माळशिरस तालुका

बचत गट कर्जाची रक्कम घरातून चोरी करणाऱ्या चोरट्यास नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे

नातेपुते पोलीस पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कामगिरी

नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते ता माळशिरस येथे दिनांक १२/०९/२०२४ रोजी दुपारी ०३:००वा ते ०३:३० वा. चे दरम्यान यशश्री स्वंयसहाय्यता बचत गट नातेपुते याचे अध्यक्ष सौ. पौर्णिमा राजेंद्र सोनवळ रा नातेपुते ता माळशिरस व सचिव स्वाती रविद्र पाठक यांनी त्यांचे यशश्री स्वंयसहाय्यता बचत गट नातेपुते यांना मंजुर झालेले कर्ज रक्कम ४,९३,००० /- रु आय सी आय सी बैंक नातेपुते येथील खात्यावरुन काढुन यातील फिर्यादी यशश्री स्वंयसहाय्यता बचत गट नातेपुते याचे अध्यक्ष सौ. पौर्णिमा राजेंद्र सोनवळ रा नातेपुते ता माळशिरस राहते घरी घेवुन आलो असताना सौ.पौर्णिमा राजेंद्र सोनवळ किचनमध्ये चहा बनवायला गवती चहा आणन्यासाठी घराबाहेर गेली असता त्यांचे घरातील शिलाई मशिन वरती सॅकमध्ये ठेवलेले ४,९३,००० रु रोख रक्कम ही सॅक सह कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे उघड्या दवाज्यातुन प्रवेश करुन चोरुन घेवुन गेले म्हणुन त्याबाबत यशश्री स्वंयसहाय्यता बचत गट नातेपुते याचे अध्यक्ष सौ. पौर्णिमा राजेंद्र सोनवळ रा नातेपुते ता माळशिरस यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३०७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (), प्रमाणे दिनांक १५/०९/२०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार हे करीत होते.

सदरचा गुन्हा महिला बचत गटाचे वाटप होणारे कर्जाचे रक्कम चोरीच्या संदर्भात असल्याने सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीसांन समोर मोठे अव्हाण होते. सदरचा गुन्हा उघडकिस आणने करीता मा. श्री अतुल कुलकर्णी साो पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रा. मा.श्री प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रा.मा श्री नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज उपविभाग अकलुज यांनी सक्त सुचना दिल्या होत्या त्यामुळे नातेपुते पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजने सहा. पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ/२११ राहुल रणनवरे, पोहेकॉ / ८५० नवनाथ माने, पोना/५५९ अमोल वाघमोडे, पोना/५६२ राकेश लोहार, पोकॉ/११४५ नितीन पनासे, पोका / २०५८ अस्लम शेख, सायबर पोलीस ठाणेचे पोकॉ/०५ युसुफ पठाण यांनी गुन्हा दाखल होताच पोना/५५९ अमोल वाघमोडे, पोकॉ/ २०५८ अस्लम शेख, यांनी सीसी टीव्ही फुटेज चेक करुन गोपनिय बातमिदारांना सर्तक केले व पोना/५६२ राकेश लोहार यांनी कौशल्य पुर्ण तांत्रिक विश्लेषन करुन आरोपीचा शोध घेवुन सदर गुन्हयात अभिषेक अनिल चव्हाण रा पोलीस मुख्यालय जवळ भावना नगर न्यु पाच्छा पेठ सोलापुर ता उत्तर सोलापुर जि सोलापुर यास ताब्यात घेवुन त्याला विश्वासात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्यांनी नातेपुते पोलीस ठाणे गुरनं ३०७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (a), प्रमाणे गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान गुन्हयात चोरीस गेलेले ४,९३,०००/- रु रोख रक्कम सॅक सह व गुन्हा करतेवेळी वापरलेली ५०,०००/- रु किंमतीची होंडा कंपनी ची युनिकॉर्न मोटारसायकल तिचा आर.टी.ओ नंबर MH-42-J-6117 असा एकुण ५,४३,०००/- रु मुददेमाल आरोपीचे ताब्यातुन जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे नातेपुते पोलीस ठाणे परिसरातील ग्रामस्थांनी नातेपुते पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोना/५६२ राकेश लोहार हे करीत आहेत.

