आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व रविंद्र बनसोडे काळाच्या पडद्याआड

आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व रविंद्र बनसोडे काळाच्या पडद्याआड
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-

आंबेडकरी चळवळीचे तरुण तडफदार नेतृत्व रविंद्र बनसोडे कोरोनाशी लढताना पुणे येथे उपचारादरम्यान काल रात्री अखेरचा श्वास घेतला. रविंद्र बनसोडे हे आंबेडकरी चळवळीतील एक तरुण आणि तडफदार नेतृत्व होते त्यांनी महाराष्ट्रातील अनेक पीडितांना न्यायालयीन लढाईमध्ये मदत केली आहे. त्यामध्ये जांब येथील चंद्रकांत गायकवाड हत्याकांड प्रकरण, पुणे येथील माणिक उदागेहत्या प्रकरण, बाबासाहेबांची रिंगटोन वाजवली म्हणून शिर्डी येथील सागर शेजवळ हत्या, प्रकरण खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरण अशा अनेक पीडितांना त्यांनी न्यायालय लढाईमध्ये मदत केली आहे.तसेच अनेक कार्यकर्ते घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते स्वतः महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील कार्यकर्त्यांसाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट व माहिती अधिकार यासारख्या कायदेशीर प्रशिक्षण शिबिर घेत असत ते स्वतः टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधून एम एस डब्ल्यू व पॉलिटिक्स या विषयावरती पी.एच.डी केली होती.2002 पासून ते नागार्जुन प्रशिक्षण केंद्र नाग लोक नागपूर येथून दीक्षा घेऊन बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत होते. तसेच त्यांनी पुणे येरवडा येथील माणुसकी संस्था येथे अनेक पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. व ते नॅशनल दलित फॉर जस्टिस या संघटने मध्ये डॉक्टर केवल उके व वैभव गीते यांच्यासोबत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन काम करत होते. तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल चा पुणे प्रतिनिधी पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केला आहे.त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीमध्ये शोककळा पसरले आहे व सर्वत्रर हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगी असा परिवार आहे .अशा या गुणी चळवळीच्या कार्यकर्त्याला व त्याच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम.

You may have missed