Uncategorized
अंगणवाडी सेविकांना एकशे तेहत्तीस कोटी बावीस लाख रुपये मंजूर



महिला व बालविकास विभागाच्या दिनांक 5 नोव्हेंबर 2020 च्या शासननिर्णयाद्वारे मान्यता
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –कोरोना कोविड 19 या विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आंगणवाडी सेविका/मदतनीस/मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन अदा करण्यासाठी निधी वितरित केला नसल्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांच्याकडे शासनाकडून निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली होती.आंगणवाडीत शिकणारी मुले ही गरीब व बहुजन वर्गातील असतात शिवाय त्यांच्यासाठी कार्यरत असलेल्या सेविकांना,मदतनीसांना खूपच तुटपुंज्या मानधनावर नाईलाजाने काम करावे लागते ही गंभीर बाब लक्षात घेऊन
लोकप्रिय नेते वैभवजी गिते यांनी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके,राज्य समन्वयक रमाताई अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला.अखेर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने दिनांक 5 नोव्हेंबर 2020 रोजी च्या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला 13322.00 लक्ष (एकशे तेत्तीस कोटी बावीस लाख रुपये इतका निधी वितरीत करण्याबाबत मान्यता दिली आहे
सदरच्या शासन निर्णयात आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना,नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. केंद्र शासनाकडून विहित कालावधी निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन आधार करणे शक्य व्हावे, याकरिता अपर मुख्य सचिव (वित्त)यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य प्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागात अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्याआधारे हा शासननिर्णय काढण्यात आला आहे.त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.लोकप्रिय नेते वैभव गिते यांनी शासनाचे आभार मानले आहेत.
*आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य शाखा शिवपुरी येथे संपर्क कार्यालयाचे उदघाटन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्रांती संघटना शाखा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवपुरी येथे करण्यात आले तसेच संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.लखनभाऊ चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा व ऑफिस चे उदघाटन एकशिव चे जेष्ठ नेते श्री.शहाजीदादा धायगुडे व संजयभाऊ चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले व माळशिरास पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री.किशोरभैय्या सूळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजयभाऊ चव्हाण,शाहुजीनाना मदने,जिल्हा अध्यक्ष उमाजी बोडरे,इंदापूर तालुका अध्यक्ष सत्यजित उर्फ लालाभाऊ चव्हाण,नातेपुतेचे युवा उधोजक रवी बोडरे,मा.उपसरपंच गुणवंत आबा पाटील व सुरेश जाधव ग्रा.पंचायत सदस्य अय्याज मुलाणी,दशरथ जाधव,इंदापूर कार्याध्यक्ष विजय चव्हाण,सभापती सुग्रीव मोठे,सोमनाथ थोरात,शंकर अवघडे,गणेश नामदास, गणपत रुपणवर,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीकेश वरूडे,राहुल सरगर,महेश कांबळे,वाहिद मुलाणी,सुमित चँकेश्वरा,किरण खरात,प्रतीक वरूडे,विठ्ठल कुचेकर,आसिफ मुलाणी,कुलदीप खांडेकर,अनिस मुलाणी,लखन वाघमारे,समीर माने,चैत्यन खताळ, प्रतीक जाणकार,निखिल जानकर, उदय गावडे,तुषार जानकर,व कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकेश वरूडे यांनी केले व संघटनेच्या माध्यमातून व शहाजीदादा धायगुडे यांच्या विचारातून आम्ही फक्त जनसामान्य लोकांच्या अडी अडचनी सोडवण्यासाठी गरजवंताची सेवा करण्याचे काम व सामाजिक कार्य या संघटनेच्या वतीने करीत आहोत. यापुढे कोणत्याही गरीब गरजूनसाठी आम्ही व माझा सर्व मित्र परिवार आपल्या सेवेत कायम असणार आहे कधी हि कोणत्याही अडचणी साठी आवश्य भेटा तांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणारच असे लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था माळशिरस तालुका व संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकेश वरूडे यांनी सांगितले.

