आंतरराष्ट्रीय

उद्या नातेपुते येथे कै सुभाष तात्या बावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त इंदुरकर महाराजांचे कीर्तन

दीपक देशपांडे यांचा एकपात्री कार्यक्रम व निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे हरी कीर्तनाचे आयोजन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

नातेपुते येथील कै सुभाष (तात्या) शंकर बावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण बुधवार दिनांक 21/ 9/ 2022 रोजी होणार आहे त्यानिमित्त मंगळवारी दिनांक 20/ 9/ 2022 रोजी दुपारी चार ते पाच प्राध्यापक दीपक देशपांडे सोलापूरकर झी टॉकीज फेम यांचा एकपात्री कार्यक्रम तसेच सायंकाळी पाच ते सात ह भ प निवृत्ती महाराज देशमुख(इंदुरी कर) यांचे हरिकीर्तन नातेपुते येथे आयोजित करण्यात आले आहेत हे हरिकीर्तन डॉ बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला नातेपुते येथे आयोजित करण्यात आले आहे व बुधवार दिनांक 21/ 9 /2022 रोजी सकाळी १० ते १२वाजता ह भ प निलेश महाराज कोरडे जुन्नरकर यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे व दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी पुष्पवृष्टी करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे सर्व भाविकांनी  कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जननायक मामासाहेब पांढरे , अतुल सुभाष बावकर , सत्यवान सुभाष बावकर  यांनी केले आहे.

पिरळे येथे एन डी एम जे कडून स्मशानभूमीची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे पिरळे ता.माळशिरस येथे ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी होत आहे. पिरळे गावची लोकसंख्या ही 5000 पेक्षा जास्त असून स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होऊन सुद्धा या गावांमध्ये अद्याप ही स्मशानभूमी नाही.प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व स्थानिक पुढाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या गावात अद्यापही स्मशानभूमी झालेली नाही.या गावांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात परंतु सदन वर्ग हा वस्ती वाड्यावर स्वतःच्या शेतामध्ये राहतात परंतु पिछडा भूमिहीन दलित वर्ग हा गावांमध्ये राहतो सदन असणाऱ्या वर्गामध्ये मयत झाल्यास ते स्वतःच्या शेतामध्ये अंत्यविधी करतात परंतु भूमिहीन दलित व इतर मागास वर्ग यांच्या कुटुंबामध्ये मयत झाल्यास त्यांना स्मशानभूमी शिवाय पर्याय नाही परंतु या ठिकाणी स्मशानभूमीच नाही.अंत्यविधी करण्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो पूर्वी अंत्यविधीसाठी वड्या काठी प्रेत घेऊन जावे लागत असे रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी प्रेत घेऊन जाता येत नाही. ग्रामपंचायत गावठाण स्मशानभूमीची जागा असून देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी अध्याप स्मशानभूमी झालेले नाही.त्याची अनेक कारणे आहेत पावसामध्ये प्रेत जाळणे खूप कठीण होते.5 सप्टेंबर रोजी एन डी एम जे चे राज्य प्रसिद्धी प्रमुख,महाराष्ट्र पत्रकार संघ तालुकाध्यक्ष पत्रकार प्रमोद शिंदे यांचे वडील ज्ञानदेव शिंदे यांचे दुःख निधन झाले असता मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला व अंत्यविधी कसा करायचा हा मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिला पावसामुळे अंत्यविधीला उशीर झाला शेवटी निसर्गाने साथ दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेलच्या व टायरच्या साह्याने तो अंत्यविधी करता आला.याच ठिकाणी अनेक ग्रामस्थांनी स्मशानभूमी होण्यासाठी मागणी केली आहे.लवकरात लवकर स्मशानभूमीचे काम सुरू झाले नाही तर इथून पुढे सर्व अंत्यविधी प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामपंचायत च्या पुढे किंवा तहसील कार्यालयाच्या पुढे करण्यात येतील असा एन डी एम जे संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख,महाराष्ट्र पत्रकार संघ तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या वतीने प्रशासनास इशारा देण्यात आला आहे.याबाबत आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,एन.डी एम.जे राज्यसचिव वैभवगीते हे उपविभागीय दक्षता समितीच्या बैठकीमध्ये हा विषय मांडणार असल्याचं सांगितले सदर स्मशानभूमी संदर्भात प्रशासकीय मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा करणार आहोत असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.जर लवकरात लवकर स्मशानभूमी झाली नाही तर गावामध्ये प्रेत जाळण्यावरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नातेपुते येथे रिवायडींग दुकानाचे शटर उचकटून 160 किलो रिवायडींग वायरची चोरी,अयीन सणात चोरी करून चोरांचे पोलिसांना आव्हान

