्य स्मारक हे ठरेल. याची उंची १२५ फूट असून याचे सर्व काम पूर्ण झाले आहे. ११.४ एकरात दीडशे कोटी रुपये खर्चून हे स्मारक उभारण्यात आले आहे.

आदर्श सरपंच म्हणून संदीप नरोळे यांनी चांगलं काम केलं -आ.राम सातपुते



पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे आदर्श सरपंच म्हणून गेल्या दोन वर्षात संदीप नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.असे प्रतिपादन माळशिरस तालुका विधानसभा आमदार आ.राम सातपुते यांनी पिरळे येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.
ग्रामपंचायत पिरळे येथे विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील,तसेचआमदार रणजीत सिंह मोहिते-पाटीलयांच्या मार्गदर्शना खालीविविध विकास कामांचे उद्घाटन आ.राम सातपुते व शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये पिरळे ते नातेपुते सुमारे 1.5 कोटीरुपये रस्त्याच उद्घाटन तसे महादेव मंदिर सभामंडप भूमिपूजन, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 87 लाख रुपयेच्या पाण्याची टाकी, काशीविश्वेश्वर मंदिर सभामंडप लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की
दोन वर्षाच्या कार्यकाळात नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.तसेच मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी संदीप नरोळे यांनी मुलींच्या नावे पाच हजार रुपये एफ.डी करून आदर्श निर्माण करून चांगलं काम केलं आहे.असेच सर्वांनी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.पिरळे गावाला आतापर्यंत
पंधरा कोटी निधीआला आहे.आमदार रणजीत दादा व राम सातपुते तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत.यापुढेही विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही.चांगलं काम केल्याबद्दल सरपंच अलका नरोळे यांचा विशेष सन्मान मान्यवरच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,गटविकास अधिकारी विनायक गुळवे,नातेपुते माजी सरपंच बी. वाय.राऊत,
उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,जिल्हा परिषद सदस्यअरुण तोडकर,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,हनुमंत पाटील,विस्तारा धिकारी विठ्ठल कोळेकर,बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी स्वस्ति मिश्रा,मा.सरपंच अलका रामलिंग नरोळे . ग्रामसेवक हनुमंत वगरे,कनिष्ठ उप अभियंता ए.एन आंबले,सचिन ननवरे,हनुमंत कुंभार, संतोष महामुनी,विजय पाटील, नाना शेंडे,अमोल गोरे, सतीश ढेकळे ,संदीप वाघ ,संजय वाघमोडे,रणजीत रूपनवर पाटील
महादेव होळकर,महादेव शिंदे,सर्वोदय प्रतिष्ठानचे कदमसर,प्रमोद डूडू,दत्तात्रेय लवटे ,दीपक शिंदे, भारत पवार,आबा शिंदे,अजित खंडागळे,विठ्ठल सुर्यवंशी, कांतिलाल माने ,सोमनाथ लवटे,कोंडीराम नरोळे,महावितरण वरिष्ठ लिपिक दत्ता रुपनवर
तालुका कृषी अधिकारी अमोल गोरे आरोग्य विभागाचे डॉक्टर सोनटक्के व डॉक्टर अशोक कारंजे माजी सरपंच अनिकेतन साळवे जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक संजय ढवळे सर युवा नेतृत्व सुरज माने ,आजिनाथ होळकर सर, सुनील मोरे, प्रल्हाद साळवे गुरुजी, अशोक तोडकर, राजेंद्र नरोळे , सुनील दडस ,दशरथ लवटे, बाळू शिंदे, भीमराव वाघमोडे, राजेंद्र पाटील ,संभाजी गोरे , महादेव किर्दक प्रल्हाद नरोळे, लक्ष्मण पवार ,बाजीराव दडस, सुनील बनकर शंकर जानकर मनोज ड्डू मनोज पैलवान कॉन्ट्रॅक्टदार मुसा मुलानी, सरगर, तरटे

पंचक्रोशीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप नरोळे व आभार दीपक शिंदे यांनी व्यक्त केले.

