एन.डी.एम.जे ची वार्षिक आढावा बैठक संपन्न


एन.डी.एम.जे ची वार्षिक आढावा बैठक संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क– मोरगाव बारामती येथे नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस एन.डी.ए.या सामाजिक संघटनेचे वार्षिक आढावा बैठक संपन्न झाली. ही बैठक एन.डी.एम.जे संघटनेचे स्वराज्य महासचिव अडवोकेट डॉ.केवल उके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये संघटनेच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले तसेच राज्याचे सचिव वैभव गिते यांनी वर्षभरात लॉकडाऊन च्या काळामध्ये सामाजिक हिताचे संघटनेने व व कार्यकर्त्यांनी कोणकोणती कामे केली याचा आढावा घेतला. त्यामध्ये अत्याचार पीडितांचे प्रश्न , दिव्यांगांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील बांधकाम मजुरांचे प्रश्न कार्यकर्त्यांच्या अडचणी असतील व या वर्षीच्या गाव स्तरीय,तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय,पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती तसेच गाव तिथे शाखा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वर्षभरात चांगले काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचा सन्मान तसेच क्वेस्ट फॉर जस्टीस या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं.यावेळी राज्य कार्यकारणी पदाधिकारी डॉक्टर केवजी उके, वैभवजी गीते,रमाताई अहिरे,अँपलजी खरात,प्रमोद शिंदे,बीपी लांडगे,निवृत्ती तात्या रोकडे, ऍड.अमोल सोनवणे ऍड.बापूसाहेब शीलवंत,पंचशीलाताई कुंभारकर, महानंदाताई डाळिंबे,शशी खंडागळे, शरद शेळके, दिलीपजी आदमाने,तसेच संजय झेंडे, बाबासाहेब सोनवणे, दादा जाधव,संजय माकेगावकर,वर्षा शेरखाने,पंकज काटे, विलास ढगे, सचिन वाघमारे,डॉक्टर बाबासाहेब सोनवणे, विनोद रोकडे, ऍड.विजय बागडे, ऍड हर्षल.भोसले ऍड विजय मस्के, संदेश भालेराव,भीमसेन चव्हाण,दत्ता कांबळे,सचिन मोरे,तसेच पुणे,सातारा,सांगली,सोलापूर,लातूर, उस्मानाबाद,रायगड,मुंबई,कल्याण,विदर्भ,मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र,येथील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब सोनवणे यांनी केले.