सर्वसामान्य नागरिकांना मिळणार मोफत व्यायाम करण्याची संधी – प्रा.राकेश
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –जिल्हा क्रिडा विभाग यांच्या माध्यमातून नातेपुते ग्रामपंचायत अंतर्गत बौद्ध समाजमंदिर याठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनासाठी व मुलांसाठी व्यायामशाळेचा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती प्रा.राकेश भारत सोरटे यांनी दिली.

सर्वसामान्य नागरिकांना मोफत व्यायाम करण्याची सोय नातेपुते ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून होणार आहे.यासाठी माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते यांनी तात्काळ अनुदान मिळण्यासाठी शिफारस दिली.यासाठी जिल्हा परिषद सदस्य सौ.साक्षी सोरटे व पंचायत समिती सदस्य श्री माऊली पाटील यांनी पाठपुरावा केला.
त्याचबरोबर सर्व कागदपत्राची पुर्तता,हमी व आर्थिक मदत ग्रामपंचायतचे सरपंच भानदास राऊत,उपसरपंच सौ.सुनंदा उराडे व ग्रामसेवक प्रल्हाद मोरे यांनी केली. या कामासाठी माजी सरपंच अमरशील देशमुख माजी उपसरपंच अतुल पाटील, बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे ,भाजप शहराध्यक्ष भैय्या चांगण ,संदिप भैय्या ठोंबरे ,जनार्धन सोरटे , नवाज सोरटे ,भारत सोरटे, एन के साळवे,महावीर साळवे,युवराज वाघमारे,यांनी प्रयत्न व मार्गदर्शन केले. यासंदर्भात प्राध्यापक राकेश सोरटे यांनी माहिती दिली.
मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला……
ऍड.अमोलजी सोनवणे व ऍड.बापूसाहेब शिलवंत यांनी पीडितेच्या बाजूने केला जबरदस्त युक्तिवाद


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
दिनांक 26 ऑक्टोंबर 2020 रोजी कालिदास ईश्वर ताकवणे या नराधमाने फरसान खाण्याच्या बहाण्याने मराठा समाजातील अल्पवयीन इयत्ता 6 वी मधील अल्पवयीन 11 वर्ष नऊ महिन्याच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला होता.याबाबत पीडित मुलीची आज्जी यांनी यवत जि. पुणे पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्याने गुन्हा.रजी.नंबर 0904/2020 भा.द.वि 376 व बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,8,व 12 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कापुरे यांनी आरोपीस तात्काळ अटक केली होती आरोपीने मा.जिल्हा सत्र न्यायालय बारामती येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता मराठा समाजातील अल्पवयीन पीडित मुलीच्या वतीने वकील म्हणून नेहमीच गोरगरीब जनतेच्या वतीने न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडणारे ऍड.अमोलजी सोनवणे व ऍड.बापूसाहेब शिलवंत यांनी घटनेची गंभीरता व तीव्रता लक्षात घेता न्यायालयात जोरदार लेखी युक्तिवाद केला.न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला
कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता मराठा समाजातील गरीब कुटुंबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहून न्यायालयात बाजू मांडल्याबद्दल या अतुलनीय कामगिरीबद्दल नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी ऍड.अमोलजी सोनवणे व ऍड.बापूसाहेब शिलवंत यांचे अभिनंदन व आभार मानले आहेत.
पीडित कुटुंबास नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक दादासाहेब जाधव व पांडुरंग गडेकर हे सर्वतोपरी मदत व सहकार्य करीत आहेत.
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक दादासाहेब जाधव. एन.डी.एम.जे पुणे जिल्हा निरिक्षक पांडुरंग गडेकर,प्रकाश पारदासानी. यशवंत वाघोले अमर जोगदंड. गावचे ग्रा प सदस्य ज्ञानेश्वर सांबळे .पोलिस मित्र रमेशजी चितारे यांनी यापूर्वीच घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन आरोपीस फाशी देण्याची मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आक्रमकपणे मागणी केली होती.
भाजपा चे आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुंन्हा दाखल करनार.- पँथर डॉ. राजन माकणीकर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई दि(प्रतिनिधी)
चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात दिलेली तक्रार ही मनुस्मृतीचे समर्थन करणारी असून भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करनार असल्याची माहिती डॉ राजन माकणीकर यांनी दिली.