नातेपुते येथे रिवायडींग दुकानाचे शटर उचकटून 160 किलो रिवायडींग वायरची चोरी,

अयीन सणात चोरी करून चोरांचे पोलिसांना आव्हान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

नातेपुते दहिगाव रोड येथे गणेश उत्सवाच्या रात्री 31 ऑगस्ट रोजी शिवकृपा इंजिनिअरिंग वर्क्स मोटर रिवायडींग या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 14 हजार रुपये किमतीचे रिवायडींग वायरची चोरी केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची हकीकत अशी की तानाजी कदम राहणार कुरवली ता. इंदापूर यांचे नातेपुते येथे इंजिनिअरिंग वर्क्स व मोटार रिवायडींग चे भाडोत्री दुकान आहे. तानाजी कदम व त्यांचे बंधू अभिजीत कदम यांनी बुधवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे काम उरकून दुकानाला कुलूप लावून बंद केले.गुरुवारी सकाळी दुकानात काम करणारा नोकर सकाळी कामावर आल्यावर चेतन गोकुळ पांडुळे याला दुकानाचे शटर उचकटलेले दिसले.  त्याने ही माहिती कदम यांना दिली तात्काळ कदम नातेपुते येथे आले असता त्यांना दुकानातील सर्व मोटर, स्टार्टर, केबल,वायडिंग केबल व इतर साहित्य अस्तव्यस्त पडलेले दिसले.

यामध्ये अज्ञात चोरट्याने दुकानातील 42 हजार रुपये किमतीचे अंदाजे 70 किलो असलेली ऍग्रो फोर्जिंग कंपनीचे पांढऱ्या रंगाची वायर 72 हजार रुपये किमतीचे मोटार रिवायडींग येथील जुने स्क्रॅप वायडिंग वायर अंदाजे 160 किलो अशी एकूण1लाख 14 हजार रुपये किमतीचे मोटार रिवायडींग चे साहित्य चोरून नेल्याचे दिसून आले. सदर घटनेबाबत नातेपुते पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दहिगाव रोडवरील संतोष हार्डवेअर या दुकानाचे शटर सुद्धा उचकटण्याचा चोरट्याने प्रयत्न केला.पोलीस तपास चक्र फिरवून पोलीस तपास करत असताना नातेपुते येथील मस्के भाऊसाहेब यांच्या घराच्या जवळ दुसऱ्या दिवशी जवळपास 70 किलो रिवायडींग ची वायर सापडला असून याबाबत नातेपुते पोलीस स्टेशनचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे,पीएसआय तानाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मासाजी थोरात हे तपास करत आहेत. सदर घटने संदर्भात तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी पत्रकार व व्यापारी यांची बैठक बोलवून सदर गंभीर घटनेबाबत विचारविनिमय करून प्रतिबंधात्मक उपाय योजना आपण सर्वांनी मिळून करूया असे आवाहन केले. या घटनेवरून असे निदर्शनास येते की सणामध्ये व्यस्त असताना चोर याचा फायदा घेऊन चोरी करतात व नवीन अधिकारी रुजू झाल्यानंतर चोरटे चोरी करण्याचा प्रयत्न करतात व जणूकाही नवीन अधिकाऱ्याला एक प्रकारचे आव्हानच देण्याचा प्रयत्न करतात असे निदर्शनास येत आहे.

मुंबई येथे राष्ट्रीय विशेष सरकारी वकील परिषद यशस्वी रीत्या संपन्न..

मुंबई येथे राष्ट्रीय विशेष सरकारी वकील परिषद यशस्वी रीत्या संपन्न..