दहिगाव हायस्कूल, दहिगावला जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार .

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- (प्रमोद शिंदे)
प्रगत शिक्षण संस्थेचे दहिगाव हायस्कूल, दहिगाव शाळेला माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे वितरण सोलापूर येथे
शिक्षक आमदार जयंत आसगावकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुभाषराव माने सर,जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप साहेब,प्राथमिक शिक्षणाधिकारी व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार घेण्यासाठी
प्रगत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वंदनादेवी विठ्ठलराव पाटील, मुख्याध्यापक श्री. विलास चव्हाण सर,प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.हा पुरस्कार मिळण्यामध्ये संस्थापक व माजी अध्यक्ष कै. विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांचे अनमोल योगदान आहे. या पुरस्कार प्राप्ती मुळे संस्थेचे तसेच मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांचे पालक व परिसरातून कौतुक होत आहे.

मातीच्या गोळ्याला आकार देणारा महान गुरु म्हणजे शिक्षक : अनंतलाल दोशी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

रंग ,रूप, धर्म ,जात या पलीकडे जाऊन शिष्याला आत्मज्ञान करून देणारा गुरु म्हणजे शिक्षक अशी शिक्षकाची व्याख्या पटवून देताना क्षत्रिय कर्णाचे व गुरु परशुराम यांचा दाखला दिला तसेच कोणत्याही शिष्याने ठरवल्यास तो आपल्या गुरुच्या पुतळ्याकडूनही ज्ञान प्राप्ती करुन घेता येते हे एकलव्य गुरु द्रोणाचार्य यांचा दाखला देत अनंतलाल दोशी यांनी कार्यक्रमावेळी प्रतिपादित केले.
आज एका दिवसासाठी झालेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांचे अध्यापन व विद्यार्थ्यांचे अध्ययन कार्य पाहून आनंद द्विगुणीत झाला आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा विद्यार्थी शिक्षण देताना पाहणे यापेक्षा मोठा आनंद नाही. विद्यार्थ्यांनी आपले नाव जगाच्या पातळीवर उज्वल करावे, या पेक्षा मोठा त्यांच्या शिक्षकांचा सन्मान नाही. रत्नत्रय स्कूल मधील प्रत्येक विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेत आहे याचे समाधान वाटते.
हे सर्व केवळ शिक्षकांमुळेच आम्ही याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे रत्नत्रय स्कूलचे चेअरमन प्रमोद दोशी यांनी आपल्या मनोगतात प्रतिपादन केले. दिनांक 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा यांचा वाढदिवस रत्नत्रय इंग्लिश मीडियम ,विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांचा एक दिवसासाठी झालेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी सन्मान केला. शिक्षक दिनानिमित्त एक दिवसासाठी झालेल्या मुख्याध्यापिका श्रुती दोशी, ओमकार पिसे , उपमुख्याध्यापक विक्रांत घुगरदरे व अगस्ती येडगे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर रत्नत्रय सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष रत्नत्रय परिवाराचे सर्वेसर्वा मा. श्री. अनंतलाल दोशी , स्कूलचे चेअरमन प्रमोद दोशी , वैभव शहा,बबन‌ गोपने , सुरेश धाईंजे , मुख्याध्यापक वाघमोडे सर,शिक्षक दिनानिमित्त एक दिवसासाठी झालेल्या मुख्याध्यापिका श्रुती दोशी, ओमकार पिसे , उपमुख्याध्यापक विक्रांत घुगरदरे व अगस्ती येडगे इ.बारावी, दहावी इंग्रजी व सेमी व चे शिक्षक दिनानिमित्त झालेले सर्व शिक्षक वृंद ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. , या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सुकन्या सरतापे हिने केले तर आभार समीक्षा शिंदे हिने केले.

