आंतरराष्ट्रीय

दैनिक अजिंठा टाइम्स वृत्तपत्राच्या “दिपोत्सव” विशेषांकाचे प्रकाशन ॲड.डॉ.केवलजी उके यांच्या अध्यक्षतेत संपन्न..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई (प्रतिनिधी) दिनांक २२/११/२०२१ रोजी सायंकाळी पोलिस वसाहत कल्याण पश्चिम येथील सावित्रीबाई फुले सभागृह येथे दैनिक अजिंठा टाइम्स वृत्तपत्राच्या “दिपोत्सव” विशेषांकाचे प्रकाशन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस तसेच महिला व बाल विकास विभागाचे मंत्रालइन सदस्य ॲड.डॉ.केवलजी उके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी नेते व जेष्ठ विचारवंत राजाराम पाटील तसेच जेष्ठ साहित्यिक व स्वतंत्र कामगार युनियनचे अध्यक्ष सागरजी तायडे, रेल्वे कंट्रोल अधिकारी सुधाकर सरवदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

दै.अजिंठा टाइम्सच्या प्रकाशनास शुभेच्छा देताना ॲड.केवल उके म्हणाले की सध्याच्या काळात चळवळीचे मुखपत्रे हे फारच कमी झाले आहेत ‌व समाजावरील अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठवला जात नाही. याला वाचा फोडण्याचे काम दैनिक अजिंठा टाइम्स व संपादकीय मंडळ व प्रतिनिधी करतील त्या मुळे संबंध देशात आवाज पोहचला जाईल असी अपेक्षा व्यक्त केली. ज्याप्रकारे नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे.) संघटनेने समाजात अनेक “चंद्रू “तयार केले आहेत. त्याच पद्धतीने दै.अजिंठा टाइम्स मध्ये लेखणीच्या माध्यमातून चांदृ तयार व्हावेत अशीही अपेक्षा व्यक्त केली. पुढे बोलताना ॲड.केवल उके म्हणाले की अजिंठा टाइम्स चे संपादक हे बोलून दाखवत नाहीत तर करून दाखवतात. संपादक संजय माकेगावकर हे पंधरा ते सोळा वर्षां पासून माझ्या सोबत काम करत असताना बोलणे कमी पण काम हे कृतीत उतरवून करून दाखवतात असेही ॲड.केवल उके म्हणाले.

आग्री कोळी समाजाच्या न्याय हक्कासाठी व्यापक लढा उभारणारे ओबीसीचे नेते जेष्ठ विचारवंत राजाराम पाटील यांनी दैनिक अजिंठा टाइम्स ला शुभेच्छा पर मार्गदर्शन करताना म्हणाले की मुंबई-ठाणे भागातील ओबिसी समाजाच्या व्यथा मुंबई येथील वृत्तपत्रातून मांडण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, कोळी समाजाच्या अनेक अडीअडचणी येतात त्यावर वृत्तपत्रातून आवाज उठवला तर तो महाराष्ट्र भर प्रसिद्ध होत नाही. परंतु दैनिक अजिंठा टाइम्सने मुंबई-ठाणे येथील सर्वसाधारण जनतेचा आवाज आपल्या दैनिकाच्या माध्यमातून महाराष्ट्राभर पोहचविण्याचे काम करत आहात त्या बद्दल व दैनिक अजिंठा टाइम्सच्या दिपोत्सव विशेषांकास व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ विचारवंत तथा सामाजिक कार्यकर्ते प्रविण मोरे यांना काही तांत्रिक अडचणी मुळे प्रत्यक्ष हजर राहता आले नाही परंतु त्यांनी ऑनलाइन व्हिडिओ काॅन्फ्रशद्वारे दैनिक अजिंठा टाइम्सच्या दिपोत्सव विशेषांकाच्या प्रकाशना निमित्त सर्व संपादकीय मंडळास शुभेच्छा दिल्यात.