अनुसूचित जाती जमातींना न्याय देण्यासाठी वकिलांनी संघठीत कायदेशीर कृती कार्यक्रम आखणे ही काळाची गरज..मा.सिद्धार्थ खरात

अत्याचार पिडीतांच्या न्याय हक्कासाठी विशेष सरकारी वकीलांनी अधिक भक्कमपणे बाजू मांडून आरोपीला शिक्षा होणे करिता सर्वतोपरी प्रयत्न करावे..ॲड.गजानन चव्हाण

#संविधानाच्या रक्षणासाठी देशाच्या प्रत्येक जिल्हा न्यायालया पासून तर सर्वोच्च न्यायायलयापर्यंत वकिलांच्या फौजा निर्माण करा:हर घर वकील..ॲड. बी.जी.बनसोडे

पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्कसंदेश भालेराव दिनांक नांक २७-२८ ऑगस्ट २०२२ रोजी इस्लाम जिमखाना, मरिन लाईन्स, मुंबई येथे राष्ट्रीय विशेष सरकारी वकील परिषदेचे आयोजन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिगल रिसोर्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. ॲट्रोसिटी खटल्यात काम करण्याचे विशेष सरकारी वकिलांचे प्रॉसीक्यूशन स्किल डेव्हलप करणे आणि देशात रिजनल नेटवर्क तयार करता यावे या दृष्टीने सदर परिषदेचे नियोजन करण्यात आले.

एन.डी.एम.जे.संघटनेचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल सिंग यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. संघटनचे राज्य महासचिव ॲड.डॉ.केवल उके यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची प्रस्तावना केली. उपस्थित प्रतिष्ठित पाहुण्यांचा हस्ते थोर महापुरुषांच्या व राष्ट्रमातांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र शासनाचे गृहविभाग सहसचिव मा.सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या उदघाटकीय भाषणात त्यांनी “अनुसूचित जाती जमातींना न्याय देण्यासाठी वकिलांनी संघठीत कायदेशीर कृती कार्यक्रम आखणे ही काळाची गरज आहे” असे म्हटले.

आशिया दलित हक्क मंचाचे अध्यक्ष डॉ.एन.पॉल दिवाकर यांनी ऑनलाईन भाषणात जातीय भेदभाव हे देशाच्या विकासातील एक मुख्य अडसर असून यावर उपाय म्हणून वकिल आणि न्यायव्यवस्था यांची सांगड घालून कायदेशीररीत्या जनजागृती करणे गरजेचे आहे असे म्हटले. उदघाटन सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले महाराष्ट्र शासनाचे सहसचिव मा. पी.डी.सदांशिव यांनी सर्व राज्यातून आलेल्या विशेष सरकारी वकिलांना कार्यक्रमाच्या व पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य ॲड.गजानन चव्हाण यांनी उदघाटन सत्राच्या समारोपीय भाषणात “अत्याचार पिडीतांना न्याय मिळवून देण्याकरिता विशेष सरकारी वकीलांनी अधिक भक्कमपणे बाजू मांडून आरोपीला शिक्षा होणे करिता सर्वतोपरी प्रयत्न करावे “असे म्हटले.

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे विद्यमान सदस्य,ॲड.उदय वारुंजीकर यांनी जनहित याचिका कशी दाखल करावी आणि जात पडताळणी याविषयी माहिती सादर केली. “काळा कोट हा वकिलांसाठी वरदान आहे, कोट आपल्या पात्रतेपेक्षा जास्त देतो, त्यामुळे आपण आपल्या काळ्या कोटांशी एकनिष्ठ राहावे” असे म्हणत आपले सत्र संपवले.

फॉरेन्सिक एक्स्पर्ट सौ.तितिक्षा देसाई कांबळे यांनी फौजदारी न्यायात फॉरेन्सिक सायन्सच्या उपयोयोगीतेबद्दलच्या सत्रामध्ये फॉरेन्सिक सायन्स, सायबर गुन्हे आणि फॉरेन्सिक सायन्सचे महत्त्व, डीएनए तंत्रज्ञान विधेयक आणि फॉरेन्सिक पुराव्याच्या मान्यतेबद्दल विविध केसेसचे दाखले देवून माहिती सांगितली. वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आरोपींना शिक्षा कशी लावता येईल यावर त्यांनी प्रकाश टाकला.

