कर्तव्यदक्ष पुणे शहर पोलीस अनिल शिंदे यांचे कर्तव्य बजावताना दुःखद निधन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) पुणे येथील भारतीय विद्यापीठ दत्तनगर पोलिस चौकी मध्ये कर्तव्यदक्ष पुणे शहर पोलीस ए.एस.आय अनिल संभाजी शिंदे यांचे कर्तव्य बजावत असताना दुःख निधन झाले आहे. अनिल शिंदे हे पुणे शहरातील अतिशय कर्तव्य निष्ठ व प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांन मधील एक कर्मचारी होते. चाळीस वर्ष त्यांनी पोलिसात सेवा केली आहे. अनेक गुन्हेगारांची गुन्हेगारी मोडीत काढत त्यांनी आपला ठसा उमटवला होता.अनिल शिंदे यांनी पुणे येथील वानवडी, भारती विद्यापीठ,बंडगार्डन,शिवाजीनगर, पुणे शहर ट्राफिक लोणावळा-खंडाळा, वेल्ला,पुणे ग्रामीण,अशा अनेक पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्य बजावले आहे.त्यांचे वडील संभाजी खंडू शिंदे हेसुद्धा पोलिस कर्मचारी होते.त्यांचा आदर्श समोर ठेवून अनिल शिंदे यांनीसुद्धा पोलिसात जायचं ठरवलं व मेहनत करून स्वतः पोलीस भरती झाले व सलग चाळीस वर्ष देशसेवा केली 30 एप्रिल 2021 रोजी ते सेवा निवृत्त होणार होते परंतु कर्तव्य बजावत असताना त्यांचं काल सायंकाळी दुःख निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, ,भाऊ,पत्नी,तीन मुले, एक मुलगी नातवंड असा परिवार आहे.त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.



