माळशिरस तालुका

पवार साहेब यांच्या आशिर्वादाने इंदापुरात व राज्यात सत्ता बदल निश्चित – हर्षवर्धन पाटील


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-

देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे नेतृत्व आपणा सर्वांना लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इंदापूरात व राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता बदल हा निश्चित आहे. इंदापूर तालुक्यातील सध्याच्या राजकीय बदलाच्या लाटेमध्ये जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे शुक्रवारी (दि.25) केले. नीरा नरसिंहपूर येथे प्राचीनकालीन श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरात इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या निवडणुक प्रचाराचा शुभारंभ विधिवत पूजा व नारळ फोडून करण्यात आला, सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. तत्पूर्वी नीरा नरसिंहपूर येथे कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचे जेसीबीमधून पुष्पवृष्टी करीत स्वागत केले. ज्येष्ठ नेते शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांच्या सन 1952 च्या पहिल्या निवडणुकीपासून श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करून, श्री लक्ष्मी-नृसिंहाचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. इंदापूर तालुक्यातील विद्यमान लोकप्रतिनिधीची 10 वर्षाची निष्क्रिय कारकीर्द संपवून, इंदापूर तालुक्याचा सर्व क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी लक्ष्मी-नृसिंहाचे आशीर्वाद आपण घेतलेले आहेत. इंदापूर तालुक्याच्या विकासाला 10 वर्षे लागलेला ब्रेक हा आगामी 5 वर्षात भरून काढला जाईल, अशी ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली. सध्याच्या लोकप्रतिनिधीनी त्यांच्या काळात सहकारी संस्था, शिक्षण संस्था काढून रोजगार देण्याचे काम केले नाही. उलट गुण्या-गोविंदाने एकत्र राहत असलेले समाजा-समाजामध्ये स्वार्थासाठी तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. शासनाकडून विकास कामासाठी येणारा पैसा हा जनतेचा पैसा असतो. मात्र हा पैसा तालुक्यातील जनतेच्या विकासाऐवजी काही ठराविक लोकांच्या खिशात गेलेला दिसत आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधी बनवा-बनवी थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला साथ द्या, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले. शरदचंद्र पवार हे वयाच्या 84 वर्षीही अपराजित योद्धा म्हणून लढत आहेत, या वयात त्यांचा काही स्वार्थ आहे का? तरीही ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे, कारण त्यांना महाराष्ट्राची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायची आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करायचे आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तुतारीला विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश काळे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अँड. तेजसिंह पाटील, अशोकराव घोगरे, शिवसेना (उबाठा)चे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, संतोष मोरे यांची भाषणे झाली. यावेळी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, अमोल भिसे, मयूरसिंह पाटील, गणेश इंगळे, पांडुरंग हेगडे, सिकंदर पैलवान, सुरेश जगदाळे, मनोज पाटील, किरण पाटील, रवींद्र जगदाळे, शेखर पाटील, रणजीत वाघमोडे, रोहित जगदाळे, सुरेश मेहेर, प्रतापराव पाटील, दादासाहेब घोगरे, प्रकाशराव मोहिते, शरद जगदाळे पाटील, शिवाजी हांगे, तानाजीराव नाईक, उत्तमराव जाधव, विक्रम कोरटकर, प्रभाकर खाडे, रणजित गिरमे, हरिभाऊ बागल, प्रदीप बोडके, संजय शिंदे, नामदेव घोगरे, विठ्ठल घोगरे, नानासाहेब देवकर, कैलास हांगे, माणिकराव खाडे, राजाभाऊ मोहिते, बापू जगदाळे, दादा पाटील, हनुमंत काळे, पप्पू गोसावी, समीर पाटील, दत्तात्रय ताटे देशमुख, किशोर माहिते, मेघनाथ सरवदे, बळीराम गलांडे, अभिजीत पावसे, शहाजी पावसे, महादेव भोसले, दीपक पावसे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नाथाजी मोहिते यांनी मानले. या कार्यक्रमानंतर हर्षवर्धन पाटील यांनी व्याहळी येथे जाऊन भैरवनाथ मंदिरात परंपरेनुसार प्रचाराचा नारळ फोडला.

