माळशिरस तालुका

लाडक्या बहिणींना चक्क देवेंद्र फडणवीस यांचा फोन

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नावानिशी लाडक्या बहिणीला फोन केला जात आहे.सदर फोन हा रेकॉर्ड फोन असून लाडक्या बहिणीला स्वतः देवेंद्र फडणवीस महिलेचं नाव घेऊन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भाजपलाच मतदान करा असं फोनवर बोलत असल्याने या फोनबाबत सर्व महिलांमध्ये चर्चा सुरू आहे. प्रत्येक महिला एकमेकींना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. आणि भाजपलाच मतदान करा असं त्या फोन मधून सांगण्यात येत आहे. अशा प्रकारचा प्रचार भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.  

रश्मी शुक्ला यांची महासंचालक पदावरून बदली, रश्मी शुक्ला या भाजपसाठी काम करत होत्या-नाना पटोले

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली झाली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसतंय. रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. तसंच रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत, असाही आरोप नाना पटोलेंनी केला होता.

निवडणूक आयोगाकडून बदली करण्याचा आदेश नाना पटोले, काँग्रेसच्या या आक्षेपानंतर आता भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. एकीकडे या निवडणुकीची धूम चालू असताना दुसरीकडे निवडणूक आोयगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा आदेश दिला आहे. तसेच नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला या भाजपसाठी काम करत होत्या असेही आरोप केले आहेत.

राज्यात १८ ते १९ वयोगटातील २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार ३९२ मतदार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-

राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १८ ते १९ वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले ४७ हजार ३९२ मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.राज्यातील एकूण मतदारांमध्ये ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष, ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला तर ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार असे एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. यामध्ये १८ ते १९ वर्षे वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४ मतदारांमध्ये पुरुष। मतदार १२ लाख ९१ हजार ८४७, ९ लाख ३० हजार ७०४ महिला तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १५३ इतकी आहे. २० ते २९ या वयोगटातील एकूण १ कोटी ८८ लाख ४५ हजार ००५ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी १ लाख ६२ हजार ४१२, महिला मतदार ८६ लाख ८० हजार १९९ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २३९४ इतकी आहे. ३० ते ३९ या वयोगटातील एकूण २ कोटी १८ लाख १५ हजार २७८ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी ११ लाख २१ हजार ५७७, महिला मतदार १ कोटी ६ लाख ९१ हजार ५८२ तरतृतीयपंथी मतदारांची संख्या २ हजार ११९ इतकी आहे. ४० ते ४९ या वयोगटातील एकूण २ कोटी ७ लाख ३० हजार ५९८ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी ७ लाख ४९ हजार ९३२, महिला मतदार ९९ लाख ७९ हजार ७७६ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ८९० इतकी आहे. ५० ते ५९ या वयोगटातील एकूण १ कोटी ५६ लाख १० हजार ७९४ मतदारांमध्ये पुरुष मतदार ७८ लाख ५४ हजार ०५२, महिला मतदार ७७ लाख ५६ हजार ४०८ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ३३४ इतकी आहे. ६० ते ६९ या वयोगटातील एकूण ९९ लाख १८ हजार ५२० मतदारांमध्ये पुरुष मतदार ५० लाख ७२ हजार ३६२, महिला मतदार ४८ लाख ४६ हजार २५ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १३३ इतकी आहे.वर्ष ७० ते ७९ या वयोगटातील एकूण ५३ लाख ५२ हजार ८३२मतदारांमध्ये पुरुष मतदार २६ लाख ३६ हजार ३४५, महिला मतदार २७ लाख १६ हजार ४२४ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ६३ इतकी आहे. ८० ते ८९ या वयोगटातील एकूण २० लाख ३३ हजार ९५८ मतदारांमध्ये पुरुष मतदार ९ लाख १५ हजार ७९८, महिला मतदार ११ लाख १८ हजार १४७ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १३ इतकी आहे. ९० ते ९९ या वयोगटातील एकूण ४ लाख ४८ हजार ३८ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ लाख ९७ हजार ३२३ तर महिला मतदारांची संख्या २ लाख ५० हजार ७१५ इतकी आहे.वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेल्या १०० ते १०९ या वयोगटातील एकूण ४७ हजार १६९ मतदारांमध्ये पुरुष मतदार २० हजार ९८३, महिला मतदार २६ हजार १८४ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २ आहे. ११० ते ११९ या वयोगटातील एकूण ११३ मतदारांमध्ये पुरुष मतदार ५२ तर महिला मतदारांची संख्या ६१ आहे. तर १२० हून अधिक वयोगटातील ११० मतदारांमध्ये पुरुष मतदार ५६ तर महिला मतदारांची संख्या ५४ आहे. ODविशेष वयोगटामध्ये ८५ ते १५० वयोगटामधील एकूण १२ लाख ४० हजार ९१९ मतदारांमध्ये ५ लाख ४२ हजार ८९१ पुरुष, ६ लाख ९८ हजार ०२२ महिला आणि ६ तृतीयपंथी मतदार आहेत. तर १०० ते १५० वयोगटामधील एकूण ४७ हजार ३९२ मतदारांमध्ये २१ हजार ९१ पुरुष, २६ हजार २९९ महिला आणि २ तृतीयपंथी मतदार आहेत. त्याचबरोबर एकूण ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदारांमध्ये पुरुष मतदार ३ लाख ८४ हजार ६९, महिला मतदार २ लाख ५७ हजार ३१७ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ३९ इतकी आहे. सेवा दलातील (सर्विहस व्होटर्स) एकूण १ लाख १६ हजार १७० मतदारांमध्ये १ लाख १२ हजार ३१८ पुरुष तर ३ हजार ८५२ महिला मतदार आहेत.राज्यात मतदानासाठी एकूण १ लाख १८६ मतदान केंद्र उभारण्यात येत असून यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र असणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर ! जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल

तसेच या कारवाईत प्रामुख्याने राज्य पोलीस विभागाने सुमारे ७५ कोटी रूपये, इन्कम टॅक्स विभागाने सुमारे ६० कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे ११ कोटी रूपये यांचा प्रामुख्याने सम वेिश आहे. मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या ‘सी-व्हिजील’ पवर तक्रार येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे असं निवडणूक , खेड शिवापूरमध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम मुंबई अहमदाबाद मार्गावरील उधवा येथील चेक पोस्टवर कोटी २५ लाख रुपयांची रोकड: राज्यात सगळीकडे निवडणुकीचंवारं वाहत आहे. यातच राज्यात निवडणुकीसाठी पैशांचा महापूर आल्याचं चित्र प्रशासकीय कारवाईतून दिसून येते. राज्यात १५ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचं बिगुल वाजताच आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर प्रशासनाने कठोरपणे नाकाबंदी, तपासणी करून बेकायदेशीर कृत्यावर कारवाई करणे सुरू केले.निवडणुकीची आचारसंहिता लागताच राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे ही कारवाई करण्यात येत आहे. त्यात बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पद्धतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे असं निवडणूक आयोगाने म्हटलं.करता आयोगाने सांगितले. पालघर ४ पोलिसांनी केली जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रशासित प्रदेशातील सिलवासा येथे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ही रोकड नेण्यात येत होती असं सांगण्यात आले. बँकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं पोलिसांनी ऐकले परंतु ही रोकड म हाराष्ट्र राज्याच्या बॉर्डरवर आली कशी? असा प्रश्न पालघर पोलिसांनी उपस्थित केला आहे. सध्या या रोख रकमेची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी रोकड, दारू जप्त करण्यात येत आहे. याआधी पुणे बंगळुरू हायवेवर खेड शिवापूर टोल नाक्याजवळ खासगी कार पोलिसांनी अडवली.

सौंदणेच्या तरूणाचा माढ्यात मर्डर

माढ्यात सशयावरून झालेल्या मारहाणीत मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथील संतोष दगडू भानवसे या तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून पाच जणांवर माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी बापूराव दगडू भानवसे रा.सौंदणे ता मोहोळ यांनी माढा पोलिसात फिर्याद दाखल केली असून संतोष दगडू भानवसे मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास माढ्यातील एका महिलेच्या घरीभेटण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी सोमनाथ उत्तम इतापे, सागर उत्तम इतापे, अतूल बाबुराव घाडगे, रत्नदिप महादेव शेळके, अक्षय शंकर वाळूजकर यांचे सोबत वाद झाल्याने मयत संतोष यास सोमनाथ इतापे, सागर इतापे, अतूल घाडगे, रत्नदिप शेळके, व अक्षय वाळूजकरयांनी प्लास्टिक पाइप, कमरेचा बेल्ट, व गॅसचा नळीने मारहाण केल्याने व डोक्यास मार लागल्याने उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला म्हटले आहे. याम धील संशयित आरोपींना माढा पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज बुधवारी माढा न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.मयत संतोष दगडू भानवसे असल्याचे फिर्यादीतया घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नेताजी बंडगर करत आहेत.

