नातेपुते पोलिसांनी दरोडेखोरांना ४८ तासाच्या आत ठोकल्या बेड्या*


पाच चोरीच्या मोटरसायकली सहज दरोडेखोरांना अटक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

नातेपुते पोलीस ठाणे मध्ये दाखल झालेल्या दरोडे मधील दरोडेखोरांना नातेपुते पोलिसांनी ४८ तासांच्या आत बेड्या ठोकल्या. 
        याबाबत हकीकत अशी की दिनांक 31 मार्च 20 21 रोजी नातेपुते येथील व्यापारी अंबादास उत्तम पलंगे यांचा महिंद्रा पिकप एम.एच.४२ ७१४६ या गाडीमध्ये चाळीस मेंढ्या घेऊन केरळ येथील व्यापाऱ्यास देण्यासाठी ड्रायव्हर फिर्यादी बापूराव महादेव डोंबाळे व त्यांच्यासोबत हनुमंत शेषराव बनसोडे रा.नातेपुते हे शिंगणापूर मार्गे जात असताना अज्ञात सहा जणांनी त्या पिकअप चा पाठलाग करून रात्रीअकरा वाजता घाटातील तिसऱ्या वळणावर चढाला पिकप गाडी समोर मोटरसायकल आडवी लावून पिकप ची चावी काढून बापूराव डोंबाळे व हनुमंत बनसोडे यांना अडवून त्याच्याकडे पैशाची मागणी करून व त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून. त्यांच्या खिशातील ५०००रुपये व २ मोबाइल घेऊन पसार झाले याबाबत बापूराव डोंबाळे रा.नातेपुते यांनी नातेपुते पोलीस स्टेशन येथे गुरन ७७/२०२१, भादवि कलम ३९५,३४१ प्रमाणे गुन्हा केला.नातेपुते पोलीस स्टेशन अंतर्गत असणारा शिंगणापूर व कोथळे घाट या ठिकाणी रात्रीची वाहतूक तुरळक असते सदर ठिकाणी यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.        या गुन्ह्याचा तपास सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सोलापूर सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली.नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी तात्काळ चक्र फिरवत या गुन्ह्यासंदर्भात दोन टीम तयार करून आरोपींचा माग काढून आरोपी नामे सोमनाथ उर्फ सागर अनिल बनसोडे वय २२, अक्षय बबन बल्लाळ वय २४, रा.सदाशिवनगर ता.माळशिरस,अभिमान अर्जुन खिलारे रा.मोरोची, धनाजी साधू दडस रा. मार्कडवाडी, गणेश बाळासो जाधव रा.जाधव वाडी, चैतन्य हनुमंत झेंडे रा. मोरोचीता. माळशिरस,या आरोपींना नातेपुते पोलिसांनी ४८ तासात च्या आत  बेड्या ठोकल्या.या गुन्ह्यात आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यासाठी चोरून आणलेल्या ५ मोटरसायकल व चोरून नेले ५ हजार रुपये तसेच २मोबाईल असा एकूण एक लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.                                                   सदरची ही कामगिरी नातेपुते पोलीस स्टेशन येथील तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोहे ४५० गडदे,पोना १५८१ मसाजी थोरात ,पोकॉ २०३८अजीत कडाळे, पोलीस कॉन्स्टेबल ३४५अमित जाधव,पोलीस कॉन्स्टेबल १२ विशाल घाडगे,पोलीस नाईक १६३५राजेश लांडगे, पोलीस नाईक १८१९ सचिन भोसले, पोलीस नाईक ८५०नवनाथ माने,चालक पोलिस शिपाई २२०२ राहुल भोसले,पोलीस नाईक ५१० सूर्यवंशी,पोलीस कॉन्स्टेबल ८०१ धनाजी मुटकुळे,१७३२ जानकर, पोलीस कॉन्स्टेबल २२४९ कापसे,पोलीस नाईक १७८८महेश पाटील,पोलीस नाईक८८२ नागरगोजे, पोलीस नाईक १५३३ बबलू गाडे, तसेच सोलापूर सायबर पोलीस ठाण्याचे अन्वर आत्तार यांनी कामगिरी केली यासंदर्भात नातेपुते पोलीस स्टेशन  कडून माहिती देण्यात आली .तसेच सदरच्या कामगिरीमुळे नातेपुते परिसरातून पोलिसांचे कौतुक होत आहे.

You may have missed