मुलींच्या स्वागतासाठी संदीप नरोळे यांनी उत्कृष्ट काम केलं आहे-धैर्यशील मोहिते-पाटील


पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क प्रमोद शिंदेमुलींच्या स्वागतासाठी संदीप नरोळे  यांनी उत्कृष्ट काम केला आहे.सरपंच म्हणून गेल्या दोन वर्षात गावचा विकास केला आहे.असे प्रतिपादन शिवामृत संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पिरळे येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.  ग्रामपंचायत पिरळे येथे विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील,तसेचआमदार रणजीत सिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शना खाली विविध विकास कामांचे उद्घाटन आ.राम सातपुते व शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये पिरळे ते नातेपुते  सुमारे 1.5 कोटीरुपये रस्त्याच उद्घाटन तसे महादेव मंदिर सभामंडप भूमिपूजन, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 87 लाख रुपयेच्या पाण्याची टाकी, काशीविश्वेश्वर मंदिर सभामंडप लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की दोन वर्षाच्या कार्यकाळात नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.तसेच मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी संदीप नरोळे यांनी  मुलींच्या नावे पाच हजार रुपये एफ.डी करून आदर्श निर्माण करून चांगलं काम केलं आहे.असेच सर्वांनी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.पिरळे गावाला आतापर्यंत पंधरा कोटी निधीआला आहे.आमदार रणजीत दादा व राम सातपुते तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत.यापुढेही विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही.चांगलं काम केल्याबद्दल सरपंच अलका नरोळे यांचा विशेष सन्मान आ.राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,गटविकास अधिकारी विनायक गुळवे,नातेपुते माजी सरपंच बी. वाय.राऊत,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,जिल्हा परिषद सदस्यअरुण तोडकर,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,हनुमंत पाटील,विस्तारा धिकारी विठ्ठल कोळेकर,बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी स्वस्ति मिश्रा,मा.सरपंच अलका रामलिंग नरोळे . ग्रामसेवक हनुमंत वगरे,कनिष्ठ उप अभियंता  ए.एन आंबले,सचिन ननवरे,हनुमंत कुंभार, संतोष महामुनी,विजय पाटील, नाना शेंडे,अमोल गोरे, सतीश ढेकळे ,संदीप वाघ ,संजय वाघमोडे,रणजीत रूपनवर पाटील महादेव होळकर,महादेव शिंदे,सर्वोदय प्रतिष्ठानचे कदम सर,प्रमोद डूडू,दत्तात्रेय लवटे ,दीपक शिंदे, भारत पवार,आबा शिंदे,अजित खंडागळे,विठ्ठल सुर्यवंशी, कांतिलाल माने ,सोमनाथ लवटे,कोंडीराम नरोळे,महावितरण वरिष्ठ लिपिक दत्ता रुपनवर तालुका कृषी अधिकारी अमोल गोरे आरोग्य विभागाचे डॉक्टर सोनटक्के व डॉक्टर अशोक कारंजे माजी सरपंच अनिकेतन साळवे जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक संजय ढवळे सर युवा नेतृत्व सुरज माने ,आजिनाथ होळकर सर, सुनील मोरे, प्रल्हाद साळवे गुरुजी, अशोक तोडकर, राजेंद्र नरोळे , सुनील दडस ,दशरथ लवटे, बाळू शिंदे, भीमराव वाघमोडे, राजेंद्र पाटील ,संभाजी गोरे , महादेव किर्दक प्रल्हाद नरोळे, लक्ष्मण पवार ,बाजीराव दडस, मनोज ड्डू मनोज पैलवान कॉन्ट्रॅक्टदार मुसा मुलानी, सरगर, तरटे शंकर जानकर, शांतिनिकेतन साळवे ,सुनील बनकर ,

पंचक्रोशीतील कार्यकर्ते व  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमा चे प्रास्ताविक   संदीप नरोळे व आभार दीपक शिंदे यांनी व्यक्त केले.

