फोंडशिरस येथे नऊ लाखाची घरफोडी करणाऱ्या दरोडेखोरांना नातेपुते पोलिसांकडून अटक



पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)–फोंडशिरस तालुका माळशिरस येथे नऊ लाखांची घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी केली अटक.याबाबत हकीकत अशी की 19 मार्च 20 21 रोजी फोंडशिरस येथील किशोर हनुमंत गोरे यांच्या घरात रात्री झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घर फोडून 9 लाख 48 हजार 600 रुपये चोरून नेले होते यासंदर्भात नातेपुते पोलीसत गुन्हा नोंद करण्यात आला होता.आरोपींनी कोणताही प्रकारचा पुरावा ठेवला नव्हता. परंतु सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मनोज सोनवलकर यांनी चक्र फिरून नातेपुते पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मौजे खोरोची येथील सचिन पोपट जाधव हा वारंवार फोंडशिरस भागात येऊन काही काम धंदा नसताना पैशांची उधळपट्टी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली व याला ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवताच सचिन जाधव येणे तुषार दादासो चव्हाण रा.फोंडशिरस, सूरज बिबीशन फासगे रा. वडापुरी तालुका इंदापूर. जि. पुणे मदन अरुण काळे रा. शेटफळ कुमार दत्तू कांबळे,रा. वरकुटे, दादा बबन बोडरे रा. मारकडवाडी , संदीप हरिश्चंद्र बोडरे रा.उंबरे दहिगाव,यांच्या साथीने फोंडशिरस येथील घरफोडीचा गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.फोंडशिरस येथील तुषार दादासो चव्हाण याला ताब्यात घेऊन तपास केला असता तो या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असून च्या सांगण्यावरून घरफोडी केल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे.या सर्वांना न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाकडून पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.आरोपींकडून चोरीस गेलेली रकमे मधून दोन लाख रुपये व एक बजाज कंपनीची 220 पल्सर,दोन स्प्लेंडर मोटर सायकल हस्तगत करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील आरोपी सुरज फासगे रा.वडापुरी ता इंदापूर अरुण काळे रा. शेठफळ कुमार कांबळे राहणार वरकुटे ता इंदापूर हे सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे .यांच्यावरती वालचंद नगर इंदापूर टेंभुर्णी वडगाव निंबाळकर या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याचा तपास ए.पी.आय मनोज सोनवलकर हे करत असून सदरची कामगिरी पोहेकॉ४५० अनिल गडदे,१५८१ मसाजी थोरात,८५०नवनाथ माने,१५३३तुषार गाडे,१०३८अभिजीत कडाळे,३४५अमित जाधव,१७३२विश्वास जाणकर,१२विशाल घाडगे,१०५७शाहू काळदाते,सायबर शाखेचे २२१६अन्वर आत्तार यांनी तपास करून गुन्हा उघडकीस आणला यासंदर्भात नातेपुते पोलिसांकडून माहिती देण्यात आली.सदर कामगिरीमुळे नातेपुते पोलिसांचे परिसरातून कौतुक होत आहे.