पँथर ऑफ सम्यक योद्धा या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पक्षाचे केंद्रीय महासचिव व सल्लागार पँथर डॉ राजन माक्निकर यांनी पक्ष व संघटनेच्या वतींने सोनी टेलिव्हिजन नेटवर्क व अमिताभ बच्चंन चे जाहीर अभार अभिनंदन व्यक्त केले असून असे ऐतिहासिक प्रश्न नेहमी विचारले जावेत अशी आशा व्यक्त करून 25 दिसेम्बर मनुस्मृती दहन दिनी संविधान चौक सीपझ गाव मुंबई येथे मनुस्मृती दहन करणार असल्याची माहिती देऊन ज्यांना संविधान मान्य नाही अस्यांनी खुशाल भारत सोडून जावा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
संविधानावर चालणाऱ्या भारतात राहून संविधानाचा विरोध करून मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वीय सहाय्यक व लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असल्याचेही सांगितले आहे.
समविधान विरोधी, देशद्रोही कारवाया करणार्या नाजाईज मनुवादी पिलावळ देशात तोंड वर काढत असून बौद्ध धर्मगुरू पूज्य भदंत शिलबोधी, रिपाई अध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पँथर श्रवण गायकवाड, पँथर राजेश पिल्ले, पँथर सचिन भूटकर, समाजसेवक वीरेंद्र लगाडे, कायदेशोर सल्लागार नितीन माने आदींचे शस्तमंडल वारंवार घडलेल्या घटनेवर पँथर ऑफ सम्यक योद्धा, सम्यक मैत्रेय फौंडेशन, रिपाई डेमोक्रॅटिक च्या वतीने तक्रार देऊन कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही डॉ.माकणीकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय शिक्षा नीती आंदोलन समिती अकोला ची चिंतन बैठक संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अकोला विजय कुचे- राष्ट्रीय शिक्षा नीती आंदोलन समिती अकोला ची चिंतन बैठक दिनांक 1/11/2020 रोजी मराठा सेवा संघ कार्यलय येथे पडली, अकोला येथे जेष्ठ सामजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ मा विजयभाऊ कौशल यांच्या अध्यक्षते खाली पार पडली, या बैठकीत खालील मुद्द्यावर प्रमुख चर्चा करण्यात आली
1) आंदोलनासाठी जग्रुती करणे
2)आंदोलन समितीच्या तालुका व ग्राम स्तरावर क्रुतीशील कार्यकारणी तयार करणे
3) जिल्हा स्तरावर शैक्षणिक धोरणाच्या विरोधात कार्यक्रम आयोजित करणे
4) समविचारी सामजिक राजकीय व शैक्षणिक संघटनांचा सहभाग घेणे
5) रविवार दिनांक 8/11/2020 ला ठीक 12 वाजता मराठा सेवा संघ कार्यालय, अकोला येथे मीटिंग चे आयोजन करण्यात आले आहे या वेळी सुरज मेश्राम,संदीप बाजरे, गजानन देशमुख, अशोक पटोकार,चंद्रकांत झटाले,पंकज जायले,सचिन भीमकर, राहुल इंगोले, सचिन रामटेके, रोशन रंगारी, प्रा. प्रवीण ढोणे, शरद इंगोले इत्यादींचा सहभाग होता
पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मराठा समाजातील संदीप जाधव यांच्या कुटूंबास मिळाली चार लाख मदत …..विकास दादा धाइंजे
लोकप्रिय नेते वैभवजी गिते साहेबांच्या खडतर पाठपुराव्याला यश
वैभव गीतेंनी कुटुंबास दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आठ दिवसातच केल्याने इंदापूर व माळशिरस तालुक्यासह महाराष्ट्रतून होतोय शुभेच्छांचा वर्षाव
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –नैसर्गिक आपत्तीत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुराच्या पाण्यात कुरबावी ता.माळशिरस जि.सोलापूर येथील मराठा समाजातील गरीब कुटुंबातील विवाहित तरुण कळस ता.इंदापूर येथून पाण्यात वाहून गेला होता.संदीप जाधव यांचा स्वभाव अतिशय मायाळू असल्याने कुरबावी गावासह पंचक्रोशीतील गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी एक वर्षाचा मुलगा आई व वडील असे कुटुंब आहे.
