प्रांत कार्यालय अकलूज येथे आज पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु


पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क प्रमोद शिंदे –आज दिनांक 8 एप्रिल 2021 रोजी प्रांत कार्यालय येथे फोंडशिरस येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. फोंडशिरस ते सदाशिवनगर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्याच्या कामामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास संदर्भात फोंडशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात, जमीर मुलानी, दिनेश भोसले यांनी प्रांत कार्यालय अकलूज यांच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन बांगर्डे ते फोंडशिरस, फोंडशिरस ते सदाशिवनगर या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले असल्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. जोपर्यंत रस्त्याचे काम पुन्हा होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