महाराष्ट्र पोलीस विभागाचे माजी पोलीस महानिरीक्षक, माननिय सुधाकर सुरडकर ह्यांनी प्रभावी पोलिस तपास आणि पिडीतांवर होनारे अत्याचार ह्याची माहिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ज्येष्ठ वकील, ॲड.संघमित्रा वडमारे यांनी भारतीय न्याय व्यवस्थेतील दलित महिलांची स्थिती या विषयावर सविस्तर माहिती दिली. त्यांनी संविधानात नमूद केलेल्या महिलांचे अधिकार, महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित काही प्रकरणे, पुराव्यांशी छेडछाड कशी केली जाते आणि प्रकरणांमधील त्रुटी कशा सोडवल्या जातात याबद्दल माहिती दिली.

ठाणे बार असोसिएशनचे वरिष्ठ वकील, ॲड.राजन साळुंखे ह्यांनी भारतीय पुराव्याचा कायद्याच्या आधारे एखाद्या खटल्यात युक्तिवाद कसा करायचा, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि कागदोपत्री पुरावे कसे वापरायचे हे त्यांनी स्पष्ट केले.

एन.डी.एम.जे.संघटनेचे राज्य सचिव मा.वैभव गिते यांच्या आभारप्रदर्शनाने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.

दुसऱ्या दिवसाचा पर्व, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री सुखदेव थोरात ह्यांच्या “भारतीय समाज व्यवस्थेत जातीयता अद्याप का टिकून आहे: वैचारिक आणि कायदेशीर मूल्य” या विषयावरील ऑनलाईन सत्राने झाला.

विशेष सत्र न्यायलयाचे माजी न्यायाधीश न्या.यशवंत चावरे यांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा कायदा २०१६ यावर माहिती सादर केली. त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले, “जोपर्यंत आपण कायद्याबद्दल लोकांच्या मनात चेतना निर्माण करत नाही आणि त्यांना कायद्याबद्दल शिक्षित करत नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही.” या सत्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील ॲड.नितीन सातपुते यांनी ॲट्रोसिटी कायद्यावरील मा.सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयाबद्दल माहिती सादर केली. त्यांनी तपासादरम्यान पुरावे आणि युक्तिवाद सादर करणे आणि अपील समजून घेण्याचे कौशल्य विकसित करणे यावर प्रकाश टाकला.

मुंबई उच्च न्यायालयाचे विशेष सरकारी वकील आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिगल रिसोर्स सेंटरचे मुख्य निमंत्रक ॲड. बी.जी.बनसोडे ह्यांनी राज्य पुरस्कृत दलित आणि आदिवासींवर होणारे हिंसाचार ह्यावर त्यांचे मत मांडले. यात देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी म्हटले ‘हर घर तिरंगा’, पण मी म्हणतो ‘हर घर वकील’ होणे महत्वाचे आहे”, असे म्हणत त्यांनी देशाच्या प्रत्येक जिल्हा न्यायालया पासून तर सर्वोच्च न्यायायलयापर्यंत समविचारी कमिटेड वकिलांच्या फौजा निर्माण करा असे म्हणत त्यांच्या सत्राचा शेवट केला. भारतातील अनुसूचित जाती-जमातींच्या जमिनीच्या हक्काच्या कायदेशीर बाबींवर ॲड.प्रविण तायडे ह्यांनी सविस्तर माहिती दिली.

परिषदेच्या दोन्ही दिवसाचे विविध विषयांवरील १२ महत्त्वपूर्ण सत्राचे सूत्र संचालन डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिगल रिसोर्स सेंटरचे सहनिमंत्रक ॲड.अनिल कांबळे, समन्वयक ॲड.वर्षा कांबळे,ॲड.विशाल साळवे, ॲड.रुचिता जाधव, ॲड.प्रेमानंद देडे, ॲड. प्रविण बोदडे, एन.डी.एम.जे.संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते, सहसचिव पी.एस.खंडारे, राज्य महिला संघटक पंचशीला कुंभारकर, राज्य समन्वयक शिवराम कांबळे, राज्य निरीक्षक दिलीप आदमने, ॲड.वैभव धाईंजे, ॲड.गुलाब तळनिकर सह इतर वकील व मान्यवरांनी केले.

सदर परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्यासह दिल्ली, ओरिसा, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्रप्रदेश या राज्यातून सुमारे ७० विशेष सरकारी वकिल सहभागी झाले होते. तसेच कायदा, प्रशासन, प्रसारमाध्यम, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्व यामध्ये, लॅपविंग समूहाचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक विनोद जाधव, डॉ.बंडू मेश्राम, डॉ.दयानंद इंगळे, थ्रीवेज मिडियाचे चंद्रकांत सोनावणे सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आतिशय उत्साहात आणि थाटात संपन्न झाला.

एन.डी.एम.जे.संघटनेचे सहसचिव पी.एस. खंडारे यांनी सहायक आयकर आयुक्त मा.अरविंद रामटेके यांचे विशेष आभार मानून दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एन.डी.एम.जे.संघटनेचे बंदिश सोनावणे, शशिकांत खंडागळे, शशिकांत वाघ, विजय कांबळे, संदेश भालेराव, मोहन दिपके, नवनाथ भागवत, संदिप घुसळे.आनंद खंडेराव सह इतर विधी महाविद्यालयीन विद्यार्थीनी सुरभी खंकाळ, चेतना कांबळे आणि ईश्वरी मते यांनी विशेष योगदान दिले.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या वतीने सर्व गणेश मंडळांसाठी भव्य देखावा स्पर्धा

खुशखबर !        खुशखबर.!        खुशखबर.! 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या वतीने सर्व गणेश मंडळांसाठी भव्य देखावा स्पर्धा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

*नातेपुते व पंचक्रोशीतील सर्व गणेश मंडळांना कळवण्यात येते की गणेश उत्सवानिमित्त पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने गणेश मंडळांसाठी भव्य डेकोरेशन देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत ज्या मंडळाचे डेकोरेशन देखावे सर्वात वेगळे व सुंदर चांगले असतील अशा मंडळाचे नंबर काढले जातील. व त्यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेलची मानाची ट्रॉफी, रोख पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल.* *सर्व मंडळामधून तीन नंबर काढले जातील ही स्पर्धा दिनांक 31 सप्टेंबर पासून सुरू होऊन अनंत चतुर्थी 9 सप्टेंबर2022 पर्यंत राहील.* या स्पर्धेत पोलीस स्टेशनला नोंदणीकृत असणाऱ्याच मंडळांनाच सहभागी होता येईल.* गणेश मंडळाने सामाजिक संदेश देणारे देखावे तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे देखावे पर्यावरण समतोल राखणारे देखावे, देशभक्तीपर प्रोत्साहन देणारे देखावे विविध पद्धतीने सामाजिक संदेश देणारे देखावे व सुंदर डेकोरेशन सादर करावेत तसेच गणेश उत्सवानिमित्त विविध उपक्रम उदाहरणार्थ रक्तदान शिबिर, मोतीबिंदू शिबिर,वृक्षारोपण ,विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप, विविध खेळ आकर्षक मिरवणूक वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना प्राधान्य देण्यात येईल. सदर मंडळांनी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या कार्यालयात संपर्क साधून अगोदर नोंदणी करणे गरजेचे आहे.* आपण केलेल्या उपक्रमांचा फोटोसह प्रसिद्धी झालेल्या बातमी सह, लेखी अहवाल तयार करून 13 सप्टेंबर पर्यंत पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या नातेपुते येथील कार्यालयात सादर करावा .दिनांक 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर पर्यंत चे प्रत्येक दिवसाचे सर्व उपक्रम असावेत* प्रत्येक मंडळाच्या उपक्रमासाठी मोफत पुरोगामी महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून बातमी स्वरूपात प्रसिद्धी दिली जाईल* स्पर्धेचा निकाल 26 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येईल व बक्षीस वितरण 5 सप्टेंबर विजयादशमी रोजी करण्यात येईल व स्थळ ठिकाण आपणास कळविण्यात येईल*वेगळा उपक्रम असल्यास प्रसिद्धीसाठी व बातमीसाठी संपर्क साधा.*स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क- 

संपादक प्रमोद शिंदे-9975903040, 

कार्यकारी संपादक प्रशांत खरात-7770076737

गणेश आगमनानिमित्त विश्वविनायक मंडळाच्या वतीने मोरगाव ते पिरळे प्रेरणा ज्योत

 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- श्री गणेश आगमन निम्मित पिरळे ता.माळशिरस येथील श्री विश्वविनायक गणेश मंडळ यांच्या वतीने मोरगाव ते पिरळे तरुण युवकांच्या साह्याने पायी प्रेरणा ज्योत आणण्यात आली.मोरगाव ते पिरळे सुमारे 70 किलोमीटर अंतर युवकांनी  चार तासात पार केले असून बारामती येथे आगमन होताच सागर देवकाते बारामती युवा नेते, आण्णासाहेब गुणवरे यांनी प्रेरणा ज्योतीचे जल्लोषात स्वागत केले. तसेच पिरळे येथे आगमन होताच ग्रामस्थांनी हे स्वागत केले गणेश मूर्ती व प्रेरणा ज्योतीचे बँजो, डीजे हलगी च्या साह्यान वाजत गाजत मिरवणूक काढून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रेरणा ज्योत आणण्यासाठीसचिन सूर्यवंशी, सोमनाथ लवटे,दीपक शिंदे,गणेश वाघमोडे,सोमनाथ लोहार,आकाश लोंढे,काशिना दादासाहेब शिंदे अमर सूर्यवंशी, गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मंडळास समजरत्न मानसिंगराव शिंदे प्रतिष्ठान यांच्याकडून विशेष सहकार्य करण्यात आले. 

नातेपुते बैलगाडा शर्यतीत हर्षवर्धन पालवे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावत मिळवले 71 हजार चे बक्षीस

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे )

समाजरत्न राजेंद्र पाटील यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीत सदाशिवनगर येथील हर्षवर्धन ज्ञानदेव पालवे यांच्या बैलगाडीने 71 हजार रुपयाचे प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अतुल पाटील, माऊली पाटील व संदीप ठोंबरे मित्र परिवाराच्यावतीने बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. या शर्यतीमध्ये सोलापूर,पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर,अहमद नगर अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रथम क्रमांक हर्षवर्धन ज्ञानदेव पालवे सदाशिवनगर 71 हजार रुपये चषक, द्वितीय क्रमांक 51 हजार रुपये चषक पैलवान बबन रुपनवर डोंबाळवाडी,तृतीय क्रमांक 41 हजार रुपये चषक लक्ष्मी प्रसन्न गिरवी,चतुर्थ क्रमांक 31 हजार रुपये चषक पैलवान माणिकराव वाघमोडे माळशिरस, पाचवा क्रमांक 21 हजार रुपये चषक दिग्विजय लोंढे कारंडे ,सहावा क्रमांक 11 हजार रुपये चषक व्यंकटेश अर्जुन सदाशिवनगर, सातवा क्रमांक 7हजार रुपये चषक जय हनुमान प्रसन्न हनुमान वाडी या बैलगाड्यांनी क्रमांक पटकावला आहे. या बैलगाडा शर्यतीसाठी राजेंद्र भाऊ पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवर,उत्तमराव जानकर,रघुनाथ अण्णा कवितके,ऍड दामोदर काळे, डॉ एम पी मोरे, हनुमंतराव सुळ, पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील,अजय सकट आप्पासाहेब भांड उपनगराध्यक्ष मालोजीराजे, नगरसेवक अविनाश दोशी आदी मान्यवरांसह अनेक नेते मंडळींनी भेट दिली तसेच बैलगाडा शर्यतीसाठी व राजेंद्र पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बैलगाडा शर्यत यशस्वी होण्यासाठी अतुल पाटील, माऊली पाटील ,संदीप ठोंबरे,बाळनाना पांढरे, विजय अर्जुन, तात्यासाहेब हाके ,नगरसेवक रणजीत पांढरे ,अण्णा पांढरे, बापू सरक ,सारंग चुकले, संतोष आबा, विठ्ठल अर्जुन,संजय पांढरे,सतीश बंडगर, राऊत, अजित काळे, सुरज साळुंखे,अजेश पांढरे,संजय मदने,शरद प्रेम देवकाते,जस पाटील,बाळासाहेब मदने, दत्तू बोडरे,उद्धव राऊत ,विनोद राऊत, वैभव राऊत,पप्पू दुधाळ,महेश बंडगर, अनिल पांढरे,भैया पांढरे,सागर राऊत,रुपनवर,मधु पांढरे, हनुमंत राऊत, अशोक खरात ,सुधीर पांढरे ,आबा बोडरे, राहुल बोराटे, केवल भरते ,अक्षय झंजे, गणेश काळे, कुमार वाघमोडे, धनंजय पांढरे, नवनाथ पांढरे ,दादा पांढरे, विकास पांढरे, जय क्षीरसागर ,राहुल रणदिवे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संयोजक अतुल पाटील माऊली ,पाटील व संदीप दादा ठोंबरे हे होते.

