नातेपुते येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी

 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते

नातेपुते ता.माळशिरस येथील शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. नातेपुते येथील श्रीराम मंदिरात शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने कोरोना काळातील चे सर्व नियम,अटी पाळून शिवजयंतीनिमित्त प्रतिमापूजन आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. बालभारती चे सदस्य व इतिहास संशोधक प्रशांत सरूडकर यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप़संगी त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहास संशोधकांच्या व शिला लेखांच्या आधारे तीन जन्मतारखा होत आहेत. शिवजयंती हा विषय स्मरणाचा आणि उत्सव साजरा करण्याचा आहे .शिवजयंती साजरी केल्याने एक वेगळाच उत्साह जीवनात कार्य करण्याची प्रेरणा मिळते. नातेपुते शहरात 1 रुपया वर्गणी पासून आपण सर्वांनी शिवजयंती सुरू केली आहे. लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू करण्याचे कारण म्हणजे इंग्रजांचे राज्य होते. समाज संघटीत करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषांची  गरज होती. राष्ट्रीय उत्सव म्हणून यामध्ये जन्मतारखेचा विषय येऊ शकत नाही. राष्ट्रकार्यासाठी वाहून घेणारा तरुण तयार व्हावा, व वैचारिक प्रबोधन व्हावे, प्रबोधन व्हावे, त्यानिमित्ताने जनआंदोलन सुरू व्हावे या माध्यमातून मानवी जीवन मूल्य उजळून निघत असतात. शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक सुनील राऊत यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष किशोर पलंगे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. या समारंभास भाजपचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण काळे , विश्व हिंदू परिषदेचे गणेश पागे,धनंजय पवार, राहुल पद्मन, एकनाथ ननवरे ,शशिकांत कल्याणी, महेश बडवे, मंगेश दीक्षित, अमर भिसे, किरण टकले, शक्ती पलंगे, गिरीश पैठणकर, आप्पा लांळगे, रुपेश इंगोले, मुकुंद बंदिष्टे, विवेक राऊत, गौरव पैठणकर,आदी मान्यवर उपस्थित होते.

नातेपुते येथे शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली.याप़संगी प्रतिमापूजन करताना प्रशांत सरूडकर व इतर मान्यवर दिसत आहेत.

You may have missed