रियल लाइफ चे हिरो हे मेजरअनिल मानेंसारखे असतात- आय आर एस समीर वानखडे
नातेपुते (पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे)- बीएसएफ मधून नुकतेच रिटायर झालेले नातेपुते चे सुपुत्र मेजर अनिल माने यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल नातेपुते कर यांच्यावतीने सन्मान सोहळा आयोजित केला होता. या सन्मान सोहळ्यास सुप्रसिद्ध आय आर एस समीर वानखडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
बोलताना ते म्हणाले की रियल लाईफरियल लाइफ चे हिरो हे मेजर अनिल माने यांच्यासारख्या असतात अनिल माने यांनी माझ्यासोबत ड्रग्स मिशनमध्ये तीन वर्ष काम केले आहे.अनिल हा जिगरबाज पोलादी व धाडसी होता.अनिल ने त्याच्यासोबत अनेक बीएसएफ मधील जवान आमच्या सोबत जोडले व आतापर्यंत कुख्यात 357 गॅंगस्टर आम्ही पकडले आहेत.70 गुंडांना फक्त पाच जवानांनी अडवले होते. त्यात अनिल माने एक होता.अशाप्रकारे मेजर अनिल माने यांचे कौतुक त्यांनी केले.सध्या मुलांना खरा राष्ट्रवादी समजून सांगितला पाहिजे व मुलांना आयएस आयपीएस अधिकारी बनवले पाहिजे.
प्रसंगी मा आमदार रामहरी रुपनवर, शिवामृत दूध संस्थेचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच समीर वानखडे यांच्या पत्नी सिने अभिनेत्री क्रांति रेडकर बोलताना म्हणायला पाहिज अनिल माने हा माझ्या भावासारखा आहे.साहेबांची सावली बनून तो नेहमी राहिला आहे.अशा देशासाठी रक्त वाहणाऱ्यालोकांची गाथा मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.सह पत्नी मेजर अनिल माने यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना मेजर अनिल माने भाऊक झाले व म्हणाले हा माझा एकट्याचा सन्मान नसून माझे आई-वडील व माझे सर्व गुरु यांचा सन्मान आहे.याप्रसंगी बा.ज.दाते प्रशालेचे चेअरमन धर्यशील भाऊ देशमुख,रिपाई पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष एन के साळवे,माजी सरपंच डी वाय राऊत,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, मा पं समिती सदस्य माऊली पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,एडवोकेट पिसाळ,पंचक्रोशीतील माजी सैनिक,ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औदुंबर बुधावले यांनी केले.