नातेपुते येथे महामानवास अभिवादन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –नातेपुते तालुका माळशिरस येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सलग दुसऱ्या वर्षी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. नातेपुते येथे सालाबादप्रमाणे 1 एप्रिल पासून भीम जयंती जल्लोषात सुरुवात होत असते मोठ मोठे बॅनर संपूर्ण नातेपुते शहरात रोषणाई व निळ्या झेंड्याची झगमगाट तसेच फटाक्यांचे मोठ्या प्रमाणात अतिषबाजी केली जाते. सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात नातेपुते येथील जयंती चा प्रथम क्रमांक येतो परंतु यावर्षी एक एप्रिल रोजी फक्त सुंदर अशी लाईट डेकोरेशन ची रोषणाई करून 14 तारखेला बारा वाजता मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तसेच सकाळी दहा वाजता धम्म ध्वजारोहण व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच प्रतिमा पूजन करून ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, एडवोकेट पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य साक्षी ताई सोरटे,सरपंच कांचन लांडगे,उपसरपंच अतुल पाटील,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश साळवे ,नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर,सामाजिक कार्यकर्ते समीर सोरटे,रोहित सोरटे,विनोद रणदिवे,संघर्ष सोरटे,तसेच भिमजयंती उत्सव समितीतील कार्यकर्ते उपस्थित होते.







