नातेपुते येथील पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयात मुस्लिम बांधवांच्या वतीने छ.संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन





महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)- नातेपुते येथील पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयात रमजान ईद, संत बसवेश्वर जयंती,अक्षय तृतीया चे औचित्य साधून व छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हे प्रतिमा पूजन राष्ट्रीय समाज पक्षाचेअल्पसंख्याक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा प्रभारी शाहिद मुलाणी,हाजी बशीर भाई मुलाणी, मराठा सेवा संघाचे सामाजिक कार्यकर्ते प्रणव थोरात, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष रियाज आत्तार,जमीर मुलाणी, सलिम मुलाणी, फोंडशिरस येथील मशीदेचे धर्मगुरू, यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी साहेब मुलानी यांनी हिंदू-मुस्लीम भाई भाई चा संदेश दिला. तसेच रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवाचा पत्रकार प्रमोद शिंदे व प्रशांत खरात यांच्या वतीने सन्मान करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