पिरळे येथे विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पणण सोहळा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
 

पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन भूमिपूजन व लोकार्पण सोहळा दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी  सायंकाळी 5 वाजता ग्रामपंचायती सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्या वतीने योजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमत माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटीलयांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय पेयजल योजनेतील  82000 लिटर  क्षमतेची उंच पाणी टाकीचे लोकार्पण सोहळा,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या निधीतून काशी विश्वेश्वरकाशी  सभामंडप उद्घाटन तसेच आमदार राम सातपुते यांच्या निधीतून मंजूर झालेल्यामहादेव मंदिर सभा मंडप चे भूमिपूजन व हायमस पोलचे लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.हा कार्यक्रम  माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाल विधानसभा सदस्य आमदार राम सातपुते व शिवामृत संघ चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होणार असून या कार्यक्रमास पंचक्रोशीतील दिग्गज नेतेमंडळी उपस्थित असणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामसेवक यांच्यावतीने करण्यातत आले आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उद्योजक संदीप तात्या नरोळे यांनी केले आहे.

पिरळे येथे पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा

 

पुरोगामी न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (प्रतिनिधी)  पिरळे तालुका माळशिरस येथे दिनांक 15 जानेवारी 23 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दलित पॅंथरचेे प्रणेते पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त  दलित पॅंथर संघटनेच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या अभिवादन सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील दलित पॅंथर चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले ( दलित पॅंथर प्रदेशाध्यक्ष) हे असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ व राष्ट्रीय व राज्य कार्यकारणी जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे आयोजन दादासाहेब शिंदे दलित पॅंथर जिल्हा अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले आहे.तसेच चळवळीतील तमाम कार्यकर्त्यांना  कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष दादासाहेब शिंदे व तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले यांनी केले आहे .

नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा-सरपंच वीरकुमार दोशी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा- सरपंच वीरकुमार दोशी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नातेपुते-(प्रतिनिधी) नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदाशिव नगरचे नवनिर्वाचित सरपंच- वीरकुमार दोशी यांनी पत्राद्वारे केले आहे पत्रात असे म्हटले आहे की
राज्यघटनेच्या नियमानुसार नगरपरिषद नगरपंचायत महाराष्ट्र ची विधानसभा देशाची लोकसभा यामध्ये राष्ट्रपती राज्यपाल यांच्या माध्यमातून खासदार आमदार निवडले जातात तर नगरपंचायतीमध्ये देखील स्वीकृती धारक नगरसेवक निवडले जातात .त्याच धर्तीवर ग्रामपंचायत , सामाजीक , विविध विकासात्मक विषयांत विषेष तज्ञ असणारे लोक अनेकवेळा राजकीय प्रवाहाबाहेर राहतात . निवडणुकांमध्ये सहभागी होत नाहीत . अशा तज्ञ लोकांची निकड ग्रामपंचायत सभागृहाला कायम भासते . अशा लोकांना स्वीकृत सदस्य पदाची संधी निळाल्यास या लोकांचा अनुभव हा ग्रामपंचायत अथवा जनहितासाठी सार्थ ठरू शकतो. त्यामुळे जर नगरपंचायत धरतीवर ज्याप्रमाणे स्वीकृत नगरसेवक . त्याचप्रमाणे स्वीकृत ग्रामपंचायत सदस्य नेमण्याचा अधिकार नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला तर चांगल्या लोकांना देखील ग्रामपंचायत मध्ये नेतृत्व करण्याची संधी . व अशा लोकांच्या अनुभवाचा फायदा ग्रामपंचायत व जनतेला निश्चित होईल. आशा करतो की ‘ अशा प्रकारचा कायदा विधिमंडळात पारित झाल्यास याचा फायदा ग्रामपंचायत थरावर होईल यात शंका नाही . यासाठी पहिला ग्रामपंचायत ठराव आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपणास पाठवीत आहोत.सदर पत्राची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे