माळशिरस तालुका

चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणारमुख्यमंत्र्यांसोबत झाली बैठक;

भाजपकडून सोलापूर जिल्ह्यात राजकीय बॉम्ब : आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर भाजपाकडून वेगळी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, एकनाथ शिंदे सेना, काँग्रेस पक्षातील नेते आता भाजपा प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.जिल्ह्यातील नेत्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. सोलापूर जिल्ह्यातील म ाजी आमदार दिलीप माने, राजन पाटील, यशवंत माने हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असून माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हेही भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.दोन देशमुखांना मात्र पटेनाएकीकडे भाजपमध्ये इनकमिंग नेत्यांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. परंतु या इनकमिंगमध्ये दोन देशमुखांच्या विरोधकांनाही भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. यामुळे दोन देशमुखांना भाजपची ही खेळी कदाचित पटत नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.मुंबईत झालेल्या बैठकीप्रसंगी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे,राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, यशवंत माने, ग ाढ्याचे रणजितसिंह शिंदे, विक्रम शिंदे, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आदी उपस्थित होते. गुरूवारी शहरातील सोलापूर महापालिकेचे माजी उपमहापौर नाना काळे, दिलीप कोल्हे, सुरेश पाटील, बिज्जू प्रधाने, गुरुशांत धुत्तरगावकर, सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, मारुती तोडकरी, कल्पना क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर, सुनील भोसले आदींनी भाजपात प्रवेश केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात मोठी घडामोड घडत असून आणखीन कोण कोण भाजपात प्रवेश करणार याबाबतची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.

Highs Gold Stock Market | सेन्सेक्स, सोन्याची तेजोमय दिवाळी

वसुबारस सणाने दीपोत्सवास प्रारंभ झाला अन् प्रकाशपर्वाच्या तेजासोबतच सेन्सेक्स आणि सोन्याच्या तेजीने दिवाळी तेजोमय झाली. दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 484 अंकांनी वाढून चार महिन्यांचा उच्चांक गाठला.निफ्टीने 124 अंकासह गत वर्षभरातील उच्चांकी आकड्यावर झेप घेतली; तर दुसरीकडे सोने दरातही दिवसात विक्रमी 3600 रुपयांची वाढ झाली. पण त्याचबरोबर दरवाढीचे रोज नवनवे विक्रम रचणारी चांदी मात्र घसरली. दोन दिवसांत पाच हजार रुपयांची घसरण झाली.जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता असतानाही कंपन्यांचे तिमाही निकाल समाधानकारक आल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पसरला आहे. त्यातच विदेशी संस्थांनी गुंतवणूक वाढविल्याने सलग तिसर्‍या सत्रात शेअर निर्देशांकाने उसळी घेतली. त्यामुळे सेन्सेक्सने चार महिन्यांचा उच्चांकी आकडा गाठला असून निफ्टीने गत वर्षभरातील उच्चांकी आकड्यावर झेप घेतली आहे.मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्स 484 अंकांनी (0.58 टक्के) वाढून 83,952 अंकांवर गेला. सेन्सेक्सची 26 जून 2025 नंतरची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक 124 अंकांनी (0.49 टक्के) वधारून 25,709 अंकांवर झेपावला. निफ्टीची ही गत वर्षभरातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्स 1,921 अंकांनी आणि निफ्टी निर्देशांक 563 अंकांनी वधारला आहे.उच्चांकापासून दोन पावले दूरसेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक आत्तापर्यंतच्या उच्चांकी आकड्यापासून अवघे दोन टक्के दूर आहे. गतवर्षी 27 सप्टेंबर रोजी सेन्सेक्सने उच्चांकी 85,978 आणि निफ्टी निर्देशांक 26,277 अंकांवर गेला होता.सोन्याची उसळी, चांदी उतरलीजळगाव येथील सराफ बाजारामध्ये दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या विक्रमी वाढ झाली; तर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3 हजार 600 रुपयांनी वाढ झाली असून चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील शुल्क आणि कर वेगवेगळे असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी या दोन्ही धातूंच्या दरांमध्ये तफावत दिसून येते. सोन्याच्या दहा ग्रॅमसाठी दर जीएसटीसह 1 लाख 35 हजार 239 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा प्रतिकिलो दर जीएसटीसह 1 लाख 80 हजार रुपये झाला आहे. जळगावात सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दराने विनाजीएसटी 1 लाख 31 हजार 300 रुपयांचा टप्पा गाठला आहे….तर सोन्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यतासोने-चांदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढत असल्याने चांदीबरोबर जळगावच्या सराफ बाजारांमध्ये सोन्याचाही काही प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याचे सराफ व्यावसायिक यांनी सांगितले. अशाच पद्धतीने दर वाढत राहिल्यास दिवाळीत ऐन मुहूर्तावर सोन्याचा मोठा तुटवडा जाणवेल, अशी शक्यतादेखील सराफ व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे.चांदी पाच हजारांनी स्वस्तचांदीने यावर्षी इतिहास रचला. एक किलो चांदीचा भाव 1 लाख 85 हजार झाला होता. गेल्या दोन दिवसांत चांदीत पाच हजारांची घसरण झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

कार्तिकी यात्राः वारकरी, भाविकांच्या सोयी सुविधांबाबत योग्य नियोजन करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

संबंधित यंत्रणांनी सर्व कामे २७ ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करावीत

पंढरपूर (प्रतिनिधी) कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि. ०२ नोव्हेंबर, २०२५ रोजी असून, यात्रा कालावधी दि.२२ ऑक्टो. ते ०५ नोव्हें. असा आहे. या यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व संबधित विभागांनी समन्वय साधून योग्य नियोजन करावे, तसेच सर्व कामे २७ ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज, महाविद्यालय येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारीराजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, नगरपालिका जिल्हा प्रशासन अधिकारी योगेश डोके, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना ज्याप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या होत्या त्याप्रमाणेच कार्तिकी यात्रा कालावधीतही सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. नगरपालिकेने शहरातील खड्डे तात्काळ बुजवावेत, सीसीसी टीव्ही यंत्रणा सुस्थितीत ठेवावी. मुबलक स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा करावा, चंद्रभागा वाळवंटात अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक ला वावेत. आवश्यक ठिकाणी बॅरर्केटींग करावे अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांची तसेच प्रसादलयाच्यादुकानांची तपासणी करण्यासाठी जादा पथकाची नेमणूक करावी. शेगांव दुमाला ते जुना दगडीपुल येथे कोणत्याही स्टॉलला परवानगी देवू नये. जुना दगडी पुलाला बॅरेकेटींग करावे. बोटीत भाविकांसाठी लाईफ जॅकेटची व्यवस्था करावी. कार्तिकी यात्रा कालावधीत वाखरी येथे जनावरांचा बाजार मोठ्याप्रमाणात भरत असल्याने संबधित यंत्रणेने आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच बाहेरील राज्यातून येणाऱ्या जनावरांची चेक पोस्टवरच आरोग्य तपासणी करावीमंदीर समि समितीने दर्शनरांगेत, दर्शनमंडपात भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. फायर ऑडीट व इलेक्ट्रीक ऑडीट करुन घ्यावे वाहतुक विभागाने शहरातील अंतर्गत प्रवासी वाहतुक करताना रिक्षा चालकांकडून जादा दराची आकारणी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने मुबलक औषधांचा पुरवठा उपलब्ध ठेवावा. यात्रा कालावधीत तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी. भक्ती सागर (६५ एकर) येथील प्लॉटचे वाटप सुरु करावे. तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी गॅस व इलेक्ट्रीक तपासणीसाठी पथकांची नेमणूक करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी दिल्या.यावेळी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना जलद व सुखकर दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून योग्य नियोजन करण्यात आले असून, पत्राशेड, दर्शनरांगेतील भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे सांगितले. त्याचबरोबर नगरपालिका प्रशासनाकडून भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता. स्वच्छतेसाठी जादा हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक, नदी पात्रातील स्वच्छता, तात्पुरते शौचालय व्यवस्था, भक्ती सागर (६५ एकर) सर्व सुविधा भाविकांना उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