विलास चंद्र एम.मेहता आयटीआय दहिगाव यांच्या दिवाळीनिमित्त

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमुख शिंदे

दिनांक. २४ ऑक्टोबर रोजी दिवाळीपूर्वी  विलासचंद्र एम. मेहता आयटीआय दहिगाव च्या वतीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली  विलासचंद्र एम. मेहता आयटीआय, रत्नत्रय प्रि स्कूल व स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी, दहिगाव येथील  सर्व  विद्यार्थ्यांसाठी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते  तसेच विद्यार्थ्यांना दिवाळी अभ्यास देऊन दिवाळीची सुट्टी देण्यात आली. संस्थेचे संचालक , अध्यक्ष. व सदस्य शिक्षक यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना दीपावली निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

ऍड. सुदर्शन शिंदे यांची जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड ; कौशल्य आणि मेहनतीचा गौरव!


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांनी आयोजित केलेल्या जिल्हा न्यायाधीश परीक्षा 2022 मध्ये अॅड सुदर्शन शिंदे यांची यशस्वी निवड झाल्याने स्थानिक न्यायालयीन क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीमुळे वैराग तसेच सोलापूर जिल्ह्यातील लोकांमध्ये अभिमान आणि आनंद व्यक्त केला जात आहे.
अॅड सुदर्शन शिंदे यांचा विधी क्षेत्रातला प्रवास हा प्रेरणादायक आहे. त्यांनी शिक्षणात उत्कृष्टता साधली असून, त्यांच्या उच्च शिक्षणात कायद्यासंबंधीची गहन माहिती मिळवली. आपल्या करिअरमध्ये त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. यापूर्वी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायाधीश पदाच्या परीक्षेत त्यांनी तीन वेळा मुलाखत दिली होती, परंतु यश मिळवण्यात त्यांना अपयश आले होते.
या अनुभवांमुळे त्यांनी थोडीच हिम्मत हारली आणि त्यांची मेहनत आणि कार्यक्षमता वाढवली. त्यांचं आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम हे यशाच्या मूळ कारणांपैकी एक आहे. अॅड सुदर्शन शिंदे यांनी 2022 च्या जिल्हा न्यायाधीश पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.
सुदर्शन शिंदे मूळचे वैरागचे रहिवासी असून सध्या ते बार्शी येथे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. त्यांचे वडील देखील बार्शी येथील न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. वडिलांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना विधी क्षेत्राबद्दलचं ज्ञान लहानपणापासूनच मिळालं होतं, ज्यामुळे त्यांची आवड आणि समर्पण वाढलं.
सुदर्शन शिंदे यांच्या यशाबद्दल त्यांचे कुटुंब, मित्र, आणि सहकारी यांनी त्यांना अनेक फोनद्वारे आणि सामाजिक माध्यमांवर शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या यशामुळे सोलापूर जिल्ह्यातील वकील समुदाय आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढला आहे. त्यांना प्राप्त झालेल्या या शुभेच्छा त्यांच्या भविष्यातील कार्याला अधिक गती देण्यास मदत करतील.
अॅड सुदर्शन शिंदे म्हणाले, “ही निवड माझ्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. मला न्यायालयीन क्षेत्रात सेवा देण्याची आणि योग्य न्याय सुनिश्चित करण्याची आकांक्षा आहे. माझ्या कामामुळे लोकांचे विश्वास वाढेल, अशी मला आशा आहे.”
अॅड सुदर्शन शिंदे यांच्या यशस्वी प्रवासाने स्थानिक समाजात प्रेरणा निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने केवळ स्वतःची स्वप्ने पूर्ण केली नाहीत, तर त्यांच्या कुटुंबाचे, मित्रांचे आणि संपूर्ण समाजाचे अभिमान वाढवला आहे. त्यांच्या यशामुळे आगामी पिढीला प्रेरणा मिळेल आणि ते न्याय क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रेरित करतील.

बारामती काका अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार यांच्यात लाडात

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-


बारामती विधानसभा मतदारसंघासाठी
शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीच्या मैदानात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार असून या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याविषयी बारामती सह संपूर्ण राज्याला उत्सुकता होती. अखेर अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या नावावर शरद पवार यांनी शिक्कामोर्तब करत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. लोकसभेनंतर युगेंद्र पवार यांनी राजकारणात सक्रिय होत चुलते अजित पवार यांना आव्हान दिले आहे
शरद पवार यांच्या पाठिंब्याने ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. गावभेट दौरे स्वाभिमानी यात्रेच्या माध्यमातून त्यांनी बारामतीत झंजावात सुरू ठेवला आहे. वेगवेगळ्या कडांच्या माध्यमातून ते मतदारांशी गेले अनेक महिने संवाद साधत आहेत. असे असले तरी देखील बालेकिल्ल्यात विधानसभेसाठी अजित पवार यांची दहशत कायम आहे.बारामतीचे सहा वेळा प्रतिनिधित्व करत अजित पवार यांनी सातव्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विकासाची गंगा त्यांनी बारामतीत आणली आहे. बारामती विकासाचा पॅटर्न म्हणून राज्यातच नव्हे देशात ओळखले जाते. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत अजित पवार यांचे पारडे जड राहिले आहे. यंदा मात्र पवार विरुद्ध पवार लढाई होत असल्याने वेगळी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार ठामपणे उभे आहेत. बारामतीच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांचा पराभव करणे एवढे सोपे नाही असा अंदाज राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र ज्या विकासाच्या जोरावर अजित पवार बारामती 
विकासाच्या अजित  पवार बारामतीत वर्चस्व गाजवत आहेत त्या विकासाच्या पाठीमागे शरद पवार हेच आहेत असे युगेंद्र पवार मतदारांना सांगताना कुठेही कमी पडताना दिसत नाहीत. शरद पवार हे देखील बारामती विधानसभा मतदारसंघावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे बारामतीतील काका विरुद्ध पुतण्याच्या हाय व्होल्टेज लढाईकडे राज्याचे लक्ष असेल.

इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार म्हणून गुरुपुष्पामृतच्या मुहूर्तावर भव्य रॅली काढून गुरुवारी (दि. 24) अर्ज दाखल केला.उमेदवारी अर्ज दाखल करणेपूर्वी भाग्यश्री निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांचे खासदार सुप्रिया सुळे, भाग्यश्री पाटील, अंकिता पाटील ठाकरे यांनी औक्षण केले. यावेळी पृथ्वीराज जाचक, मुरलीधर निंबाळकर, राहुल मखरे, तेजसिंह पाटील, अँड कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, भारतीताई शेवाळे, अशोक घोगरे, सागरबाबा मिसाळ, नितीन शिंदे, काका देवकर, प्रा. कृष्णाजी ताटे, अनिल पवार, संजय शिंदे, बाबासाहेब भोंग, तुषार खराडे यांनी मनोगत व्यक्त केलेया सभेमध्ये इंदापूर शहरातील अनिल पवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह तसेच बावडा ग्रा. पं. सदस्य पांडुरंग कांबळे, सुनील साबळे, विनोदकुमार जाधव यांनी असंख्य सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, अंकिता पाटील ठाकरे, महारुद्र पाटील, राजवर्धन पाटील, महिला तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर, कार्याध्यक्षा आश्मा मुलाणी, मयूरसिंह पाटील,
अमोल भिसे, सुखदेव घोलप, आशुतोष भोसले, उदयसिंह पाटील, हेमंत नरुटे, उमेश घोगरे, चांगदेव घोगरे, शहराध्यक्ष इनायत काझी, महिलाध्यक्षा रेश्मा शेख, बाळासाहेब पाटील, नंदकुमार सोनवणे, प्रदीप पाटील, मोहन दुधाळ, पांडुरंग शिंदे, शिवाजी हांगे, बापू कोकाटे आदींसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेसचे व विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित

ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत यांच्या हस्ते गुरुपुष्यामृत मुहूर्तावर श्रीकृष्ण मूर्तीची प्रतिष्ठापना 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नातेपुते शहरातील पुरातन श्री. राम मंदिरात आज गुरुवार (ता.२४)  रोजी गुरुपुष्यामृत मुहूर्तावर श्रीकृष्ण मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.पहाटे  होमहवन व धार्मिक विधी मूर्ती दाते शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यज्ञासाठी श्री.व सौ. अवधूत उराडे, श्री.सौ. निखिल घुगरदरे ,श्री व सौ. रोहित शेटे, श्री व सौ.मंदार बंदिष्टे या उभयतांच्या हस्ते यज्ञ व इतर धार्मिक विधी करण्यात आले. पौराहित्य राघव कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी  केले.#  सुनील राऊत यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विश्वस्त विजय उराडे, श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी मुकुंद बंदिष्टे, कमलाकर बडवे , मोहन डफळ, अनिल उराडे ,माजी सरपंच अमरशील देशमुख, हभप धैर्यशील देशमुख, विश्व हिंदू परिषदेचे  मंत्री श्रीगणेश पागे, इतिहास संशोधक प्रशांत सरूडकर , व्यसनमुक्त युवक संघाचे  सचीव विवेक राऊत,राहुल पद्मन, महेश शेटे, महेश टोमके, जयंत बुवा,राजू बडवे, सुरेश वहीकर ,ह भ प नाना महाराज तेली, हभप पिंटू महाराज भगत, दत्तात्रय उराडे, शशी कल्याणी, अमर भिसे, मंगेश दिक्षित, श्रीमंत माने, विनायक पद्मन,सुर्यकांत गटकुळ व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.भव्य शोभायात्राबुधवार (ता.२३) रोजी सायंकाळी श्रीकृष्ण मूर्तीची संपूर्ण शहरातून टाळ मृदुंगांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. ग्रामदैवत श्री. गिरजापती मंदिरात पालखी मधून श्रीकृष्ण मूर्ती नेऊन त्या ठिकाणी शंभू महादेवास भेट घडवली यावेळी ग्रामपुजारी संजय बडवे, सुधाकर बडवे ,कमलाकर बडवे यांनी विधिवत पूजा करून मूर्तीचे स्वागत केले. तेथून पालखी मधून मूर्ती श्रीराम मंदिरात आणण्यात आली त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते धान्यनिवास करण्यात आला.श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी शहरातील विविध भजनी मंडळे, महिला भजनी मंडळ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यानंतर प्रसाद वाटप करण्यात आलं

उत्तम जानकर यांचा पश्चिम भागातील दौरा यशस्वी, मतदारांचा प्रचंड प्रतिसाद.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे

विधानसभा निवडणूक अनुषंगाने तसेच ताकदीने व शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 23 ऑक्टोबर पासून उत्तम जानकर यांनी दौऱ्याच्या आयोजन केले होते, या दौऱ्यात मतदारांकडून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.
२५४ – माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार मा.श्री.उत्तमराव जानकर साहेब हे सोमवार दि.२८ ऑक्टोंबर २०२४ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करीत आहेत. या अनुषंगाने संपूर्ण माळशिरस तालुक्यात उमेदवार मा.श्री. उत्तमराव जानकर साहेब, युवानेते श्री.अर्जुनसिंह मोहिते-पाटील (माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस), ज्येष्ठनेते श्री. बाबाराजे देशमुख (माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर) व माळशिरस तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मान्यवर- पदाधिकारी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
यावेळी पिंपरी कारडे धर्मपुरी,देशमुखवाडी व डोंबाळवाडी कुरबावी कळंबोली एक शिव, तांबेवाडी, पिरळे ,दहिगाव या गावांमध्ये कॉर्नर बैठका व सभा घेण्यात आल्या यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्वपक्षीय मान्यवर पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंदापूरच्या सभेत प्रवीण माने यांच्या डोळ्यात अश्रू यांनी अपक्ष म्हणून दाखल केला उमेदवारी अर्ज केला दाखल