नातेपुते येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना यां अभिवादन

      पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रतिनिधी : नातेपुते येथे दरवर्षी परंपरेने श्रावण महिन्यात चतुर्दशी दिवशी समाज बांधवांच्या व भजनी मंडळ नातेपुते यांच्या वतीने तिथीनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी दि. २६ ऑगस्ट रोजी  सायंकाळी उपस्थित मान्यवरांच्या व समाज बांधवांच्या हस्ते प्रतिमापूजन व भजनाचा कार्यक्रम होऊन पुष्पवृष्टी करण्यात आली यानंतर आरती होऊन पसायदान घेऊन अभिवादन करून प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली     यावेळी ज्येष्ठ कीर्तनकार मनोहर महाराज भगत, हनुमंतराव धालपे, दत्तात्रयभाऊ उराडे, प्रभाकरभाऊ चांगण,दिलीप उराडे, दत्तात्रय हुलगे,बिट्टू अण्णा काळे, विनायकराव उराडे,विजयराव डफळ, संजय मामा उराडे, गणेश बापू उराडे, सोपान उराडे, दिलीपराव ठोंबरे, अमर भिसे, प्रेमभैया देवकाते,अवधूत अण्णा उराडे, महेश ठोंबरे, दर्शन उराडे, पवन उराडे, जयपाल ठोंबरे, श्रीकृष्ण महाराज भगत, गणेश महाराज भगत, विलासराव लाळगे, दिलीपराव लाळगे, माऊली राऊत भाजप अनुसूचित जाती मोर्चेचे तालुकाध्यक्ष बाबुराव खिलारे,भजनी मंडळाचे जगन्नाथ सोनवळ, साहेबराव देशमुख, तुकाराम ठोंबरे, सुभाष उराडे, भागवत चांगण, नारायण चांगण, दशरथ चांगण, भागवत साळी, दत्तात्रय लांडगे, विठ्ठल पिसे, दयानंद लाळगे, एकनाथ उराडे, लक्ष्मण महाराज, पिंगळे दशरथ, पवार माऊली, कवितके तसेच गावातील समाज बांधव व दत्त प्रसादिक भजनी मंडळ ग्रामस्थ उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी व  भजनी मंडळ नातेपुते यांनी परिश्रम घेतले, याप्रसंगी नातेपुते गावातील पत्रकार बंधू विलासराव भोसले, अभिमन्यू आठवले, बापूसाहेब बाविस्कर, प्रमोद शिंदे, श्रीराम भगत, उपस्थित होते

नातेपुते पोलीस स्टेशन येथे एपीआय मनोज सोनवलकर यांना भाऊक निरोप तर प्रवीण संपांगे यांचे जंगी स्वागत


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मनोज सोनवलकर यांची नियमाप्रमाणे अचानक दोन वर्ष कालावधी पूर्ण झाल्याने पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे बदली झाले आहे.
तर त्यांच्या जागी बोरामणी ,तालुका सोलापूर येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांची नातेपुते येथे नियमाप्रमाणे बदली झाली असल्याने नातेपुते करांच्यावतीने ए पी आय मनोज सोनवलकर यांना पंचक्रोशीतील नेते मंडळी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्यावतीने भावुक होऊन निरोप देण्यात आला.


