मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती उपाध्यक्षपदी शाहिद भाई मुलांणी तर प्रवक्ते पदी बशीरभाई काझी यांची निवड
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)– अल्पावधीतच सर्वत्र मुस्लिमांच्या हक्कासाठी व आरक्षणासाठी झगडणारी उदयास येणारी संघटना आहे अल्पावधीतच या संघटनेचे महाराष्ट्रभर कार्यकर्ते व पदाधिकारी निर्माण झाले आहेत तसेच नातेपुते विभागातून शाहिद भाई मुलानी यांची कोर कमिटी उपाध्यक्षपदी तर बशीर भाई काझी यांची प्रदेश प्रवक्ते पदी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष रशीद भाई शेख यांच्यावतीने नुकतीच निवड करण्यात आली आहे. याबाबत मीडिया प्रमुख सलमान शेख यांनी माहिती दिली. तसेच शाहीद भाई व बशीर भाई यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रासप सरचिटणीस नितीन दादा धायगुडे व तालुकाध्यक्ष माऊली सरक यांच्या उपस्थितीत दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे संपादक प्रमोद शिंदे,बाबा बोडरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