नातेपुतेत श्रावणी भंडारा निमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
सालाबाद प्रमाणे नातेपुते ता.माळशिरस येथे श्री शंभू महादेव श्रावणी भंडारा उत्सवानिमित्त शंभू महादेव आखाडा येथे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले आहे. या मैदानाला दोनशे वर्षांची परंपरा असून अखंडपणे हा कुस्ती आखाडा सुरू आहे. दरवर्षी श्रावणातल्या शेवटच्या आदल्या सोमवारी या आखाड्याचे व श्रावणी भंडाऱ्याचे आयोजन नातेपुते येथील ग्रामस्थांकडून केले जाते.या आखाड्यात एक लाख 51 हजार रुपये कुस्ती पैलवान प्रकाश बनकर कोल्हापूर विरुद्ध पै.माऊली कोकाटे पुणे ,यांची होणार असून,इनाम 1 लाख 21 हजार साठी पै.दादा शेळके पुणे विरुद्ध पै संदीप मोठे सांगली,इनाम 1 लाख रु साठी पै.वैभव मन पुणे विरुद्ध पै.महारुद्र काळे कुर्डवडी,इनाम 75 हजार पै. आदर्श सोरटे नातेपुते विरुद्ध पै.अभिजित भोईर पुणे.तसेच इनाम 75 हजार ते 25,5 ,2, 1 हजार च्या कुस्त्या नेमली आहेत. कुस्त्यांची सुरुवात सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सहा वाजता शंभू महादेवाची पूजा करून करण्यात येणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन उर्फ आप्पासाहेब भांड यांनी दिली. यावेळी निजाम काझी, मामासाहेब पांढरे, नंदकुमार लांडगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, बाळासाहेब काळे, रंजीत काळे, बापू अर्जुन, देविदास काळे, अतुल बावकर, नारायण काळे, हनुमंत सरक, सुखदेव दडस, शक्ती पलंगे, व ग्रामस्थ उपस्थित होते.

१२ वर्षांच्या शैक्षणिक तपाला अखेर यश : मुरबाडची प्रियंका बोरगे अखेर झाली एमबीबीएस डॉक्टर..!

[पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क:संदेश भालेराव]


ठाणे जिल्ह्यात गेली पंचवीस वर्षे निष्कलंक पत्रकारितेतून आपल्या लिखाणाचा ठसा उमटविणारे अभ्यासू पत्रकार संजय रमाकांत बोरगे यांच्या आजवरच्या संघर्षाला यश आले असून त्यांची मुलगी नुकताच परदेशातून डॉक्टर होऊन भारतात परतली आहे.गेली सहा वर्षे पत्रकार बोरगे यांची थोरली मुलगी डॉ. प्रियंका संजय बोरगे ही रशिया येथे एमबीबीएस (MBBS) पदवीचे वैद्यकीय शिक्षण घेत होती. तत्पूर्वी तिने इयत्ता सहावी ते बारावी असा सहा वर्षीय माध्यमिक-उच्च मध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय माहीम पालघर येथे पूर्ण करून एकंदरीत सुमारे बारा वर्षांचा एक शैक्षणिक तप या पदवी पर्यंत पोहचण्यासाठी खर्ची लावला आहे. दरम्यान, वडील संजय बोरगे व कुटुंबियांनी कठोर आर्थिक परिस्थितीचा सामना करून लेकीला डॉक्टर झालेलं पाहण्याचे स्वप्न वास्तवात आणले. बोरगे हे पत्रकारिते सोबत उदरनिर्वाहसाठी मुरबाड एमआयडीसीमधील टायगर स्टील कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत आहे. कौटुंबिक परिस्थिती हालाकीची असतांना देखील प्रियंकाच्या शिक्षणात खंड पडू न दिल्याने आज बोरगे कुटुंबियांच्या संघर्षाचे सोनं झालेले पाहायला मिळत आहे.वडिलांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी प्रियंका हिने तत्पूर्वीच यूट्यूबच्या माध्यमातून इंग्रजी व रशियन भाषेचा सराव करून अल्पावधीतच त्यावर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळविले होते. सर्व कागदोपत्री तरतुदींच्या अटी शर्ती पूर्ण करून प्रियंका अखेर रशियाला रवाना झाली खरी मात्र, तोच कोरोनाच्या महामारीने जन्म घेतला व पाहता पाहता अवघे जग पादाक्रांत केले. यात सुरुवातीला रशियाचा प्रांत सर्वाधिक रेड अलर्टच्या छायेत राहिला. त्यामुळे अनेक भयभीत विद्यार्थी भारतात परतले. परंतु, प्रियंकाने हार न मानता चिकाटीने आपल्या वडिलांच्या स्वप्नाला तथा पर्यायाने अवघ्या मुरबाड तालुक्याच्या अस्मितेला सकारात्मक स्वरूप देण्याच्या प्रयत्नांना कमी पडू दिले नाही. कोरोनाचा दीर्घ काळ उलटल्यावर प्रियंका प्रथमच भारतात परतली होती. तेव्हा, समाजाच्या विविधांगी स्तरावरून कित्येकांनी तिचे भरभरून कौतुक केले. यानंतर प्रियंका पुन्हा कर्तव्यावर पोहचल्यानंतर युक्रेन – रशिया महायुद्धाचे नगारे वाजले. याचा अपरिहार्य परिणाम पुन्हा रशियातील भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पडला. मात्र शिक्षणाच्या अदम्य भावनेने झपाटलेल्या प्रियांकाला तिच्या उचित ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी हे अडथळे रोकू शकले नाही व अखेर मोठ्या जिद्दीने एमबीबीएसचे सहा वर्षीय अभ्यासक्रम यशस्वी रित्या पूर्ण करीत प्रियंका नुकताच मायदेशी परतली आहे. सबब, प्रियंकाचा हा डॉक्टर बनण्या पर्यंतचा संघर्षमय प्रवास वैद्यकीय क्षेत्रातील अनेक आशावादी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.

डॉ. प्रियंका यांच्या पाठोपाठ पत्रकार बोरगे यांची दुसरी मुलगी प्रेरणा देखील इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशमधून इंजिनिअर झाली आहे. तर दोन्ही मुलांपैकी प्रेम हा कल्याण येथील नामांकित बिर्ला कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेत असून सर्वात धाकटा साईराज हा मुरबाड येथे इयत्ता १० मध्ये शिकत आहे. त्यामुळे पत्रकार बोरगे यांच्या मुलींप्रमाणे दोन्ही मुले देखील शिक्षणाच्या वाटेवर भवितव्य घडविण्यासाठी अग्रेसर असून आईवडीलांचे नाव लौकिक करीत आहेत.

नुकताच वयाच्या पंच्याऐंशीत पदार्पण केलेले घरातील उच्च शिक्षित जेष्ठ सदस्य अर्थात पत्रकार संजय बोरगे यांचे वडील रमाकांत बोरगे हे उत्कृष्ट प्रकृती व दृष्टी बाळगून आजही दररोज नियमितपणे वर्तमानपत्रांचे काटेकोर वाचन करून आपल्या नातवंडांना मार्गदर्शन करीत असतात. मात्र गत सात वर्षांपूर्वी या कुटुंबाची माऊली सुमन आई जग सोडून गेल्याने कोलमडलेल्या बोरगे कुटुंबाची नव्याने उभारणी करून पत्रकार बोरगे यांच्या सहचारिणी सीमा अगदी नेटाने आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

त्यामुळे या कुटुंबियांच्या जिद्दीपणाचे आज सर्वत्र कौतुक केलं जातं असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर डॉ. प्रियंका बोरगे या सध्या भारतातच राहून वैद्यकीय प्रॅक्टिसद्वारे आपल्या लोकांची सेवा करणार असल्याचे प्रियांकाने बोलतांना सांगितले.

