नरभक्षक सैराट बिबट्याचा अकलूजच्या सिंहाने केला गेम

नरभक्षक सैराट बिबट्याचा अकलूजच्या सिंहाने केला गेम

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)-माढा करमाळा भागात थैमान घातलेला  नरभक्षक  सैराट बिबट्या ताने आतापर्यंत बारा लोकांचे प्राण घेतले  तो बिबट्या वांगी नं.4 रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत लपून बसला असता त्या बिबट्याला  वन विभागाने सापळा रचून अखेर ठार केले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती.अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून बिबट्याला पकडण्याच्या ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर 3 गोळ्या फायर करीत त्याला ठार केले.

डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अचूक नेमबाजी मुळे बिबट्या चा गेम करण्यात यश आले  . तसेच गेली सतरा दिवस वनविभाग अधिकारी व कर्मचारी या त्याच्या शोधात दिवस-रात्र मेहनत घेत होते

You may have missed