जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या 8 तासात मुसक्या आवळल्या वालचंद नगर पोलिसांची कामगिरी

जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या 8 तासात मुसक्या आवळल्या वालचंद नगर पोलिसांची कामगिरी सोबत पोलिस अधिकारी दिलीप पवार व कर्मचारी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे)-जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या वालचंद नगर पोलिसांनी आठ तासात मुसक्या आवळून जेरबंद केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हकीकत अशी की, वालचंद नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 23/12/ 2020 रोजी रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान मौजे आनंदनगर, इंदापूर.जि.पुणे येथील जनाबाई मंगल कार्यालयाबाहेर फिर्यादी उदय गणपत देशमुख यांच्या पत्नी उज्वला देशमुख रा.आनंदनगर ता. इंदापूर या जनाबाई मंगल कार्यालयाच्या बाहेर थांबलेल्या असताना अचानकपणे एक मोटर सायकल वरून आलेले दोन अनोळखी इसम सौ.मंगल देशमुख यांचे गळ्यातील सोन्याचा गळ्यातील गंठण 80 ग्रॅम वजनाचा तीन लाख वीस हजार रुपये किमतीचा तो सोन्याचा गंठण दोन अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने हिसका मारून तोडून चोरून नेला होता. सदर बाबत वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.527/2020 भा.द.वि.कलम 392/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.   सदर गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री अभिमान देशमुख यांनी गुन्हा तात्काळ उघड करणे बाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी चक्र फिरवत इसम नामे शुभम आनंद किर्ते वय 24 वर्ष रा.आनंद इंदापूर ,जित बापू भोसले वय 24 रा. आनंदनगर, इंदापूर, या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून जबरी चोरी झालेले फिर्यादीचे सोन्याचे 80 ग्रॅम वजनाचे तीन लाख वीस हजार रुपये किमतीचे गंठण गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 3,70000 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पुणे अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते बारामती, उपविभागीय अधिकारी नारायण शीरगावकर बारामती, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस हवालदार मोहन ठोंबरे,पोलीस नाईक,लक्ष्मण साळवे, पोलीस शिपाई जगन्नाथ कळसाईत,यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. आठ तासात चोरट्यांना बेड्या ठोकल्यामुळे परिसरात वालचंदनग पोलिसांचे व अधिकारी यांचे कौतुक होत आहे.

You may have missed