सोनाई चे संचालक प्रवीण माने दुखावल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला सभेमध्ये बोलत असताना प्रवीण माने भाऊ झाले व त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. बोलताना ते म्हणाले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे

सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत. मी नव्हे तर आपण सर्व जण उमेदवार आहात. या भावनेतून ऐतिहासिक लढाईत सामील व्हा. आपल्या मेरीटवर, हात जोडून दहा मते मागू, पण कोणावर टीका करुन मिळणारी वीस मते आपल्याला नको.

सकाळी माझे ग्रामदैवत वेबाबीरबुवाच्या चरणी नतमस्तक होऊन तेथील गुलाल पुडीत बांधून सभेला आलो आहे. त्या गुलालाची शपथ घेऊन सांगतो की, काहीही केले तरी मी उमेदवारी माघारी घेणार नाही. हाताने फक्त कपाळाला गुलाल लावतो. तो उधळण्यावर फक्त तुमचा अधिकार आहे’, अशा शब्दांत आपला इरादा स्पष्ट करत माजी जिल्हा परिषद सदस्य, सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी अपक्ष म्हणून इंदापूर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी प्रवीण माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदापूर शहरातून मोठी दुचाकी रॅली काढली. सर्व महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरगच्च गर्दीत सभा ही केली. सभेत बोलताना प्रवीण माने म्हणाले की, ‘१९९५ मध्ये इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्यानंतर तत्कालीन अपक्ष उमेदवार निवडून आला होता. तिरंगी लढत झाली तर अपक्ष उमेदवार निवडून येतो हा इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे. गेल्या 15 दिवसांत चित्र बदललेले आहे. आपल्याकडे नेते कमी असतील. मात्र, जनता आपल्या सोबत आहे’. सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत. मी नव्हे तर आपण सर्व जण उमेदवार आहात. या भावनेतून ऐतिहासिक लढाईत सामील व्हा. आपल्या मेरीटवर, हात जोडून दहा मते मागू, पण कोणावर टीका करुन मिळणारी वीस मते आपल्याला नको. मी जर आमदार झालो तर संपूर्ण तालुका आमदार झाल्यासारखे वाटेल. आमचे नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्यावर आमची कायम श्रध्दा रहाणार आहे, असेही माने म्हणाले. सोनाई उद्योग समुहाचे प्रमुख दशरथ माने म्हणाले की, निरपेक्ष भावनेने प्रवीण माने यांनी केलेली आजपर्यंतचे कार्य सर्वांसमोर आहे. निवडून आल्यानंतर ते शरद पवारांच्याच मांडीवर जावून बसणार आहेत. १९९५ ला हर्षवर्धन पाटील यांची बंडखोरी यशस्वी करण्याच्या पाठीमागे आपणच होतो. त्यावेळी राज्यात ४० हून अधिक अपक्ष निवडून आले होते. यंदा देखील प्रवीण माने यांना सोबत घेतल्याखेरीज सरकार स्थापनच होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

वालचंद नगर परिसरातील ज्येष्ठ कवी सुभाष वाघमारे शाहीर अमर शेख पुरस्काराने सन्मानित

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

विश्व भारती प्रकाशनाच्या निरा भीमा विकास संस्थेच्या वतीने शाहीर अमर शेख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा यंदाचा राष्ट्र शाहीर अमर शेख पुरस्कार वालचंदनगर येथील ज्येष्ठ कवी, साहित्यिक सुभाष वाघमारे यांना प्रदान करण्यात आला.

अमर शेख स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनादरम्यान राष्ट्र सेवा दलाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या अॅड. सविता शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यातआला. राष्ट्रीय सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण होळकर प्रमुख पाहुणे म्हणून होते.ज्येष्ठ कवी रामदास देवकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या कवींनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे संयोजक निरा भीमा विकास संस्थेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ कवी पॅंथर सुनील साबळे यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. हनुमंत कांबळे, निवास शेळके, हमीद अत्तार, रमेश शिंदे, माऊली नाचन उपस्थित होते.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दलित समाजाने मतदान करू नये पवार साहेब हेच का तुमचे पुरोगामीत्व- डॉ.कुमार लोंढे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-


शरद पवार साहेबांना एवढे दिवस महाराष्ट्रातील तमाम जनता शेतकऱ्यांचे कैवारी,पुरोगामी, जाणते राजे, देशाचे नेते असे  उपाधी देऊन  त्यांचं काळीज सुपाएवढे आहे हे असा भास निर्माण होत होता. शरद पवार साहेबांनी सुभेदार व जहागीरदार निर्माण करण्याचे आणि सत्तेमध्ये केवळ प्रस्थापित मराठ्यांना सामील करून इतरांना त्याचे दास बनवण्याचे मोठे कटकारस्थान त्यांच्याकडून झालेले आहे ( अपवाद वगळता रामदास आठवले, लक्ष्मण ढोबळे) पवार साहेब नेहमी दोन्ही जातींना समोरासमोर लढवून संपवण्याचे कटकारस्थान रचत असतात आणि हे अनेक वेळा  सिद्धही झालेल आहे परंतु ज्या पवारसाहेबांनी फोडाफोडीचे राजकारण केलं त्याच पवारांचा पक्ष फुटला हे सर्व महाराष्ट्र जाणतो आहे. 

महाराष्ट्रातील 2024 च्या विधानसभा या अनुषंगाने काही बाबी प्रकर्षाने मांडणे ममहत्त्वाच आहे माळशिरस मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे यामध्ये दोन टर्म हनुमंत डोळस चर्मकार आणि एक टर्म राम सातपुते अशा तीन टर्म विजयसिंह मोहिते पाटील यांनी चर्मकार उमेदवार दिले त्यांना येथील दलित , मातंग,बौद्ध, चर्मकार,होलार बांधवांनी सगळ्यांनी निवडून ही दिल साहजिक जीसकी जितनी संख्या भारी उसकी उतणी भागीदारी या प्रमाणे चर्मकार सोडून मातंग,बौद्ध यांना उमेदवारी मिळणे अपेक्षित होते

महत्वाचा मुद्दा असा आहे ही जागा (SC 254) अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्या जागेवर अनुसूचित जातीचा ओरिजनल उमेदवार पाहिजे परंतु धनगर समाजातील काही व्यक्तींनी बनावट अनुसूचित जातीचे दाखले काढले आहेत.हा धनगर समाज केंद्रामध्ये ओबीसी आणि राज्यामध्ये एनटी चा दर्जा असताना सुद्धा अनुसूचित जागेवर अतिक्रमण करून त्याचे हक्क हिसकावून घेतोय.या प्रकारास आदरणीय महादेव जानकर यांनी कडाडून विरोध ही केला आहे अशा नेत्याचे दलित बांधव स्वागतच करत आहेत.

राखीव (SC)माळशिरस मतदार संघात उत्तम जानकर (जात धनगर) यांना उमेदवारीचा घाट घातला जातोय व उमेदवारी दिली जाते एकीकडे स्वतःला आपण पुरोगामी म्हणून घ्यायचे आणि दुसरीकडे त्या दलितांच्या हक्काच्या जागेवर विधानसभेच्या एस सी च्या जागेवर अतिक्रमण करायला भाग पाडायचं हे फारच विदारक आहे.या संदर्भात माळशिरस तालुका अनुसूचित कृती समिती ने पवार साहेबांना भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली आहे. फलटण मतदार संघात सुद्धा असाच संघर्ष आपणास पाहण्यास मिळतो आहे.भाजपचे माढा लोकसभेचे माजी खासदार रणजिसिंह निंबाळकर यांनी फार चांगली भूमिका घेऊन मी बौद्ध समाजाबरोबर आहे असे जाहीर केले आहे.शनिवार दिनांक (१९) इंदापूर मध्ये बहुजन समाज जागृती मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, प्रदेशाध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ व मी (डॉ.कुमार लोंढे) ही प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो यावेळी आदरणीय मेश्राम साहेबांनी एक सुंदर उदाहरण दिल हातामध्ये पेन घेतला आणि समोर उपस्थित लोकांना सांगितल हा पेन म्हणजे दलाल आहे आणि हाताला धक्का दिला तर तो पेन हातातून गळून खाली पडला याचा अर्थ दलाला धक्का द्यायची गरज नाही जे हात दलाल निर्माण करतात त्या हाताला आपणास धक्का द्यायला लागेल म्हणजे दलाल ही राहणार नाही दलाल निर्माण करणारी व्यवस्था ही राहणार नाही.दलालांना दोष देऊन उपयोग नाही तर दलाल निर्माण करणाऱ्या व्यवस्थेवर आपल्याला आघात घालायला लागेल असं आपण ठाम ठरवलं पाहिजे.

शरद पवार साहेबा सारख्या स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या व फुले -शाहू -आंबेडकर यांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या व्यक्तीने असे वागणे हे पातक आहे.हे महाराष्ट्राला न शोभणार कृत्य आहे एकीकडे उत्तम जानकर (धनगर) SC जातीचा दाखला काढून दलितांच्या जागेवर अतिक्रमण करून लढतात आणि दुसरीकडे शरद पवार इतर मतदारसंघांमध्ये सांगतात की हे आमच्याकडे धनगर समाजाचे नेते आहेत किती दिवस दलितांचा बुद्धिभेद करणार आहात पवार साहेब! उत्तम जाणकरांना दोष देऊन उपयोग काय? उत्तम जानकरांना निर्माण करणारी व्यवस्था ही भयंकर आहे त्यामधे ते ही भरडले जातील असा विश्वास आहे.माळशिरस तालुक्याचे मोहिते पाटील राष्ट्रवादी चे शरद पवार यांना आता अद्दल घडवण्याची वेळ आलेली आहे.

शरद पवारांनी जे सुभेदार निर्माण केले ते ठराविक घराण्यातलेच आहेत. सत्ता कुणाची येऊ द्या काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस,सेना ,भाजपा असेल तरी ही त्या सत्तेचं सगळ्यात जास्त बेनिफिट इथल्या दीडशे ते 170 प्रस्थापित घराण्यालाच मिळालेले आहे . देवेंद्र फडणविस यांच्या मार्फत शरद पवारांना नेहमी चॅलेंज झालं आहे.धर्मसत्तेच आणि राजसत्तेच ज्यावेळेस भांडण निर्माण झालं त्यावेळेस देवेंद्र फडवणीसाची एक जमेची बाजू समोर आली की त्यांनी महाराष्ट्रातली प्रस्थापित घराणे संपवली पवाराची हुकूमशाही जहागिरी संपवण्यामध्ये देवेंद्र फडवणीसाठी पुढाकार घेतला याचा अर्थ असा आहे की राजसत्तेला धर्म सत्तेन आव्हान दिलं. संविधान धोक्यात आहे हे प्रकाश आंबेडकरांनी अग्रक्रमाने सांगून तो मुद्दा निर्माण केला तो मुद्दा काँग्रेस आणि राष्ट्रवादी हायजॅक केला.हा मुद्दा आपल्याकडे खेचून घेतला आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त कांग्रेस व राष्ट्रवादी ने जागा मिळवल्या .