विशेष बाब म्हणजे माळशिरस तालुक्यातील कोणत्याही आमदारांनी व माढा लोकसभेचे खासदार यांनी कुरबावी ता.माळशिरस येथे येऊन संदीप जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले नाही.
एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य महासचीव ऍड.डॉ.केवलजी उके साहेबांच्या मार्गदर्शनात आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस गावचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने वैभव गिते, प्रमोद शिंदे,संजय झेंडे,बाबासाहेब सोनवणे,दत्ता कांबळे,संभाजी साळे,यांनी निवासी नायब तहसीलदार देशमुख यांची भेट घेऊन संदीप जाधव यांच्या कुटुंबियांना तातडीची मदत तात्काळ देण्यात यावी यासाठी निवेदन देऊन चर्चा केली होती तसेच लोकप्रिय नेते वैभव गिते साहेबांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे कळवले होते तसेच इंदापूर तालुक्यातील आमदार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती तसेच भेट घेऊनही निवेदन दिले होते
या घटनेची सविस्तर माहिती वैभव गिते साहेबांनी बारामतीचे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याशी चर्चा करून त्वरित कार्यवाही करण्याची वीनंती केली होती.प्रांत दादासाहेब कांबळे यांनी तहसीलदार इंदापूर यांना त्वरित कार्यवाही करून अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे नेते शंकर थोरात व तालुकाध्यक्ष वैभव धाइंजे यांनी तहसीलदार यांना सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली अखेर आज तहसीलदार इंदापूर जि. पुणे यांनी संदीप जाधव यांची पत्नी सारिका संदीप जाधव यांच्या नावाने चार लाख रुपयांचा चेक दिला असल्याची माहिती एन.डी.एम.जे संघटनेचे नेते शंकर थोरात यांनी दिली.संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी खडतर पाठपुरावा केल्यामुळे नैसर्गिक आपत्तीग्रस्त मराठा समाजातील जाधव कुटुंबास झटपट मदत मिळाली त्यामुळे जाधव कुटुंबाने लोकप्रिय नेते वैभव गिते व त्यांच्या संपूर्ण टीम चे आभार मानले आहेत.
अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख वैभव काटे यांनी दिली आहे.


वैभव गीतेंनी कुटुंबास दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आठ दिवसातच केल्याने इंदापूर व माळशिरस तालुक्यासह महाराष्ट्रतून होतोय शुभेच्छांचा वर्षाव
आरपीआय चे कनिष्क कांबळे यांना आमदारकी(?)
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई –

दि. (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विधान परिषद सदस्य पदावर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून महाराष्ट्र राज्यातील व देशातील युवा उमलते नेतृत्व माजी आमदार पँथर दिवंगत टी एम कांबळे यांचे सुपुत्र कनिष्क कांबळे यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून हाती आली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, दिवंगत माजी आमदार टी एम कांबळे यांचे सुपुत्र कनिष्क कांबळे यांनी राज्यपाल नियुक्त आमदारकी निश्चित झाल्याची चर्चा राजकीय गोटात पसरली असून कनिष्क कांबळे एक उच्चशिक्षित व्यक्तिमत्व असून अश्या युवा वर्गाला आमदारकी दिल्यास सकारात्मक राजकारणाच्या प्रवाह गती येऊन तरुण वर्ग राजकारणाकडे आकर्षिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पँथर टी एम कांबळे यांच्या कारकिर्दीत कोणत्याही प्रकरणाचे गालबोट लागले असून स्वछ व पारदर्शक समाजसेवा करून समाजात त्यांची आगळीवेगळी प्रतिमा निर्माण झालेली आहे, त्यांचिंच प्रतिमा म्हणून कनिष्क कांबळे यांनी जनतेतून पाहण्यात येते.
आंबेडकरी चळवळीतील दिग्गज व लढवय्या नेत्याच्या मुलांपैकी एक उज्ज्वल व विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून कनिष्क कांबळे यांचे नाव सर्वाधिक पुढे येते.