तर एपीआय प्रवीण संपांगे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांना निरोप देण्यासाठी पूर्वी नातेपुते येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी एपीआय राजकुमार भुजबळ हे देखील उपस्थित होते. मनोज सोनवलकर यांनी चांगल्या पद्धतीने काम केल्याबद्दल लोकांकडून त्यांची प्रशंसा करण्यात आली तर नूतन पोलीस अधिकारी संपंगे यांना भुजबळ साहेब व सोनवलकर साहेब यांच्यासारखे काम करण्याची विनंती करण्यात आली. याप्रसंगी एपीआय राजकुमार भुजबळ म्हणाले की या परिसरातील लोक अतिशय चांगले आहेत प्रशासनास नेहमी सहकार्य करतात तसेच मनोज सोनवलकर म्हणाले इथल्या लोकांनी आम्हाला भरपूर प्रेम दिले आहे मी भाग्यवान आहे या ठिकाणी काम करून मला माऊलींची पालखी,शिखर शिंगणापूर व श्रीनाथ या देवस्थानांचा यांचा बंदोबस्त करून सेवा करण्याची संधी मिळाली एपीआय संपांगे म्हणाले अगोदरच्या अधिकाऱ्यांनी जे उपक्रम राबवले ते उपक्रम तसेच पुढे राबवण्यात येतील.काम बोलून नाहीतर करून दाखवेल आपल्या मदतीची अपेक्षा आहे असे ते बोलत होते. तसेच रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव एन के साळवे पत्रकार श्रीकांत बाविस्कर,प्रमोद शिंदे, समीर सोरटे पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, सरपंच संदीप नरोळे, राजकुमार हिवरकर,सुधीर काळे,राजेंद्र रुपनवर, अनिकेत साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ए पी आय राजकुमार भुजबळ,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे हे होते. तसेच नगरसेवक अविनाश दोशी, मधुकर पाटील,शहाजी धायगुडे रामहरी रुपनवर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संतोष काळे,बाळासाहेब पांढरे बशीर काझी, रंजीत सुळ महादेव शिंदे, प्रमोद टू पंचक्रोशीतील सरपंच,पोलीस पाटील विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्या रविवारी नातेपुते येथे रंगणार बैलगाडा शर्यतींची रणधुमाळी नातेपुते

समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या रविवारी रंगणार बैलगाडा शर्यतीची रणधुमाळ बैलगाडा शर्यत

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नातेपुते येथील सुप्रसिद्ध माजी पोलिस पाटील समाजरत्न राजेंद्र हनुमंत पाटील यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन रविवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आलेले आहे अशी माहिती अतुल पाटील व माऊली पाटील मित्र परिवार व संदीप ठोंबरे मित्र परिवार नातेपुते यांच्यावतीने देण्यात आली आहे नातेपुते येथील मधुर मिलन मंगल कार्यालया जवळ 46 फाटा येथे होणार आहे. या बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस 71 हजार रुपये द्वितीय बक्षीस 51 हजार रुपये तृतीय बक्षीस 41 हजार रुपये चौथे बक्षीस 31 हजार रुपये पाचवे बक्षीस 21 हजार रुपये सहावे बक्षीस 11 हजार रुपये सातवे बक्षीस 7 हजार रुपये आहे. या बैलगाडा शर्यत पारदर्शक होणारा असून पंचांचा निर्णय अंतिम राहील. हा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता सुरुवात होईल.या बैलगाडी शर्यतीत जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक संयोजक सार्वजनिक बांधकाम सभापती अतुल (बापु) पाटील माऊली पाटील मित्र परिवार नगरसेवक रणजित पांढरे आण्णा पांढरे माजी ग्रामपंचायत सदस्य संदीपदादा ठोंबरे यांनी केले आहे

You may have missed