मुंबईतील राम मंदिर स्टेशन वर अनुभव नसताना राँचो स्टाईलने युवकांनी केली महिलेची प्रसुती,

वैद्यकीय अनुभव नसतानाही व्हिडीओ कॉलद्वारे माहिती घेत केली प्रसूती

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकास बेद्रे या तरुणाने तात्काळ डॉ. देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासने यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली..याचा विडिओ सोशल मिडियावर वायरल झालायमाहितीनुसार, काल रात्री १२.४० च्या सुमारास एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती. प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी ओरडू लागली. तिच्या मदतीसाठी कोणी धावून आले नाही. यावेळी त्यातच डब्ब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणाने तात्काळ ट्रेनची इम्रर्जन्सी चैन ओढली. यामुळे राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली.डॉ. देविका देशमुख यांनीही मध्यरात्रीची वेळ असतानाही माणुसकीच्या नात्याने लगेचच तो उचलून प्रतिसाद दिला. यानंतर देविका यांनी विकास बेद्रे यांना व्हिडीओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप समजावून सांगितली. विकास बेद्रे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही, डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचे तंतोतंत पालन केले.

भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल एक म ोठा दावा केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. त्यांनी याचे रशियावर दबाव वाढवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमधील हे एक मोठे पाऊल असल्याचेम्हटले आहे.ट्रम्प म्हणाले की, युक्रेन युद्धामुळे रशियाला एकाकी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे याबद्दल मला आनंद नव्हता, परंतु पंतप्रधान मोदींनी मला आश्वासन दिले आहे की भारत आता असे करणार नाही. हे एक मोठे पाऊलअसून आता आम्हाला चीनकडूनही अशीचअपेक्षा आहे.भारत एक विश्वासार्ह भागीदार :ट्रम्प यांनी भारताला एक विश्वासार्ह भागीदार म्हटले असून ते (पंतप्रधान नरेंद्र म ोदी) माझे मित्र आहेत. आमचे खूप चांगले संबंध आहेत. रशियाकडून तेल खरेदी करण्याबद्दल आम्हाला आनंद नव्हता कारण त्यामुळे रशियाला हे निरर्थक युद्ध सुरू ठेवता येत होते. या युद्धामध्ये १,५०,००० लोक, बहुतेक सैनिक गमावले आहेत.हे असे युद्ध आहे जे कधीही सुरू व्हायला नको होते, परंतु हे असे युद्ध आहे जे रशियाने पहिल्या आठवड्यात जिंकायला हवे होते आणि ते चौथ्या वर्षात प्रवेश करत आहेत. मला ते थांबलेले पहायचे आहे. म्हणूनच भारत तेल खरेदी करत आहे याबद्दल मला आनंद नव्हता. ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिका पाश्चात्य निर्बंध प्रभावी व्हावेतआणि रशियाच्या लष्कराला निधी मिळू नयेयासाठी दबाव वाढवत आहे.भारताऐवजी घेतले इराणचे नाव :डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय वारंवार घेतले आहे. त्यांनी अलिकडेच दावा केला आहे की भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. या सगळ्यामध्ये, एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे ज्यामभारताने केली भूमिका स्पष्टभारताने आधीच स्पष्ट केले आहे की रशियाकडून तेल खरेदी करणे त्याच्या उर्जेच्या गरजांवर आधारित आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यापूर्वी म्हटले आहे की भारताची इंधन खरेदी राष्ट्रीय हिताच्या आधारे केली जाते. आम्ही राजकीय विचारांवर आधारित कोणत्याही देशाकडून आयात करत नाही. आमचे निर्णय बाजारातील वास्तवानुसार घेतले जातात. भारत असेही म्हणतो की त्याची आयात रशियन तेलावर जी ७ ने निश्चित केलेल्या किंमत मयदिनुसार आहे आणि आम्ही सर्व आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करून देशांतर्गत ऊर्जेच्या गरजा पूर्ण करत आहे.ध्ये ट्रम्प यांचा भारत आणि इराणबाबत गोंधळ झाल्याचे दिसत आहे. त्यांनी भारताऐवजी इराणशी युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे.पत्रकारांशीझालेल्या संभाषणादरम्यान, ट्रम्प भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्याचे श्रेय घेत होते. ते म्हणाले, उदाहरणार्थ, पाकिस्तान आणि इराण अणुशक्ती आहेत.मला कळले की ते एकमेकांवर गोळीबार करत आहेत. त्यानंतर मी दोघांना सांगितले की जर त्यांनी युद्ध थांबवले नाही तर मी २०० टक्के शुल्क लादून अमेरिकेसोबतचा व्यापार पूर्णपणे तोडून टाकेन. युद्ध २४ तासांत थांबले. हे अणुयुद्धात वाढू शकले असते. ट्रम्प यांना भारत म्हणायचे होते, परंतु ते गोंधळले आणि वारंवार इराणचा उल्लेख करत होते.

