संभाजी फुले गुरुजींनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे )-
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक तथा सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस आणि सोसायटी व्हा चेअरमन संभाजी फुले गुरुजी यांची कन्या स्नेहल हिच्या वाढदिवसानिमित्त दहिगाव ता माळशिरस येथील बावन्न चाळ, गोडसेवस्ती, फुलेवस्ती,दणाणेवस्ती दहिगाव मधील ६० कुटूंबांना कोरोना या महामारीच्या काळात गोरगरीब आणि मागासवर्गीय कुटुंबांना वाफेचे मशीन शिवप्रसाद दूध संघाचे चेअरमन शरद बापू मोरे यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून प्राथमिक शिक्षक संभाजी फुलेसर यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवला आहे. वाफेचे मशीन वाटप प्रसंगी
संभाजी फुले यांनी स्वच्छता,मास्क, सँनेटायझर, सोशल डिस्टन पाळण्याचे आवाहन केले .
यावेळी सर्व ग्रामस्थांना काळजी घेण्याची आणि ग्रामस्थांना कसलीही अडचण आली तर निश्चितच मदत केली जाईल असेही शरद मोरे यांनी सांगितले.
यावेळी मेजर राजेंद्र हिवरकर, मेजर दादा केंगार, किरण गोडसे,भारत फुले,सोमनाथ शिंदे,वैभव मोरे,राजेंद्र कांबळे,पोपट भगत,भाऊसाहेब फुले, राम माने उपस्थित होते
.

फुले गुरुजींनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी
शिवप्रसाद दूध संघाचे चेअरमन शरद बापू मोरे यांच्या हस्ते वाफेचे मशीन वाटप

You may have missed