जांबुड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ प्रीती पिसाळ
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क श्रीपुर राज बनसोडे. माळशिरस तालुक्यातील जांबुड ग्रामपंचायतीचे उपसरपंच नारायण पाटील यांनी आपला तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक लागली होती या उपसरपंच पदाच्या जागेसाठी प्रीती नितीन पिसाळ यांनी आपला अर्ज दाखल केले होता तर त्यांना पुरवणी म्हणून ग्रा.प.सदस्य राजकुमार बाबार यांचा अर्ज दाखल केला होता.बाबर यांनी आपला अर्ज माघार घेतल्याने आणि विरोधकांचा अर्ज नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बी.डी.मुडफणे व ग्रामसेवक बी.पी.कुंभार यांनी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले त्यामुळे उपसरपंच पदाची जागा ग्रा.पं.सदस्या सौ प्रीती नितीन पिसाळ यांनी बिनविरोध पटकावीली जांबुड ग्रामपंचायतीमध्ये १३ सदस्य असुन जनतेतून सरपंच निवड झालेली आहे. जागेसाठी नारायण पाटील यांच्या गटाच्या सौ.प्रीती नितीन पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य तसेच जांबुड गावचे किंग मेकर मा.मुरलिधर कचरे, रविराज बनसोडे, महेश धुमाळ, दिनकर केचे
धनाजी कचरे,ज्ञानोबा चंदनशिवे,विजय केचे, आप्पा हांडे, अनिल पाटील, शिवाजी नाईकनवरे, गणेश माने,लखन गायकवाड,बळीराम भोसले, संजय भोसले, रामभाऊ यजगर, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते