नातेपुते येथे रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद.

नातेपुते येथे रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंग
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघ महाराष्ट्र राज्य व पोलीस मित्र संघटना सोलापुर जिल्हाच्या वतीने क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 226 व्या जयंतीनिमित्त, संविधान दिन व मुंबई 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना श्रध्दांजली वाहण्यासाठी नातेपुते येथील ग्रामपंचायत सभागृह येथे महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या संस्थापक अध्यक्षा.मा. सौ. यशश्री प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन. विधानपरिषदेचे सदस्य. आमदार.मा. श्री. आर. जे. आप्पा रुपनवर साहेब व नातेपुते पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. मनोज सोनवलकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. व या शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्कर्ष सोरटे, लहुजी शक्ती सेनेचे सतिश सपकाळ , पत्रकार सचिन रणदिवे, पिराळे ग्रामपंचायतचे उपसरपंच बापु बुधावले, नारीशक्ती संघटनेच्या सौ बानकर ताई आदींनी सदिच्छा भेट दिली. शिबीर यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी नातेपुते शहरातील युवा नेते तुषार लांडगे, पोलीस मित्र संघटनचे बाबु ढोबळे, अमोल बरडकर , बानकर दाजी, बापु खिलारे, विशाल वायदंडे, रवी दणाने, हार्दिक भिसे, गणेश लांडगे, गणेश बानकर व सर्व पोलीस मित्र संघटनचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले . यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघ महाराष्ट्र राज्य, पोलीस मित्र संघटना सोलापुर जिल्हा अध्यक्ष कु. केतन यादव यांनी सर्व रक्त दात्यांचे आभार मानले. व नातेपुते व परिसरातील नागरिकांन मधुन या उपक्रमाचे व सर्व पोलीस मित्रांचे सर्वत्र कौतुक होत आहे.