मुस्लिम समन्वय समिती च्या वतीने विशालगड व गजापुर येथे अन्नधान्याची मदत

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

दिनांक १४/०७/२०२४ रोजी झालेल्या विशालगड, गजापूर येथे झालेल्या मुसिल बांधव  हल्ल्यात येथील मुस्लिम बांधवांच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यांचेवर उपवास मारीची वेळ आल्यामुळे समस्त मुस्लिम समाज व माळशिरस तालुका तसेच मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विशालगड व गजापुर येथे अन्नधान्य किट मदत म्हणून देण्यात आले. यावेळी मुस्लिम समन्वय समिती प्रदेश अध्यक्ष रशिद भाई शेख,  ,संपर्क प्रमुख शाहबाझ  शेख, मिडिया प्रमुख सलमान शेख फिरोजरजा तंबोली,मुबारक तंबोली, मुजफ्फर सय्यद, अशरफ मुल्ला, मुख्तार तंबोली, अंसार तांबोळी, ह. सय्यद मलिक रेहान ,मिरासाहेब दर्गा विशालगड चे ट्रस्टी व गजापूर ग्रामस्थ उपस्थित होते.

शासनाने सामाजिक न्याय विभागाचा वळवलेला निधी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वापरण्यात यावा-वैभव गीते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासनाने बौद्ध अनुसूचित जातींचा प्रगतीचा निधी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यासाठी व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यासाठी वळविला असलेने राज्य शासनाचा निषेध करून
सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निधी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या प्रगती करिता शिष्यवृत्तीसाठी वापरण्यात यावा अशी मागणी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेचे राज्यसचिव वैभव गीते यांनी शासनाकडे केली आहे.

सामाजिक न्याय व विशेष विभाग हा मागासवर्गीय बौद्ध मातंग चर्मकार होणार या समाजांसह अनुसूचित जातींच्या 59 जातींच्या प्रगतीसाठी त्यांच्या उन्नतीसाठी असलेला विभाग आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, वंचित घटकातील गोरगरिबांच्या प्रगतीचा उन्नतीचा निधी धार्मिक स्थळांच्या सहलीसाठी व वारकरी सांप्रदाय यांच्यासाठी महामंडळ स्थापन करण्यासाठी तसेच वारकऱ्यांच्या दिंडीसाठी देणे हे राज्य शासनाला शोभणार नाही. वंचित घटकांना अनुसूचित जातीच्या नागरिकांना दलितांची प्रगती उन्नती होऊ द्यायची नाही त्यांच्यासाठी असणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणी करायची नाही सुधारित कोणतीही योजना आणायची नाही. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेवर द्यायची नाही. उच्च शिक्षणात भेदभाव करायचा आणि उरला सुरला त्यांच्या प्रगतीचा असणारा निधी देखील इतर विभागांना धार्मिक स्थळे पाहण्यासाठी देऊन टाकायचा म्हणजे मागासवर्गी यांवरती हा दुहेरी अत्याचारच आहे.
वंचित घटकातील अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांना व वारकऱ्यांना एकमेकांच्या झुंजवत ठेवून भांडणे लावण्याचाच प्रकार यातून दिसत आहे.आमचा विरोध हा वारकरी किंवा वारकरी महामंडळास नाही. वारकऱ्यांच्या अडी अडचणी सुटल्या पाहिजेत.वारकऱ्यांची प्रगती झालीच पाहिजे.परंतु शासनाच्या इतर विभागातून त्यांना निधी दिला पाहिजे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडू . अशा मागणी चे निवेदन वैभव गिते मुख्यमंत्री यांना दिले आहे निवेदनावरती.ऍड. डॉ.केवल उके
राज्य महासचिव एन डी एम जे,
वैभव तानाजी गिते राज्य सचिव ,पी. एस. खंदारे राज्य सहसचिव, शिवराम दादा कांबळे
राज्य कोषाध्यक्ष,पंचशीला कुंभारकर राज्य संघटक,दिलीपआदमाने राज्य निरिक्षक ,प्रमोद शिंदे
राज्य प्रसिध्दी प्रमुख यांच्या सह्या आहेत.

       नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन. डी.एम.जे) महाराष्ट्र राज्य या संघटनेचे वतीने निवेदन देण्यात आले की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत बौद्ध मातंग चर्मकार होलार यांच्यासह अनुसूचित जातींच्या नागरिकांची प्रगतीसाठी खर्च करण्यात येणारा निधी राज्य सरकारने वळवण्याचा म्हणजे हा निधी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमधील साठ वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे.तसेच महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय 14 जुलै 2024 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केलेला आहे. हे शासन निर्णय मा.मंत्री मंडळाच्या 11 जुलै 2024 च्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात आला आहे. शिवाय वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीसाठी प्रत्येकी 30 हजार रूपये देखील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा वापरण्यात येणार आहे.

अक्षता म्हात्रे यांची हत्या करणाऱ्या तीन वासनांध बलात्कारी पुजाऱ्यांना फाशी होण्यासाठी संघर्ष करणार…. वैभव गिते , राज्य सचिव (एन.डी.एम. जे )

[पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क:संदेश भालेराव]
ठाणे डायघर – घरगुती भांडण झाल्याने विवाहित महिला वैतागली होती. शांतता मिळावी म्हणून ही विवाहित तरूणी ठाणे जिल्हयातील डायघरजवळील शीळ फाटा गणेश घोळ मंदिरात गेली होती. येथे मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर घृणास्पद पद्धतीने आळीपाळीने बलात्कार करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोळ हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते. 6 जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणाव कंटाळून सकाळी 10 वाजता गणेश घोळ मंदिरात शांती मिळवण्यासाठी गेली होती. दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले. त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली चहा प्यायल्यानंतर महिलेच शुद्ध हरपली. या दरम्यान या तीन नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.
पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटली आणि तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला.
दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला. यासंदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्याचा संशय आला. पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखीन एक आरोपी असल्याचे सांगितले. मात्र पोलीस स्थानकात जाताक्षणी आरोपीने मुंबई येथे पळ काढल्याची माहिती देखील इतर दोन पुजाऱ्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे येथून अटक केली. दरम्यान श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या तीन आरोपींना ताब्यात घेतले.अधिक तपास डायघर पोलीस करत आहेत.

आज आम्ही नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने डायघर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेतली.
तसेच वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना भेटुन कडक कारवाई करण्यासाठी चर्चा केली. यावेळी मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनवणे व सामजिक कार्यकर्ते भाऊराव तायडे हे उपस्थित होते.

महिला कोनत्या जातीची आहे हे आमच्यासाठी महत्वाचे नसुन ती महिला आहे व तिच्यावर अन्याय झाला आहे एवढंच आमच्यासाठी महत्वाचे आहे. अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवत राहणारच…वैभव तानाजी गिते

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी नातेपुते नगरीत प्रशासनाची जोरदार तयारी