चांदीच्या दरवाढीला अचानक ब्रेक

चांदी ८००० रुपयांनी स्वस्तनवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात जोरदार तेजी पाहायला मि ळाली होती. मात्र, आज चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मि ळाली. सोन्याच्या दरात आज देखील वाढ सुरु आहे. चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याची माहिती इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर पाहता येतील.१६ ऑक्टोबरला सांयकाळी ५ वाजताच्या आयबीजेएच्या दरानुसार १ किलोचे चांदीचे दर१६८०८३ रुपये आहेत. आज सकाळी चांदीचा दर १७०८५० रुपये किलो होता. तर, १५ ऑक्टोबरला चांदीचा १ किलोचा दर १७६४६७ रुपये होता. म्हणजेच आज सकाळच्या तुलनेत चांदीच्या दरात २८०० रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या दरात ८४०० रुपयांची घसरण झाली आहे.आयबीजेएच्या दरानुसार चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बुलियन मार्केटमध्ये चांदीचा उच्चांकी दर

गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व मंत्र्यांनी दिला राजीनामा

भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील गुजरात मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी होणार आहे. आज (दि.१६) तत्पूर्वी सर्व मंत्र्यांनी आपले राजीनामे सादर केले. सध्याच्या मंत्र्यांपैकी जवळपास निम्मे मंत्री बदलले जाऊ शकतात, अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात राज्यात सुमारे १० नवीन मंत्री येऊ शकतात आणि भूपेंद्र पटेल यांनी १२ डिसेंबर २०२२ रोजी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रपटेल यांचा मंत्रिमंडळ विस्तार शुक्रवारी सकाळी ११:३० वाजताहोणार आहे. सध्याच्या गुजरात मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह एकूण १७ मंत्री आहेत. आठ कॅबिनेट-स्तरीय मंत्री आणि तेवढेच राज्यमंत्री (चेड) यांचा समावेश आहे. १८२ सदस्य संख्या असणार्या गुजरात विधानसभेत २७ मंत्री असू शकतात, सभागृहातील एकूण मंत्र्यांच्या १५ टक्के आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, गुजरात सरकारमधील माजी राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांनी केंद्रीय मंत्री सीआर पाटील यांच्या जागी भाजपच्या राज्य युनिटचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली

जिल्हा परिषद, पंचायत समितीतही स्वीकृत सदस्य

सोलापूर : महापालिका, नगरपालिकांसह सहकारी संस्थांच्या धर्तीवर जिल्हा परिषद व पंचायत समितीतही आता स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून, तसा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामविकास विभागाला यासंदर्भातील अधिनियमात दुरुस्ती करण्याची सूचना केली आहे.जिल्हा बँक, जिल्हा दूध संघासह साखर कारखाने आणि मोठ्या संस्थात यापूर्वीच स्वीकृत संचालक घेण्याची पद्धत आहे. सत्तारूढ गटाशी जवळीक असलेल्यांची अशा पदांवर नियुक्ती केली जाते. त्याचप्रम ाणे महापालिका आणि नगरपालिका, नगरपंचायतीतही स्वीकृत नगरसेवक घेतले जातात. त्या-त्या संस्थांच्या सदस्य संख्येवर स्वीकृत संचालकांची संख्या ठरली जाते. महापालिकेत पाच तर नगरपालिका, नगरपंचायतीतदोन सदस्य स्वीकृत म्हणून घेतले जातात.जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात मात्र स्वीकृत सदस्य घेण्याची तरतूद नव्हती. आता राज्यातील सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. हीच संधी साधून महसूलमंत्री बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेत पाच, तर पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्य घेण्यासाठी अधिनियमातसाहेब, आण्णा, दादा, मामांना मिळणार संधी, अधिनियमात दुरुस्ती होणारदुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिला आहे. समाजाभिमुख काम करणाऱ्या पण निवडणूक लढवण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्याला विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मि ळावी व स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक विकासाभिमुख,प्रभावी व सर्वसम वेिशक व्हावा या उद्देशाने या निवडी महत्त्वाच्या असल्याचे बावनकुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही प्रस्तावाची दखल घेत, ग्रामविकास विभागाला या पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महसूलमंत्र्यांची मागणी आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्यापूर्वी यासंदर्भातील जिल्हा परिषद अधिनियमात बदल१७ ऑक्टोबर २०२५ पृष्ठ क्रमांक ५ समर्थित: erelego.comजिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्यांची संकल्पनाःमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका वनगरपालिकांच्या धर्तीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत स्वीकृत सदस्य घेण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेसादर केला आहे.मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिकाःमुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावाची दखल घेत ग्रामविकासविभागाला अधिनियमात दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे या नव्या तरतुदीस हिरवा कंदील मिळण्याची शक्यता वाढली आहे.समाजाभिमुख कार्यकर्त्यांना संधीःया निर्णयामुळे निवडणूक न लढवता समाजासाठी काम करणाऱ्या पात्र कार्यकत्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक सर्वसमावेशक बनवण्याची संधीहोऊन स्वीकृत सदस्य निवडीला ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे.

पंजाबच्या डीआयजीच्या घरात कोट्यवधीचे घबाडरोकड, सोने, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी सुरूच !

नवी दिल्ली: पंजाबमध्ये पाच लाख रुपयांची लाच घेताना, सीबीआयने रंगेहाथ अटक केलेले भ्रष्ट डीआयजी हरचरण भुल्लर यांच्या ठिकाणांच्या घेण्यात आलेल्या झाडाझडतीत कुबेराचं घबाड सापडलं आहे. कोट्यवधींची रोकड, सोन्याचे दागिणे, महागड्या घड्याळी, अलिशान कार आणि बरच काही पाहून तपास अधिकारी हबकले होते.सीबीआयने भुल्लर यांना पाच लाखांची लाच घेतना रंगेहाथ पकडल्यानंतर, त्यांच्या अन्य कार्यालयांसह घरी छापेमारी केली. ज्यामध्ये आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार पाच कोटी रुपयांची रोख रक्कम, दीड किलो सोने, म हागड्या घड्याळी आणि मर्सिडिज, ऑडी सारख्या अलिशान कारच्याचाव्या जप्त करण्यात आल्या आहेत.वारातून तर महत्वाची बाब म्हणजे डीआयजींच्या जप्त करण्यात आलेली रोख रक्कमेची अद्यापही मोजणी सुरूच आहे. शिवाय, सोने-चांदींच्या दागिन्यांसह अनेक फ्लॅट्स व जमिनीची कागदपत्रे देखील जप्त करण्यात आले आहे.सीबीआयने भुल्लर यांच्यासह आणखी एका व्यक्तीला याप्रकरणात रंगेहाथ अटक केली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे हरचरण सिंग भुल्लर यांचे वडील मेजर मेहल सिंग भुल्लर पंजाब पोलिस दलातच डीजीपी होते आणि त्यांचे धाकटे बंधू काँग्रेसचे माजी आम दार आहेत.