दिवंगत माजी आमदार टी एम कांबळे यांच्या नंतर कनिष्क कांबळे यांनी स्वबळावर राजकीय शक्ती वाढवून आंबेडकरी चळवळीत स्वतःचे एक स्वतंत्र आणि स्वाभिमानी अस्तित्व निर्माण केले आहे, या व अन्य गुणांना पाहून राजकीय गोटात राज्यपाल नियुक्त आमदारकी साठी कनिष्क कांबळे यांच्या नावाला पसंती येत आहे.
विधानसभा निवडणुकीत आर पी आय डेमॉक्रॅटिक हा कनिष्क कांबळे यांचा पक्ष कॉंग्रेस सोबत तर लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अधिकृत युती करून रणांगणात होता आणि दोन्ही पक्षासोबत अत्यंत घनिष्ट संबंध आहेत त्यामुळेच की काय कनिष्क कांबळे यांची वर्णी लागली असावी असेही चर्चिले जात आहे.
सदर चर्चेबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधून चर्चेचा खुलासा केला तेंव्हा डॉ. माकणीकर यांनी सकारात्मक अविर्भाव आणला मात्र अधिकृत अशी माहिती अजून आली नसून चर्चा होत असल्याचे सत्य आहे असे स्पष्टीकरण दिले व युवा शक्ती व इंजिनीअर असलेल्या व्यक्तीला आमदारकी मिळाल्यास खऱ्या अर्थाने आमदार या पदाला न्याय मिळेल असेही डॉ. माकणीकर म्हणाले.
देशातील महामानवांच्या पुतळ्यांची विटंबना करणारे हाथच तोडून टाका-पँथर डॉ. राजन माकणीकर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई दि (प्रतिनिधी) देशातील महामानवांच्या पुतळ्यांची विटंबना करणारे हाथच तोडून टाका येणारा न्यायालयीन खर्च आम्ही करू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक व पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय संघटने केंद्रीय महासचिव पँथर डॉ राजन माकणीकर यांनी दिला.
देशातील महामानवांच्या पुतळ्यांच्या विटंबनेत वाढ झाली असून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना सर्रास केली जात आहे.
यामागचा सूत्रधार शोधणे आवश्यक असून अश्या विकृतीमुळे समाजात तेढ निर्माण होऊन राष्ट्राची एकता व अखंडता बाधित होन्याची शक्यता नाकारता येणार नाही शिवाय धार्मिक वाद सुद्धा फोफाऊ शकतो. असे वाद व विटंबना थांबवण्यासाठी पुतळ्याजवळ सार्वजनिक वाचनालय उभारून पुतळ्याच्या जागेची स्वच्छता व निगा राखावी तसेच ग्रामीण भागात पुतळा कमिटीच्या वतीने 4 तरुण श्रमदानातून पुतळा संरक्षणासार्थ उभा करावेत ज्यामुळे अश्या प्रकारावर प्रतिबंध होण्यास मदत होईल. पुतळे उभारून त्या पुतळ्याची निगा राखणे सुद्धा पुतळा समितीचेच परम कर्तव्य असायला पाहिजे.
किंबहुना देशातील कोणत्याही महामानव महानायिका यांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्या हातांना कलम करावेत व पोलिसात द्यावे, शिवाय कलम करणाऱ्या शूरविरावर होणाऱ्या न्यायालयीन बाजूचा लढा पँथर ऑफ सम्यक योद्धा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या वतीने लढण्यात येऊन परिवारासह न्यायालयीन आर्थिक भार उचलण्यात येण्याची ग्वाही दिली तर असा विकृत समोर आला तर हातपाय तोडून संविधानिक लढा स्वतःच्या बचावासाठी मी लढेंन असेही पँथर डॉ माकणीकर यांनी सांगितलेआंबेडकर भवन, भीमा कोरेगाव,
राजगृह वरील भ्याड हल्ला व झालेल्या पुतळा विटंबना प्रकरणी पोलिसांद्वारे काय कारवाई करण्यात येऊन आरोपी व खरा सूत्रधार कोण (?) याबद्दल पूज्य भदंत शिलबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या प्रभावी नेतृवाखाली श्रावण गायकवाड, वीरेंद्र लगाडे, राजेश पिल्ले, सचिन भूटकर आदी पँथर्सचे शिस्तमंडळ संबंधित पोलीस ठाण्यातुन तपास अहवाल मागवत असल्याचेही डॉ माकणीकर यांनी सांगितले.
