केपीजेएस नागरी अर्बन च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त बावन्न लाख रु विम्याचे सभासदांसाठी वाटप!

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे केपीजेएस नागरी अर्बन बँकेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सभासदांना बावन्न (५२) लाख रु विम्याचे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष चळवळीचे नेते मा.विकास दादा धाइंजे व प्रमुख पाहुणे भांब गावचे माजी सरपंच जेष्ठ नेते मा.गोपाळ शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विकास धाइंजे म्हणाले " आत्मविश्वास असेल तर सर्व काही शक्य आहे.सभासद,संचालक व ठेवीदार यांचा विश्वास अल्पावधीत संपादित करून बँक चांगले कार्य करीत आहे. जेष्ठ पत्रकार दामू लोखंडे म्हणाले बँकेने ग्राहक मेळावे घ्यावेत व महिला उद्योगांना प्राधान्य द्यावे.* *बँकेचे चेअरमन डॉ.कुमार लोंढे बोलताना म्हणाले " बँकेचा सभासद असणारा व्यक्ती गरीब राहू शकत नाही कारण त्या व्यक्तीस बचतीची सवय लागणार आहे.तुमच्या उद्योगास,मुलांच्या शिक्षणास,घर बांधण्यास व तुमच्या प्रत्येक अडचणीत बँक तुम्हाला सहकार्य करणार आहे.एवढेच नव्हे तर बँकेने वर्धापन दिनानिमित्त दोनशे सभासदास दोन कोटी रु विम्याचे वाटप या महिना अखेर करणार असल्याचे नमूद केले त्याचप्रमाणे मोबाईल बँकिंग,क्रेडिट कार्ड,विमा कवच,सुकन्या समृद्धी योजना,शेतकरी सन्मान योजना राबवून सभासदाचे दारिद्र दूर करण्याचे आणि मध्यमवर्गीय,छोटे व्यावसायिक यांना स्वतःच्या पायावर उभा करणार असल्याचे सांगितले.* कार्यक्रमास केपीजेएस नागरी अर्बन चे मा.माणिक (शेठजी) मगर, मा.शशिकांत शेंडगे ( कॉन्ट्रॅक्टर) धना (शेठ) मगर,युवा नेते मा.मारुती सरगर,बाळासाहेब काटे व क्लार्क गोरड तरंगफल चे उपसरपंच शशी साळवे,रिपाइंचे रणजित सातपुते,मामा मगर,अशोक पाटील,पत्रकार सुजित सातपुते,प्रा.वायदंडे, इ सह सूळेवाडी,पिलीव,चांदापुरी कण्हेर इ भागातील सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कुंडलिक साठे यांनी केले तर आभार सागर फडतरे यांनी मानले.
केपीजेएस नागरी अर्बन च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त बावन्न लाख रु विम्याचे सभासदांसाठी वाटप!