९,७०,२५,११९ महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या; निवडणूक आयोगाची माहिती

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज

नेटवर्कविधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यातील २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने अद्ययावत मतदार यादी जारी केली आहे. त्यानुसार, राज्यात ९ कोटी ७० लाखांपेक्षाही जास्त नोंदणीकृत मतदार आहेत.निवडणक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. त्यापैकी ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष, तर ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. याशिवाय ६ हजार १०१ तृतीयपंथी म तदार आहेत. महाराष्ट्रात १८ ते १९ वर्ष वयोगटातील एकूण२२ लाख २२ हजार ४०७ मतदार आहेत. याचा अर्थ जवळपास २२ लाख मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आ- हेत. आयोगाच्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक मतदार ३०ते ३९ वर्ष वयोगटातील आ हेत. त्यांची संख्या २ कोटी १८ लाख १५ हजार २७८ इतकी आहे. याशिवाय ८५ ते १५० वर्ष वयोगटातील १२ लाख ४० हजार ९१९ मतदार आहेत. यापैकी १२० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ११० मतदार आहेत. ज्यात ५६ पुरुष, तर ५४ महिला आहेत.निवडणूक आयोगाकडून विशेष उपक्रमप्रक्रियेतील नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोग विशेष उपक्रम राबवले जात आहेत. तसेच नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून विविध उपक्रम घेतले जात आहे. दिव्यांग म तदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर वयोवृद्ध नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान केलं जाणार आहे.

मनोज जरांगें पाटील यांची प्रकृती बिघडली

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृतीबिघडली आहे. त्यांच्यावर अंतरवाली सराटीमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रकृती बिघडल्यामुळे राहत्या घरीच जरांगे पाटील यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले. जरांगे पाटील यांना घरीच सलाईन लावण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार करणा- या डॉक्टरांनी सांगितले की, जरांगे पाटील यांना रात्रीपासून ताप येत होता. त्यांना तापासोबत अंगदुखी, अशक्तपणा, घशाचे इन्फेक्शन आणि कफ झाला आहे. ही सर्व व्हायरलची लक्षणे आहेत. त्यामुळे आज सकाळी त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. त्यांचे रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

माळशिरस विधानसभा फॉर्म छालनीत 35 अर्जापैकी 25 उमेदवार पात्र तर 4 उमेदवार अपात्र

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क-प्रमोद शिंदे

माळशिरस २५४ अनुसूचित जाती विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माळशिरस विधानसभेसाठी २९ उमेदवारांनी ३५ नामनिर्देशपत्र दाखल केलेली होती. त्यापैकी २५ उमेदवारांची नामनिर्देशनपत्र पात्र झालेली असून ४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्र अपात्र ठरलेली आहेत.

शरद गेना सावंत अपक्ष , अरुण मनोहर धाईंजे अपक्ष, सोमनाथ अरुण भोसले अपक्ष, मकरंद नागनाथ साठे अपक्ष, उत्तमराव शिवदास जानकर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, सुरज अशोक सरतापे बहुजन समाज पार्टी, प्रेमसिंह ज्ञानदेव कांबळे अपक्ष, मनोजकुमार उत्तम सुरवसे अपक्ष, नागेश आबा जाधव अपक्ष, राज यशवंतकुमार वंचित बहुजन आघाडी, सुधीर अर्जुन पोळ अपक्ष, कुमार आनंदा लोंढे अपक्ष, राम विठ्ठल सातपुते भारतीय जनता पार्टी, ज्ञानेश्वर मारुती काटे अपक्ष, अतुल श्रीमंत सरतापे अपक्ष, विकास संदिपान धाईंजे अपक्ष, दादा विश्वनाथ लोखंडे अपक्ष, साळवे नंदकुमार कृष्णाजी अपक्ष, प्रकाश वामन नवगिरे अपक्ष, अनिल तानाजी साठे अपक्ष, शैलेश जनार्दन कोथमिरे अपक्ष, प्रा. डॉ. धनंजय तुकाराम साठे अपक्ष, प्रा. डॉ. सुनील सुखदेव लोखंडे राष्ट्रीय समाज पक्ष, त्रिभुवन विनायक धाईंजे अपक्ष अशा २५ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र पात्र झालेले आहेत.

तर, अनिल गौतम नवगिरे, संस्कृती राम सातपुते, अडगळे लालासाहेब ज्ञानोबा, किशोर शिवाजी सुळ असे चार उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अपात्र ठरलेले आहेत.

अकलूज उपविभागीय कार्यालय अकलूज येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांना सहकार्य सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सुरेश शेजुळ हे काम पाहत आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज, माळशिरस, नातेपुते आणि वेळापूर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे.

माळशिरस तालुका संवेदनशील असल्याने एसआरपी तैनात करण्यात आलेली आहे. उमेदवारी अर्ज शांततेत दाखल झालेले होते. नामनिर्देशन पत्रांची छाननी देखील शांततेत पार पडलेली आहे. दि. ४/११/२०२४ तारखेला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची वेळ ३ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर चिन्ह वाटप होऊन माळशिरस तालुक्यातील निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

चोऱ्या दरोडे रोखण्यासाठी नागरिकांनीही दक्षता घ्यावी- ए.पी.आय परजणे

चोऱ्या, दरोडे रोखण्याचे काम पोलिसांचे असले, तरी एक सुजाण नागरिक म्हणून परिसरातील चोऱ्या दरोडे रोखण्यासाठी नागरिकांची महत्वाची आहे, असे आव ाहन नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी केले आहे. नागरिक व तरुणांना चोऱ्या, दरोडा पडण्याआधी कोणती काळजी घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात. याचे मार्गदर्शन पोलिसांकडून देऊन तरुणांना ग्रामसुरक्षा दलात सहभागी होण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. दिवाळीच्या सुट्टी असल्याने अनेक नागरिक घराला लॉक लावून कुटुंबासह परगावी फिरावयास जातात मात्र परगावी जात असताना आपल्या घरातील सोन्या चांदीचे दागिने, पैसा व मौल्यवान वस्तू घरातील कपाटात तसेच ठेवून जातात या संधीचा फायदा घेऊन घर फोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने पैसा व मौल्यवान वस्तू चोर चोरी करून घेऊन जातात. त्यामुळे आपले खूप मोठे नुकसान होते. चोरीहोऊ नये यासाठी नागरिकांनी बाहेरगावी जाताना सोन्या चांदीचे दागिने पैसा व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. पोलीस वाहन घेऊन पोलीस गस्तीचे प्रमाण वाढवले आहे. परंतु एकाच वेळी प्रत्येक वस्ती व वाडी ठिकाणी हे वाहन पोहचू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगून काही संशयास्पद वाटल्यास आपत्कालीन नंबर ११२ यावरती तात्काळ पो- लीस ठाण्याशी संपर्क करून माहिती देऊ शकता. असे आ- वाहन नागरिकांना नातेपुते पो- लीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी केले आहे.

अंगावर खाज येण्याची मुख्य कारणे कोणती? – डॉ पल्लवी मेहर

आजकाल खतांशिवाय आणि जंतुनाशकाचा वापर केल्याविना कुठलेही पीक काढले जात नाही. तेव्हा घरी जेवणासाठी आणलेली भाजी, फळे चांगली गरम पाण्याने धुऊन घ्या व मगच वापरा.काही जणांना नेहमीचे जेवनामुळेही त्रास होऊ शकतो खाण्यात नेहमीचेच पदार्थ खाजेचे कारण ठरू शकतात.उदा. अंडे, दूध, पीठ, बेसन, डाळीचे विविध प्रकार, दही, लोणी असे कितीतरी पदार्थ आहेत जे सेवन केल्यावर अंगाला खाज सुटते आजकाल लोकांच्या, मुलांच्या खाण्यात प्रचंड बदल झाले आहेत. त्यात जास्त फास्ट फूड, कुरकुरे, चिप्स, अगदी पाच-पाच रुपयांची पाकिटे बाजारात विकली जात आहेत. फास्ट फूडमध्ये तर नाना तर्‍हेचे रंग मिसळले जातात. तंदुरीवर तर ब्रश घेऊन रंग लावला जातो. त्यांच्या खाण्यामध्ये ऍजिनोमोटो नावाचा पदार्थ वापरला जातो. अक्षरशः पोत्यांनी ही वस्तू हॉटेलांमध्ये पोचवली जाते. कुठलाही फास्ट फूडचा प्रकार सांगा, तो बनवण्यासाठी या ऍजिनोमोटोचा वापर केला जातो. कारण त्याने म्हणे पदार्थाला चव येते व हा पदार्थ शरीराला अत्यंत घातक आहे. हा सेवन केल्याने अंगाला खाज येते. पुरळ उठतात. तेव्हा फास्ट फूड खाणार्‍यांनो, सावधान!!! तुमच्या अंगाला खाज सुटू शकते.
आपण शरीरावर धारण केलेल्या वस्तूंमुळे, अंगाला लागलेल्या कोणत्याही गोष्टीमुळेसुद्धा अंगाला खाज सुटते. जसे -सिनथेटिक कपडे, कपाळावरील टिकली, साबण, नकली दागिने या सगळ्या गोष्टींनी अलेर्जी निर्माण होऊन त्या भागावर पुरळ व खाज निर्माण होते. काही जणांना काही गोळ्या-औषधे घेतल्यानंतर शरीरावर खाज येऊ शकते. आपल्याला कोणत्या गोळयामुळे त्रास झाला हे लक्षात ठेवून प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे कुठल्याही आजारानिमित्त जाल तेव्हा डॉक्टरांना ते सांगा.त्वचेचे विविध विकार आहेत ज्यामुळे अंगाला खाज सुटते- खरूज, नायटा, बुरशी, सोरिअसिस, पित्त, ऍलर्जी, लिकेन प्लेनस, डोक्यातील कोंडा, यासारखे असे अनेक त्वचाविकार आहेत ज्यामधे खाजेचा त्रास होतो. विविध प्रकारच्या रोगांमध्येही रुग्णाच्या अंगावर पुरळ उठून खाज येते.

You may have missed