कल्याण येथे भीम जयंती उत्साहात साजरी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव –दिनांक १४/०४/ २०२१ रोजी पहाटे ००:०० वाजता कल्याण येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण (पश्चिम)येथे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुर्ण कृती पुतळ्यास पुष्पहारअर्पणकरूनअभिवादन.
एन.डी.एम.जे.राज्य महासचिव मा.अॅड.डॉ.केवलजी उके सर यांच्या हस्ते करण्यात आले व मान वंदना कार्यक्रम संपन्न झाला. कल्याण डोबिवली शहर जिल्हा अध्यक्ष अॅड प्रवीणजी बोदडे यांनी सकाळी मोहने व कल्याण पुर्व येथे लाडु वाटुन जयंती चा आनंद व्यक्त केला तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयजी कांबळे भारतीय संविधाना च्या १०० प्रत बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मोफत वाटुन जयंतीचा
आनंद वेक्त केला व जयंतींच्या शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम संपन्न झाला. जयंती साजरी करण्यात आली तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी एन.डी.एम.जे.कल्याण डोंबिवली अध्यक्ष ॲड .प्रविण बोदडे याच्या हस्ते पुष्प अर्पण करून वअगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलीत करण्यात आली तसेच एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा सह सचिव सुनिलजी ठेंगे यांच्या वतीने सुध्दा त्यांच्या ऑल.इंडिया एस.सी.एस.टी रेल्वे असोसिएशन कल्याण OHE शाखेच्या कार्यालयात सुध्दा रेल्वे कर्मचाऱ्यां सोबत सुध्दा छोट्या खाणी जयंती साजरी करण्यात आली नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टिसचे ठाणे जिल्हा संचिव विनोद एस रोकडे यांनी जयंती निमित्त कल्याण पुर्व मधील कर्तव्य निष्ठ डॉक्टर ना कोरोना योद्धा पुरस्कार सन्मानचिन्ह दिले व डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंती च्या शुभेच्छा दिल्या नॅशनल दलिंत मुव्हमेंट फॉर जस्टिस चे ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदेशजी भालेराव व कल्याण डोंबिवली शहर सचिव संदीप मधुकर घुसळे सर,
वंचित बहुजन आघाडी वार्ड क्र ९४ चे जेष्ठ कार्यकर्ते विक्रम जाधव व अविनाश बावस्कर बाळु कुडवे राजेन्द्र सोनावने ,अविनाश जाधव, बौद्धचार्य आनंदजी निरभवणे याच्या उपस्थित बुध्द वंदना घेण्यात आली व नागरिकांना जयंती निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या