स्वतंत्र कामगार युनियनचे अध्यक्ष, कामगार नेते सागरजी तायडे यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात बोलताना म्हणाले की संपादक संजय माकेगावकर हे माझे सहकारी व चांगले मित्र आहेत. त्यांना मी पंधरा वर्षांपासून ओळखतो त्यांना कामाची तळमळ आहे व ते चिकाटीने काम करतात. निस्वार्थी वृत्तीने व एकनिष्ठेने काम करत असतात. दैनिक अजिंठा टाइम्सच्या या रोपट्याचे भविष्यात विशाल वटवृक्षात नक्कीच रूपांतर होईल आणि वंचित समुद्यचे भविष्य उज्वल करतील अस्या शब्दात शुभेच्छा देताना सागर तायडे हे बोलत होते. यावेळी सेंट्रल रेल्वे अधिकारी सुधाकर सरवदे आणि एन.डी.एम.जे. ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय कांबळे यांच्या सह अनेक मान्यवरांनी शुभेच्छापर विचार मांडले.
दैनिक अजिंठा टाईम्स चे संपादक संजय कांबळे (माकेगावकर) व संपादकीय मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजनकेले होते. या करिता एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयजी कांबळे, एन.डी.एम.जे. कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष अँड प्रविणजी बोदडे व त्यांच्या संपूर्ण टीमने मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून एन.डी.एम.जे सातारा जिल्हा पदाधिकारी पिराजी सातपुते,एन.डी.एम.जे.मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिशजी सोनवणे, सचिव शशिकांत खंडागळे, संघटक शशिकांतजी वाघ, नागसेन बुक डेपोचे संचालक सोमनाथ भोसले, एन.डी.एम.जे ठाणे जिल्हा सचिव विनोदजी रोकडे, उपाध्यक्ष विकासजी चव्हाण, सहसचिव सुनिलजी ठेंगे, ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदेशजी भालेराव, कल्याण डोंबिवली शहर संघटक नथुराम मोहिते,एन.डी.एम.जे.शहापूर तालुका प्रसिद्धीप्रमुख मनोहर गायकवाड, सुमित जाधव तसेच इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक संपादक संजय माकेगावकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.डी.एम.जे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण सर यांनी केले.

श्री १00८ महावीर दिगंबर स्वामी जैन अतिशय क्षेत्र दहिगाव वार्षिक रथ यात्रेनिमित्त विविध उपक्रम

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे)सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री  १00८ महावीर दिगंबर स्वामी जैन अतिशय क्षेत्र दहिगाव वार्षिक रथ यात्रेनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे.गेली दोन वर्ष कोरोना पार्श्वभूमीमुळे रथोत्सव साजरा करता आला नाही परंतु यावर्षी कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने यंदा नेहमीप्रमाणे रथोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा होणार आहे.रथोत्सवाची सुरुवात बुधवार 24 नोव्हेंबर ते शुक्रवार 26 नोव्हेंबर पर्यंत रथ उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 10 भगवान श्री यांचा अभिषेक तसेच संगीतमय भक्ताम्बर विधान दुपारी 2  वाजता श्री 1008 जिनेन्द्र देवाधिदेव पालखी शोभायात्रा,बगीचा येथे संगीतमय चढावे अभिषेक, गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 ते 9:30 श्री 1008 बाहुबली भगवान यांचा अभिषेक तसेच श्री ब्रह्मामहती सागर चरण पादुका अभिषेक सकाळी  10 ते1:30 संगीतमय शांतीनाथ विधान तसेच सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वरोग निदान शिबिर आयोजन.सायंकाळी 4:30 ते 5:30 संगीतमय चढावे तथा अभिषेक आयोजन.शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सुशोभित धर्म रथामध्ये श्री 1008 भगवान महावीर स्वामी यांची मूर्ती रथामध्ये विराजमान करून भव्य शोभा रथ यात्रा काढण्यात येईल. दुपारी 12 वाजता सभामंडप उद्घाटन तसेच रथा मधून मंडपामध्ये मूर्ती घेण्याचा कार्यक्रम,त्याच ठिकाणी श्री जिनेन्द्र कला मंच हसुर यांचा संगीतमय कार्यक्रम व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम आयोजन केले आहे. या रथो उत्सवास महाविर सेना नातेपुते,सन्मती सेवा दल स्वयंसेवक उपस्थित होऊन रथ शोभा वाढवतील.या रथोत्सवास अतिशय क्षेत्र दहिगाव समस्त जैन बांधवांच्या वतीने  निमंत्रण देण्यात येत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई दि. 16 – एस टी च्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा मुंबईतल्या आझाद मैदानात संप सुरु आहे. आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन संवाद साधत रिपब्लिकन पक्षाचा एसटी कामगारांच्या संपाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी भाजप नेते गोपीचंद पडळकर; माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत; रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; पनवेल चे उपमहापौर जगदीश गायकवाड; रमेश गायकवाड; चंद्रशेखर कांबळे; सोना कांबळे; जिल्हा अध्यक्ष संजय पवार; शिरीष चिखलकर आदी उपस्थित होते.

यावेळी ना.रामदास आठवले यांनी आपल्या खास काव्यमय शैलित महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

एसटीचं झालं नाही विलीनीकरण, तर ठाकरे सरकारचं होणार मरण, कर्मचारी येणार नाहीत शरण, कारण सरकारचं होणार आहे मरण, अशा शब्दात आठवले यांनी मविआ सरकारला इशारा दिला.

ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी लढा तीव्र करावा लागेल, असा इशारा देत रामदास आठवले यांनी शरद पवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं असं म्हटलं आहे.

एसटी नसती तर मी पुढारी नसतो असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

जय भीम आहे माझ्या गाठीशी,
मी तुमच्या आहे पाठिशी,
सरकारला सळो की पळो करुन सोडा असं आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केलं.

हे महाविकास आघाडी सरकार कधीही जाईल अशी चर्चा आहे, उद्धव ठाकरे आमच्या सोबत राहिले असते तर बरं झालं असतं, पण आता आम्ही त्यांना सोबत घेणार नाही, आणि त्यांना काही देणार नाही, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

विनोद रोकडे यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमांनी साजरा

विनोद शामसुदंर रोकडे यांच

वाढदिवस अनेक सामाजी

उपक्रमांनी साजरा..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव- ठाणे जिल्ह्यातील कर्तव्यनिष्ठ व्यक्तीमत्व संकटकाळात पीडितांच्या मदतीला धाव घेणारे , गरजूंना मायेची साथ देणारे, अन्याला वाचा फोडणारे सर्वधर्मसमभाव जपणारे अशी भूमिका घेऊन, अन्याय करणाऱ्याना धडा शिकविणारे ठाणे जिल्ह्यातील डॅसिंग व्यक्तिमत्व पत्रकारिता मध्ये उत्कृष्ठ बदल घडवणारे कार्यकुशल सोशल न्युज नेटवर्कच्या माध्यमाने सरकारला धारेवर धरणारे पुरोगामी महाराष्ट्र न्युज चॅनलचे प्रतिनिधि व नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीसचे ठाणे जिल्हा सचिव ,वंचित बहुजन आघाडी कल्याण पुर्व चे सचिव कल्याण पुर्व मिलिंद नगर चे मूळ रहिवाशी समाज सेवक आयु.विनोद शामसुदंर रोकडे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजीक उपक्रम राबवून आपला जन्मदिन साजरा केला.

.विनोद शामसुदंर रोकडे यांना नॅशनल दलित मुव्हमेट फ़ॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य, ठाणे जिल्हा टिम, पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क वंचित बहुजन आघाडी AISCST नॅशनल रेल्वे यूनियन यांनी जन्मदिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभकामना व्यक्त केल्या.

सामाजीक कार्यकर्ते तथा पत्रकार विनोद शामसुदंर रोकडे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास एन डीए एम जे महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवल उके साहेब, मा.बंदिश सोनवणे मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष, शशिकांत खंडागळे,एनडीएमजे मुंबई ठाणे प्रदेश सचिव , शंशीकात वाघ, एन.डी.एम.जे. ठाणे जिल्हाअध्यक्ष मा .विजय काबंळे, संदेश भालेराव, सुनील ठेंगे,प्राध्यापक गुरुनाथ कशिवले सर, सागर रोकडे,मनोहर गायकवाड, विपुल पंडित, तसेच बहुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक संस्थेतील पदाधिकाऱी रमेश अडसुअळे,नथुराम मोहिते,श्रीधर शिंदे,अविनाश, बावस्कर, संदिप घुसळे,रवींद्र भांबरे,दिपक वाघ, कपिल पगारे,आनंद निरभवणे,विक्रम जाधव,सुरेश शिंदे,सुरेश घोडेराव ह्यांच्या उपस्थितीने सर्व प्रथम बूद्ध वंदना घेउन विनोद शामसुदंर रोकडे यांचा वाढदिवसाचा केक कापुन शाल व पुष्पगुच्छ देऊन जन्मदिनाच्या मंगल कामना व्यक्त करून पुढील कार्यास मान्यवरांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-माळशिरस नगरपंचायतीचे लोकसेवक वडजे यांनी माळशिरस ते कचरेवाडी हद्दी पर्यंतचा रस्ता डांबरीकरणाचे कामाच्या बिलाचा चेक तिरुपती कंट्रक्शन यांच्या बँक खात्यावर जमा केल्याचा मोबदल्यात बिलाच्या तीन टक्के रक्कम लाच म्हणून मागितले असल्याबाबत दिनांक 30/9 2021 रोजी तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारी अर्ज अँटी करप्शन ब्युरो सांगली यांच्याकडे दिला होता तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार 30/9/2021 ते 22/10/2021 रोजी कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली.
असता पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक वडजे मुख्याधिकारी नगरपंचायत माळशिरस यांनी तक्रारदार यांच्याकडे माऊली चौक माळशिरस ते कचरेवाडी हद्दीपर्यंत रस्ता डांबरीकरणाचे कामाचा बिलाचा चेक तिरुपती कंट्रक्शन यांच्या बँक खात्यावर जमा केल्याचे मोबदल्यात एक लाख रुपये व नवीन कामे मिळवून देण्यासाठी खर्च 26000 अशी एकूण एक लाख 26 हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यानंतर 22/10/2021 रोजी व 01/11/2021 रोजी लोकसेवक वडजे मुख्याधिकारी नगरपंचायत माळशिरस यांच्याविरुध्द सापळा कारवाई आयोजीत केली असता लोकसेवक वडजे मुख्याधिकारी नगरपंचायत माळशिरस यांनी संशय आल्याने तक्रार यांच्याकडून स्वीकारली नाही श्री विश्वनाथ दिगंबर वडजे मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर वर्ग-2 यांच्याविरुद्ध माळशिरस पोलीस ठाणे जिल्हा सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम खाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे सदरची कारवाई मा श्री राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक व श्री सुरज गुरव अप्पर पोलीस उपायुक्त अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा अप्पर पोलीस उपायुक्त अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे तसेच श्री संजय घाटगे पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुदत्त मोरे पोलीस निरीक्षक अविनाश सागर,संजय संकपाळ, अजित पाटील,प्रीतम चौगुले,संजय कलगुटगी,चालक बाळासाहेब पवार पोलीस कर्मचारी अँटी करप्शन ब्युरो सांगली यांनी केले आहे.

एन.डी.एम.जे. कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्याची गरज.. ॲड.डॉ.केवल उके

एन.डी.एम.जे. संघटनेची वार्षिक आढावा बैठक व कार्यकर्ता मेळावा थाटात संपन्न

कल्याण येथे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेची वार्षिक आढावा बैठक डाॅ केवल उके यांच्या अध्यक्षतेत संपन्न…

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेरावदिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे.) संघटनेचे बुद्धाभुमी फाउंडेशन, वालधुनी कल्याण येथे वार्षिक आढावा बैठक मोठया थाटात संम्पन्न झाली.
संघटनेचे राज्य महासचिव ॲड.डॉ.केवल उके यांच्या अध्यक्षतेत सदर बैठक आयोजित करण्यात आली होती. बुद्ध वंदना घेऊन आणि संघटनेच्या कार्याच्या चित्रीकरणाचे सादरीकरण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या मेळाव्याचे उद्घाटन राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य मा.किशोर मेढे यांच्या हस्ते करण्यात आले व आपले मनोगत व्यक्त करतांना संघटनेच्या विविध समाजउपयोगी कामाचा उल्लेख करून संघटनेला पुढील कार्यासाठी कोणत्याही शासकिय अडीअडचणीत मदत करण्याची हमी देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्य मंत्र्यांचे स्विय सहाय्यक मा.प्रविण मोरे, वरिष्ठ विधीज्ञ ॲड.बी जी.बनसोडे, भंते गौतमरत्न, लॅपिवंग ग्रुपचे चेअरमन मा.विनोद जाधव, माजी आयकर अधिकारी मा.किशोर सोमकुवर, मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी मा.किरण सोनवणे, रिपाई नेते अण्णासाहेब रोकडे इत्यादी उपस्थित होते. विचारमंचावरून उपस्थितांना संबोधन करत ॲड.डॉ.केवल उके यांनी एन.डी.एम.जे. कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्याची गरज असल्याचे सांगत शक्य झाल्यास निवडणुका लढविण्याचे सुद्धा आव्हाहन केले.

यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने गत वर्षाचा आढावा, येणाऱ्या २०२२ या वर्षाचे कृती कार्यक्रम आणि नियोजन, मीडिया ॲडव्होकसी, कॅलेंडर, माहितीपत्रक, वार्षिक अहवाल मॅगझिन आणि कमिटीचे बुकलेट तयार करणे, दरवर्षीचे नियोजित कार्यक्रम आर्थिक नियोजन इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.

प्रत्येक जिल्ह्यातून वर्षभराच्या कार्याची ज्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या व कृती – कार्यक्रमांचा फोटो असेलेल्या व्हिडिओ क्लिपस् दाखविण्यात आल्या. यापैकी वर्ष २०२१ या वर्षभरात सर्वात उत्कृष्ठ काम करणाऱ्या सोलापूर, सांगली आणि पुणे या तीन जिल्ह्यांच्या एन.डी.एम.जे. कार्यकारिणीचा “डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट समाज कार्य पुरस्कार २०२०-२१” हा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. तसेच सातारा जिल्ह्यातील १७ खून प्रकरणात पेंशन मिळवून देणारे सातारा जिल्हाध्यक्ष मा.निवृत्तीतात्या रोकडे यांचे व जिल्हा कार्यकारिणीचे सुध्दा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आले.
यावेळी राज्य, विभागीय, जिल्हा आणि तालुका स्तरावरील कार्यकारिनींची घोषणा करून उपस्थित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे राज्य सहसचिव मा. पी.एस. खंदारे यांनी केले. संघटनेचे राज्य सचिव मा. वैभवजी गीते यांनी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले त्यावेळी संघटनेचे कार्य आणि संघटना कशी चालवावी, अन्याय अत्याचारा विरुद्ध बंड कसा करायचा आणि पीडित कुटुंबांना न्याय कसा मिळवून द्यायचा यावर आपले अनुभव व्यक्त केले. तसेच मा.वैभव गिते यांच्या विनंती वरून या वर्षी नोव्हेंबर/डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाअधिवेशन घेण्याचे नियोजन करण्याचा प्रस्ताव सुद्धा मंजूर करण्यात आला.
संघटनेच्या राज्य कार्यकारणी समितीमधील ऍड.अनिल कांबळे, मा.रमाताई आहिरे. मा.पंचशीला कुंभारकर, मा.शरद शेळके, मा.बी. पी. लांडगे, मा.प्रमोद शिंदे. मा.ऍड. रुचिता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

विभागीय कार्यकारणी समितीमधील मा.बंदीश सोनवणे, मा.शशिकांत खंडागळे. मा. शोभा जाधव, मा.शशिकांत वाघ, मा.राहुल सावंत, मा.भारत गवई. मा.दादा जाधव, हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. ठाणे, पुणे, कल्याण, वाशीम, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, बीड, हिंगोली, धुळे, बुलढाणा, अकोला, यवतमाळ इत्यादी सह जवळपास १७ जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकार्यांनी उपस्थिती दर्शविली.

कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आयु.विजय काबंळे व इतर पदाधिकारी मा.विकास चव्हाण, मा.संतोष बनसोडे, मा.विनोद रोकडे, मा.सुनीलजी ठेंगे, मा. संदेश भालेराव, ॲड. प्रविण बोदडे, मा. संदीप घुसळे, मा.विनोद भालेराव, मा.धनंजय सुर्वे, मा.श्रीकांत भोईर, मा.गुरुनाथ कशिवले, मा.सागर रोकडे, मा.विपुल पंडित, मा.गणेश अहिरे,मा.प्रतीक अहिरे, मा. मनोहर गायकवाड इत्यदिंनी केले. आयोजकांनी सर्व पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

फोंडशिरस ग्रामपंचायत येथे आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांची जयंती साजरी

फोंडशिरस ग्रामपंचायत येथे आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांची जयंती साजरी 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रशांत खरात आद्य क्रांतिकारक लहुजी (वस्ताद) साळवे यांची जयंती  फोंडशिरस ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्सहात  साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक ,सरपंच, उप-सरपंच,तसेच ग्रामपंचायत सदस्य व वैभव रणदिवे,विजय बोडरे,मधुकर सर्जे , संतोष भिसे,दत्तु गोरे, शिवाजी जाधव उपस्थिति होते. यावेळी  सामाजिक कार्यकर्ते मा.सुनिल दाते यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आली.

नातेपुते नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नातेपुते करांना जिवंत मृत मासे व दुर्गंधी युक्त दूषित पाणी पुरवठा


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे) नातेपुते ता.माळशिरस चे नुकतेच ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाले असून कारभार ग्रामपंचायत कडून नगरपंचायत कडे गेल्यापासून नातेपुते कराना अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे.दिनांक 14 नोव्हेंबर रोजी पालखी मैदान येथील रंजीत कसबे यांच्या नळाला नगरपंचायत च्या हलगर्जीपणामुळे अक्षरशा जिवंत व मृत माशांचे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी नळाद्वारे आल्याचे निदर्शनास आले.यामुळे नातेपुते येथील नागरिक नगरपंचायत च्या कारभारावर नाराज आहेत त्याचबरोबर अनियमित पाणी पुरवठा ही केला जात असल्यामुळे येथील लोक वैतागले आहेत.नगरपंचायत च्या नळाला एक दिवस आड पाणी असून येत असून तेसुद्धा दूषित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.पाणी वेळेवर सुटत नसल्याने लोकांना कामावर जाता येत नाही.पाणी सुटण्याची वेळ काही ठिकाणी सकाळी दहा वाजल्यानंतर आहे व लोकांना कामावर जाण्याची वेळ ही नऊ वाजता असते त्यामुळे लोकांना पुरेसे पाणी भारता येत नाही पाण्यासाठी हातावर पोट भरणाऱ्या लोकांना रोजगार बुडवून एक दिवस आड पाणी भरावे लागते.या सर्व कारणांमुळे नगरपंचायत च्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे याकडे नगर पंचायत चे मुख्य अधिकारी खांडेकर यांचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नातेपुते येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त कुरबावी येथे क्रिकेटचे सामने तसेच ज्येष्ठ खेळाडूंचा सन्मान संपन्न

स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त कुरबावी येथे क्रिकेटचे सामने तसेच ज्येष्ठ खेळाडूंचा सन्मान संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- मौजे कुरबावी ता.माळशिरस जि.सोलापूर येथे स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्ताने नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते यांनी टेनिस बॉल वरील क्रिकेटचे सामने आयोजित करून  सर्व जेष्ठ खेळाडूंचा सन्मान केला.सकाळच्या सत्रात सामन्यांचे उद्घाटन आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाइंजे, जेष्ठ क्रिकेटर डी.जी. रणवरे,गजानन पाटील,आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक संघटनेचे राज्य अध्यक्ष लाखन चव्हाण,शाहरुख माणेर यांच्या शुभहस्ते नारळ फोडून पूजा करून सामन्यांना प्रत्यक्ष सुरवात झाली.एकूण आठ संघांनी भाग घेतला.यामध्ये डोंबाळवाडी,तांबेवाडी, चंद्रपुरी,धर्मपुरी,दहिगाव,नातेपुते,बारामती,फलटण,सांगोला,इंदापूर,पंढरपूर,येथून खेळाडू आले होते.अंतिम लढत श्रीराम क्रिकेट क्लब शिंदेवाडी व अमृतमहोत्सव क्रिकेट क्लब एकशिव,कुरबावी या संघात झाली.शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक,श्वास रोखून धरायला लावलेल्या अटीतटीच्या लढतीत अमृतमहोत्सवी टीमने बाजी मारून मनाचा चषक पटकावला.तर उपविजेत्या शिंदेवाडीच्या टीमने लौकिकाला साजेल असा खेळ दाखवून खिलाडीवृत्तीचे अभूतपूर्व दर्शन घडवुन तरुणांच्यापुढे नवीन आदर्श निर्माण केला.संध्याकाळी समारोपात शिंदेवाडीचे नवाज शेख सर,जेष्ठ क्रिकेटर डी.जि.रनवरे,चंद्रपुरीचे बापू जाधव,डोंबळवाडी चे आप्पासाहेब रुपणवर,एकशिवचे रजाक आतार सर,राहुल कसबे सर,ऍड.अमोल सोनवणे,सांगोल्याचे पंकज काटे,राष्ट्रीय समाज पक्षाचे आण्णासो रुपणवर पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मामासाहेब पांढरे,भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य काकासाहेब जाधव,माळशिरसचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे यांनी मार्गदर्शन केले.अनेक वर्ष एकमेकांविरुद्ध क्रिकेट खेळलेले खेळाडू एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.सर्वांच्या चेहऱ्यावर एकप्रकारे हास्य उमलले होते.सर्वजण अक्षरशः गळ्यात पडून आदराने एकमेकांची चौकशी करत होते नव्यादमाचे   तरुण खेळाडू जुन्या जेष्ठ खेळाडूंमधील क्रिकेट व ऊर्जा क्रिकेटबद्दलची आत्मीयता पाहून चाट झाले होते.वैभव गिते यांनी सर्व जुन्या व जेष्ठ एकेकाळी मैदान गाजवून स्वतःच्या गावाचा नावलौकिक वाढवलेल्या खेळाडूंचा सन्मान केला.शिंदेवडीचे जेष्ठ खेळाडू डी.जी. रनवरे यांनी 53 व्या वयात खेळताना षटकार खेचत प्रेक्षकांची मने जिंकली.क्रिकेटच्या सामन्यांचे धावते वर्णन (कॉमेंट्री) राजेंद्र खंडागळे,रजाक आतार सर,नवाज शेख सर,वैभव गिते यांनी करून अनेक आठवणींना उजाळा दिला.तर शरद रुपणवर सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.असे मैत्रीपूर्ण कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेण्यात यावेत अशी मागणी जनतेकडून होत आहे.

अपघातग्रस्त व्यक्तींना 52500 रु एवढी मदत करून डॉ.कुमार लोंढे यांची अनोखी दिवाळी!


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क माळशिरस प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गारवाड- चांदापुरी भागातील डॉ.कुमार लोंढे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.पंचशीला लोंढे हे दोघे दाम्पत्य सामाजिक बांधिलकी म्हणून दुष्काळग्रस्त व्यक्तींना मोफत आरोग्य सेवा,महापरिनिर्वाण दिन मुंबई व पंढरपूर वारी निमित्त मोफत आरोग्य वैद्यकीय सेवा,रक्तदान शिबिरे,मुले दत्तक योजना,ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षणासाठी पहिली ते बारावी शाळा,कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांना आरोग्य,जीवनावश्यक ,शालेय साहित्य मदत,आत्महत्याग्रस्त मुलांना दत्तक घेणे, ऊसतोड मजुरांना त्यांचा पालावर मोफत वैद्यकीय सेवा,दुष्काग्रस्त मुलींनाल लग्नासाठी आर्थिक सहाय्य डॉ.आंबेडकर अभ्यासिका अशा सामाजिक उपक्रमात सोशल संस्था व व्यक्तिगत पातळीवर ते अनोखे पद्धतीने कार्य करत असतात.
प्रत्येक वर्षी दीपावली निमित्त ते अनोखे उपक्रम करत असतात ऊसतोड कामगार सोबत दिवाळी तसेच पाठीमागील वर्षी पंढरपूर मधील एडसग्रस्त पालवी संस्थेत दिवाळी साजरा केली.या दिपावली मध्ये त्यांनी कुटुंबाची दिवाळी रद्द करून अपघातग्रस्त व्यक्तींना वेगवेगळ्या पातळीवर मदत केली आहे. ऐन दिवाळीत या अपघातग्रस्त कुटुंबाचे अश्रू पुसण्याचे त्यांनी काम केले आहे.
अकलूज येथील बारा वर्षाच्या मुलीच्या अपघातात पायाचा अक्षरशः चुराडा झाला तिचे वडील मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करतात तर आई गृहिणी आहे.या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना अकलूज येथे सूर्यवंशी हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष जाऊन मदत केली.पुणे येथे अपघातात ऍडमिट असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यास नुसता आधार न देता रोख स्वरुपात मदत केली. म्हसवड येथे सोळा वर्षाच्या मुलाला तर सोलापूर येथील ब्रेन ऑपरेशनसाठी ही पैस्याची मदत करून यांचे अश्रू पुसण्याचे कार्य केले.
स्वतः दिवाळी न करता,स्वतःच्या कुटुंबाची आशा अपेक्षा बाजूला ठेवून समाजासाठी झटणारे लोकांचे अश्रू पुसणारे दाम्पत्य म्हणजे आजच्या युगातील समाजसेवेच व्रत बाळगणारे थोर समाजसुधारक आहेत.त्यांच्या कार्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.यावेळी बोलताना डॉ. कुमार लोंढे म्हणाले समाजातील शेवटचा व्यक्तीचे दुःख व अश्रू पुसण्यासाठी आम्ही आमचे आयुष्य सार्थकी लावणार आहोत! फुले,शाहू,आंबेडकर यांचा विचार आणि समाजातील सकारात्मक लोकांच्या पाठिंब्यावर आयुष्यभर कार्यरत राहण्याचा मनोदय ही त्यांनी व्यक्त केला.
ही सर्व मदत डॉ.लोंढे कुटुंबियांची व्यक्तिगत स्वरूपाची आहे. समाजातील दानशूर व्यक्ती,संस्था यांनी ही पुढे येऊन दुःखी लोकांचे अश्रू पुसण्यास मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे

You may have missed