*पिरळे ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या पुरोगामी महाराष्ट्र न्यूज यांच्याकडून एक लाख रुपयांचे बक्षीस*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कग्रामपंचायत निवडणूक 2021 ही निवडणूक ग्रामपंचायत पिरळे येथे बिनविरोध झाल्यास पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल संपादक प्रमोद शिंदे यांच्याकडून एक लाख रुपयाचे बक्षीस ग्रामपंचायतस जाहीर करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवार आणि प्रशासन यांचा पैसा आणि वेळ मोठ्या प्रमाणात खर्च होतो याचा परिणाम प्रशासनाच्या तिजोरीवर होत असतो हाच वेळ आणि पैसा जर ग्रामपंचायतीला मिळाला तर ती ग्रामपंचायत लोकांसाठी अनेक योजना राबवून सक्षम व आदर्श ठरू शकते याउलट पिरळे येथील गेली पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षात जवळपास पाच ते सहा सरपंच बदलले गेले आहेत. नाही म्हटलं तरी याचा परिणाम गावच्या विकास कामावर होतो त्यामुळे गावची प्रगती थांबल्याचे दिसून येते.उमेदवार हा महिन्यासाठी सरपंच झाल्यास त्या उमेदवाराला ग्रामपंचायत समजून घेण्यासाठी तीन ते चार महिने जातात राहिला दोन महिन्याचा कार्यकाल या दोन महिन्याच्या कार्यकाळात विकास कामे होऊ शकत नाही म्हणून येणाऱ्या निवडणुकीत पाच वर्षासाठी एकच सरपंचपद असावे असे पिरळे ग्रामस्थांच्यावतीने बोलले जात आहे. आदर्श ग्रामपंचायत व्हायचे असेल तर निवडणुकी बिनविरोध व्हायला हवे जर उमेदवारांना निवडणूक ही स्वतःच्या विकासासाठी न लढवता गावच्या विकासासाठी लढवायची असेल तर ग्रामपंचायत निवडणूक ही निस्वार्थी आणि बिनविरोध झाली पाहिजे अशी अपेक्षा अनेक मतदारांनी व्यक्त केली आहे.

You may have missed