बांधवानो मुद्दा आहे आपल्या हक्कासाठी आज मराठा लढतो आहे आपल्या हक्कासाठी आज ओबीसी लढतो आहे आपल्या हक्कासाठी दलित लढतो आहे एससी एसटी लढतो आहे व हे सगळं होत असताना शैक्षणिक आरक्षण आम्ही समजू शकतो इतर सोयी सवलती आम्ही समजू शकतो पण आमच्या राजकीय आरक्षणावर जर गडांतर येत असेल तर काय करायचे?माळशिरस तालुक्यामध्ये जे स्वतः ओरिजनल धनगर आहेत परंतु त्यांनी हिंदू खाटीक एससी जातीचे दाखले काढलेत अशाची लिस्ट जवळजवळ 36 च्या आसपास आहे आणि हा माळशिरस मतदार संघ चर्चेचा विषय झाला आहे .हिंदू खाटीक ओरिजिनल असेल तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं परंतु येथे धनगर समाजाच्या व्यक्तीने हिंदू खाटीक हे प्रमाणपत्र काढून एससी च्या जागेवर अतिक्रमण करण कितपत योग्य आहे .

माझा प्रश्न पवार साहेबाना आहे तुम्हाला एवढी सहानभूती असेल तर पवारांनी बारामती मध्ये उत्तम जानकर यांना उमेदवारी द्यावी. पवारांनी मोहिते पाटलांना थांबा म्हणावं आणि माढा विधानसभा जागेवर त्यांनी उत्तम दरकरांना उमेदवारी द्यावी हा घाट का घातला जातोय हा कळीचा मुद्दा नव्हे तर महाराष्ट्रभर या मुद्द्यावर येणाऱ्या काळामध्ये आपणही दलित बांधवांनी विचार विनिमय करणे गरजेचे आहे

रात्र नव्हे तर दिवस ही वैऱ्याचा आहे प्रत्येक जण स्वतःच्या जातीसाठी झगडतो आहे महाराष्ट्रातील 18 पगड जातीतल्या एससी, एसटी लोकांनी जागृत झालं पाहिजे आणि आपला हक्काचा न्यायाचा लढा उभारला पाहिजे ज्या ज्या ठिकाणी आमच्या हक्कावर गदा येईल तिथे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस असो अथवा शरद पवार असो अथवा कोणी ही असो दलाल निर्माण करणारी व्यवस्था मुळासकट उखाडून फेकली पाहिजे.या शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसला आपणअद्दल घडवली पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण महाराष्ट्रातील तमाम बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान न करता बहिष्कार टाकावा या पद्धतीत आपण सर्वांनी निर्णय घ्यावा या निर्णयाचा फटका सत्तेला ज्यावेळेस बसेल त्यावेळेस त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याशिवाय राहणार नाही

आमच्या अधिकाराचा लढा आता आम्हाला लढावा लागेल अन्यथा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारास आम्ही गद्दार झालेलो आहे असे समजण्यात हरकत नाही. माझेही उत्तमराव जानकर यांच्याशी चांगले संबंध आहेत ते आमचे चांगले मित्र आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमांमध्ये ते असतात परंतु हा लढा वैचारिकतेचा आहे उत्तम जानकर अथवा मोहिते पाटील अथवा शरद पवार कोणत्याही व्यक्तीशी व्यक्तिगत वादाचा विषय नसून हा वैचारिक वाद आहे हा लढा तीव्र करण्यासाठी आपली साथ व सहयोग महत्वाचा आहे हा लढा तीव्र केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही . समाजासाठी SC/ST साठी वाटेल तेवढा संघर्ष व त्याग करण्याची माझी तयारी आहे. बांधवांनो आपण जास्तीत जास्त पोस्ट शेअर करा व या लढ्याला पाठबळ देण्यासाठी पुढे या…आपले अभिप्राय नक्की द्या लवकरच पुढील दिशा ठरवू या..
एससी/एसटी जागा हो….

जय भीम जय संविधान

(लेखक डॉ.कुमार लोंढे
अध्यक्ष सेंट्रल ह्युमन राईट संघटन
गारवाड माळशिरस सोलापूर)
मो.7020400150
मेल -londhekumar77@gmail.com
दिनांक 23/10/2024

You may have missed