सर्व रेशन कार्डधारकांना गहू, तांदूळ आणि LPG गॅस सिलिंडर मोफत मिळणार

Ration Card News Updates

सर्व रेशन कार्डधारकांना गहू, तांदूळ आणि LPG गॅस सिलिंडर मोफत मिळणार

केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक नवा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत सर्व शिधापत्रिका धारकांना मोफत गहू, तांदूळ आणि एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सरकारने नवीन धोरणांतर्गत गरजू कुटुंबांना अन्नधान्यासोबत आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. ज्यांच्याकडे जुनी किंवा नवी रेशन कार्डे आहेत, त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल. पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1000 रुपयांची मदत रक्कमही दिली जाईल. विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत, विधवा, दिव्यांग आणि गरीब नागरिकांना या उपक्रमातून मोठा आधार मिळणार आहे.

रेशन कार्डधारकांसाठी मोठा निर्णय

या योजनेचा फायदा फक्त त्याच नागरिकांना मिळणार आहे जे या योजनेशी अधिकृतपणे जोडलेले आहेत आणि दरवर्षी आपले ‘केवायसी’ (KYC – Know Your Customer) अद्ययावत करून घेतात. नियमितपणे केवायसी पूर्ण करणाऱ्या लोकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर ठरेल. देशातील विविध राज्य सरकारांकडून नागरिकांना मदत म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आणि इतर वस्तूंचे वितरण केले जाते. काही राज्यांमध्ये तांदूळ, गहू, डाळ, साखर यांसोबतच साबण, सर्फ, कपडे आणि आवश्यक वस्तूंचाही समावेश असतो. प्रत्येक राज्य सरकार आपल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी या माध्यमातून मदत करत असते.मोफत धान्य आणि आर्थिक सहाय्यरेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या माहितीनुसार, आता लाभार्थ्यांना मोफत धान्याबरोबरच दरमहा ₹1000 इतकी आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचा उद्देश गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देणे हा आहे. सरकारने सांगितले आहे की, लाभार्थ्यांना साखर, तेल, तांदूळ, गहू, डाळी, साबण, सर्फ, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जातील. काही राज्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी आधीच सुरू झाली आहे. तसेच पात्र कुटुंबांना एलपीजी गॅस सिलेंडरचाही लाभ दिला जाईल.

दिवाळीपूर्वी रेशन कार्डधारकांसाठी योजन

केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. नवीन जाहीर केलेल्या योजनेनुसार, सर्व शिधापत्रिका धारकांना अधिक प्रमाणात धान्य आणि काही नवीन वस्तू मिळणार आहेत. तसेच सरकारकडून त्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्यही दिले जाणार आहे. बीपीएल आणि गरीब, असहाय्य तसेच बेरोजगार कुटुंबांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तांदूळ, गहू आणि इतर आवश्यक वस्तू मोफत पुरवल्या जातील. याशिवाय प्रत्येक पात्र लाभार्थ्याला ₹1000 इतकी मदत रक्कम देण्यात येईल. या निर्णयामुळे गरजू लोकांना सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा मिळणार आहे.

रेशन दुकानातील मोफत वस्तू

जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, तर सरकारकडून तुम्हाला स्वस्त दरात किंवा मोफत धान्य व आवश्यक वस्तू मिळतात. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरमहा 22 किलो गहू आणि 12 किलो तांदूळ वितरित केले जातील. तसेच दर महिन्याला 2 किलो डाळ, 1 किलो साखर आणि आवश्यकतेनुसार मीठदेखील मिळेल. या सर्व वस्तू जवळच्या रेशन दुकानातून सहज मिळू शकतात. यामुळे कुटुंबांचा अन्नधान्यावरचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. घरगुती बजेट अधिक संतुलित राहील आणि आर्थिक ताण कमी जाणवेल. सरकारची ही योजना गरीब व मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण

ग्रामीण भागात सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण इथल्या बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) रेशन कार्डधारकांसाठी सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना मोफत एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गावांमध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा निर्णय अनेक कुटुंबांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. लोकांमध्ये या निर्णयाबद्दल उत्साह आणि समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. अनेकांनी सरकारचे आभार मानत सांगितले की, आता त्यांना लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करावा लागणार नाही.