प्रशासनाच्या वतीने स्वागताची जय्यत तयारी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- (प्रमोद शिंदे)
 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा  सोलापूर जिल्ह्यात येत आहे.  जिल्ह्यातील पहिला मुक्काम नातेपुते तालुका माळशिरस येथे होत आहे. त्याच अनुषंगाने पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून व नातेपुते करांकडून संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. तसेच नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालय येथे पोलीस प्रशासनाकडून पोलीस फौज फाटा बोलवण्यात आला असून ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे  सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक १, पोलीस उपअधीक्षक ४, पोलीसनिरीक्षक ११, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस सब इन्स्पेक्टर ४७, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस सब इन्स्पेक्टर ३. पुरुष पोलीस अंमलदार ३२२, महिला पोलीस ९२, वाहतूक पोलीस ५०, आरटीपीसी १०, गामा २१०, व्हिडिओग्राफर होमगार्ड पुरुष ३२५, महिला होमगार्ड ७०, एसआरपीएफ २५, पुरुष बॉम्ब शोध पथक २० व पुरुष ६३ असा पोलिसांचा ताफा तैनात आहे.तसेच महसूल प्रशासन, नातेपुते नगरपंचायत, आरोग्य विभाग, यांच्याकडून सुद्धा स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच विद्युत महावितरण अधिकारी यांच्याकडून ए बी केबल टाकण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून. ठिकठिकाणी चार्जिंग पॉइंट करण्यात आले आहेत. तसेच महावितरण च्या वतीने पाच अधिकारी व 80 कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पिरळे येथे संत बाळू‌मामा आषाढी एकादशी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –
श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर यांच्यावतीने संत बाळूमामा आषाढी एकादशी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन पिरळे येथे समता माध्यमिक विद्यालय भव्य प्रांगणात करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रोपरेषा पुढीलप्रमाणे.*दि.०९/०७/२०२४* २. बाळूमामा बग्गा नन ४ चे आगमन सायं. किर्तन ७ ते ९ व बाळूमांची आरती व महाप्रसाद किर्तन सेवा ह.भ.प. भाऊसाहेब महाराज भिसे
दि.१०/०७/२०२४ आपला वा. बाळूमामाची आरती व महाप्रसाद सायं. किर्तन ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद किर्तन सेवा ह.भ.प. हनुमंत महाराज फुले
*दि.११/०७/२०२४ आपला वा. बाळूमामाची आरती व महाप्रसाद सायं. किर्तन ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद किर्तन सेवा ह.भ.प. श्रीराम गुलदगड महाराज
* दि.१२/०७/२०२४ सकाळी ९ वा. बाळूमामाची आरती व महाप्रसाद सायं. ओवी ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद महाराष्ट्र केसरी शाहिर सत्यवान गावडे (महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यु-ट्युब चॅनल वरिल ओविकार)
*दि.१३/०७/२०२४ आपण वा. बाळूमामाची आरती व महाप्रसाद सायं. किर्तन ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद किर्तन सेवा ह.भ.प.बाळुमामा भक्त मेजरसाहेब
* दि.१४/०७/२०२४ सकाळी ९ वा. बाळूमामाची आरती व महाप्रसाद सायं. किर्तन ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद किर्तन सेवा ह.भ.प. वैभव महाराज सुरवसे
* दि.१५/०७/२०२४ सकाळी ९ वा. बाळूमामाची आरती व महाप्रसाद
सायं. ओवी ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद
ओवीकार मंडळ वडूज यांची बाळूमामावर आधारित ओवी कार्यक्रम
*दि.१६/०७/२०२४ आपण वा. बाळूमामाची आरती व महाप्रसाद सायं. किर्तन ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद किर्तन सेवा ह.भ.प.
* दि.१७/०७/२०२४ सकाळी ९ वा. बाळूमामाची आरती व महाप्रसाद सायं. किर्तन ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद किर्तन सेवा ह.भ.प. चोपडे महाराज रूकडीचा वालुग* दि.१८/०७/२०२४ सकाळी १९ वा. बाळूमामाची आरती व सायं. किर्तन ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद किर्तन सेवा ह.भ.प.गणेशानंद महाराज पिडियार भिगवन महाप्रसाद सदर कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ पिरळे त्यांच्या वतीने करण्यात आले आले आहे.बग्णा नं ४चे कारभारी बाळू शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाल सुरू.

You may have missed